अमित मेडिकल स्टोर & निर्मल जल, गडचिरोली
निर्मल जल शुद्धतात का वादा
F
27-12-2024
Bhandara News: भंडारा येथील शासकीय नर्सिंग महाविद्यालयात घडलेल्या एका धक्कादायक प्रकाराने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. परीक्षेत पास होण्यासाठी आणि अधिक गुण मिळवून देण्याचे आमिष दाखवून विद्यार्थिनींकडून शरीरसुखाची मागणी करणाऱ्या प्रभारी प्राचार्य किरण मुरकुट यांना संतप्त पालकांनी धडा शिकवला.
भंडारा येथील शासकीय नर्सिंग महाविद्यालयात ANM आणि JNM प्रशिक्षण घेणाऱ्या 182 प्रशिक्षणार्थींपैकी काही विद्यार्थिनींना प्राचार्यांनी मोबाईलद्वारे अश्लील संदेश पाठवत परीक्षेत पास करण्यासाठी शारीरिक सुखाची मागणी केली. हे लज्जास्पद प्रकार समजल्यानंतर पीडित विद्यार्थिनींनी आपली व्यथा पालकांपुढे मांडली. यामुळे संतप्त झालेले पालक महाविद्यालयात धडकले आणि त्यांनी प्राचार्याला या कृत्याबाबत जाब विचारला.
प्राचार्याने उडवाउडवीची उत्तरं दिल्यानंतर पालकांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी प्राचार्याला धडा शिकवला. यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून प्राचार्याला ताब्यात घेतलं. पुढील चौकशीसाठी पीडित विद्यार्थिनींची सविस्तर विधाने नोंदवण्यात आली. प्राचार्याविरुद्ध विनयभंग आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा गैरवापर यासंदर्भातील कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपचंद सोयाम यांनी तात्काळ नर्सिंग महाविद्यालयाला भेट दिली. त्यांनी प्राचार्याला पदावरून हटवून त्यांच्या कक्षाला सील केलं आणि या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी एक विशेष समिती स्थापन केली. या चौकशीचा अहवाल लवकरच राज्य सरकारकडे सादर करण्यात येणार आहे.
निर्मल जल शुद्धतात का वादा
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
National
No Comments