अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
F
25-12-2024
गडचिरोली.
गडचिरोली येथील झाडीबोली साहित्य मंडळाचे सहसचिव, अंनिसचे कार्यकर्ते, झाडीबोली कवी श्री. उपेंद्र रोहनकर, ह्यांच्या "डोरे रावून अंद्रा" कवितेला नुकताच पहिला (५000/-रु. रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह, व प्रमाणपत्र) राष्ट्रीय मराठी बोलीभाषा पुरस्कार जाहीर झाला आहे. सातारा येथील कर्मवीर भाऊराव विद्यापीठातील छत्रपती शिवाजी कॉलेजच्या मराठी विभागाने ऑक्टोबर, नोव्हेंबर २0२४ मध्ये राष्ट्रीय मराठी, कोकणी बोलीभाषेतील काव्यालेखन स्पर्धेचे आयोजन केले होते. ह्या स्पर्धेत महाराष्टात बोलल्या जाणाऱ्या विविध बोलीभाषा आणि त्यात लेखन करणारे अनेक कवी आपल्या कविता पाठवून सहभागी झाले होते.मराठी बोली भाषेचे जतन व संवर्धन करण्यासाठी बोलीभाषा कविता लेखन स्पर्धेचे आयोजन असलेली ही देशातील पहिली स्पर्धा होती.दुसरा क्रमांक लांजा येथील कवियत्री मराठीच्या अभ्यासक विजयालक्ष्मी देवगोजे यांच्या बेळगावी बोलीतील "सासुरवाशीन " कवितेला ( ४000/-रु. रोख सन्मानचिन्ह वं प्रमाणपत्र )तर तिसरा क्रमांक अनिता नंदू बर्गे ह्यांच्या कोकणी बोलीतील "जिनेचे एक पुस्तक" ह्या कवितेला(३000/- रु. रोख सन्मानचिन्ह वं प्रमाणपत्र ) मिळाला आहे.शिवाय दहा उतेजनार्थ बक्षीसमध्ये चंद्रपर जिल्ह्यातील आमडीचे कवी प्रशांत भंडारे ह्यांच्या झाडीबोतील "रोवना" व सुनील बावणे यांच्या "लाव बेकणी" ह्या कवितांचा समावेश आहे.
उपेंद्र रोहनकर हे मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील आताच्या सावली तालुक्यातील करगांव चक ह्या गावचे.खेड्यात राहून त्यांनी प्राथमिक, उच्च प्राथमिक शिक्षण पुर्ण केले. त्यानंतर तालुक्याच्या मूल ह्या गावी हायस्कुल पर्यंतचे शिक्षण घेतले. तेव्हा त्यांना आपल्या बोलीशी सामना करावा लागायचा.बोलीतील शब्दांना शहरातील लोक हसायचे. खाल्लू, घेतलू, आलू, गेलू, नेहमीची भाषा हळूहळू विसरत गेली. जसे संस्कार तशी वागणूक. पण मुलगी जशी आपल्या माहेरला विसरू शकत नाही. तसे संस्कार देणारी आपली माती आपण विसरत नाही. अलीकडे त्यांचा " डोळस व्हायचं" हा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे.त्यात त्यांच्या काही बोलीतील कविता आहेत.
गडचिरोली,चंद्रपूर, गोंदिया, भंडारा हा प्रामुख्याने झाडीचा प्रदेश आहे. ह्या भागात झाडीबोली बोलली जाते.इथल्या संस्कृती, कला, नाटक,साहित्यात ही बोली बघायला मिळते. आता केंद्रशासनाने मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून दिला आहे. त्यामुळे हळूहळू विलोपास जात असलेल्या बोलीभाषा आता पुन्हा सक्षमपणे बोलल्या, लिहल्या जातील.बोली टिकल्या तर भाषा टिकतील.आता त्या त्या भागात राहणाऱ्या कवी लेखकांनी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
सदर पुरस्काराबद्दल कवी उपेंद्र रोहनकर ह्यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार, झाडीबोलीचे अभ्यासक तथा जेष्ठ साहित्यिक डॉ.हरीशचंद्र बोरकर,झाडीबोलीच्या कवियत्री अंजनाबाई खुणे, केंद्रीय झाडीबोली साहित्य मंडळाचे सदस्य , ग्रामगितचार्य बंडोपंत बोढेकर, ३२ व्या झाडीबोली साहित्य मंडळाचे अध्यक्ष मा. लोकराम शेंडे,गडचिरोली झाडीबोली मंडळाचे अध्यक्ष प्रा. विनायक धानोरकर, सल्लागार डॉ. चंद्रकांत लेनगुरे, उपाध्यक्ष डॉ.प्रवीण किलनाके, सचीव संजीव बोरकर, चंद्रपूर झाडीबोली साहित्य मंडळाचे अध्यक्ष श्री.अरुण झगडकर,झाडीबोली कवी लक्ष्मण खोब्रागडे. गोंडपिपरी,वरोरा, ब्रम्हपुरी, बल्लारपूर, सिंदेवाही, मंडळातील कविनी शुभेच्छा दिल्या.तसेच
महाअनिसचे विलास निंबोरकर, सायकलस्नेही मंडळाचे प्रा. विलास पारखी, सर्वोदय मंडळाचे प्रा. देवानंद कामडी, गुरुदेव सेवामंडळाचे डॉ. कुंभारे, पत्रकार रोहिदास राऊत, मिलिंद उमरे तसेच विविध संघटना, साहित्य समूहानी अभिनंदन केले आहे.
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
International
विदर्भ फायर न्यूज
Food
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
National
No Comments