संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
F
14-03-2025
पूर्व विदर्भातील शेतकरी धान पिकाची लागवड करून आपल्या कुटुंबाचा पालन पोषण करतात.कधी धान फसल फायद्याची ठरते तर कधी नुकसान दायक देखील ठरू शकते.
पूर्व विदर्भातील प्रत्येक धान पीक शेतकरी हा पीक कर्ज घेऊनच धान पिकाची लावणी करतो,म्हणून धानपिक घेणाऱ्या शेतकऱ्यांचा संपूर्ण पीक कर्ज महाराष्ट्र शासनाने सूट करायला पाहिजे अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते रमेश चौखुंडे यांनी केलेली आहे.
वास्तविक पाहता निवडणुकीच्या काळात भारतीय जनता पक्षांनी आपले जाहीरनाम्यात पीक कर्ज माफ करू असं आश्वासन जनतेला केलेला होता.शेतकऱ्यांनी पीक कर्जमाफीच्या आधारावरच भारतीय जनता पक्षाला भरभरून मतदान केल्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सरकार सत्तेवर विराजमान झाले.
ज्या पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांने भरभरून मतदान केले त्याच शेतकऱ्यांना आता पीक कर्ज माफ करायला सरकार मागेपुढे पाहताना दिसतो आहे म्हणजे गरज सरो अन् वैद्य मरो हीच स्थिती राज्य सरकार अवलंबताना दिसतो आहे.
सांगायचं झाल्यास भारतीय जनता पक्षाच्या सरकारने धानपिक शेतकऱ्यांचे संपूर्ण पिक कर्ज सरसकट माफ करायला पाहिजे कारण पूर्व विदर्भातील शेतकरी हा भारतीय जनता पक्षाचा महत्त्वाचा मतदार आहे.राज्य सरकारने कुठलाही निकष न लावता पीक कर्जात माफ करायला पाहिजे.
निवडणुका येतात जातात तो काही विषय नाही परंतु पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांचा इतकाच कळवळा असेल तर आधी कर्ज माफ व्हायला पाहिजे अन्यथा पुढे धोक्याची घंटा वाजू शकते आणि हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Education
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Health
Vaingangavarta19
Local News
No Comments