CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
22-08-2024
एसी एसटी समाजाने एकत्रित गडचिरोली जिल्हा बंद करून प्रस्थापित सरकारला येणाऱ्या काळात आम्ही सर्वजण एकत्र असल्याचे दाखवून दिले. अन्याय अत्याचाराविरोधात आवाज उठवुन एकजुटीची ताकद दाखवणार.
गडचिरोली/21:- एसी एसटी समाजाच्या आरक्षणात उपवर्गीकरण व क्रिमीलेयर लागु करण्याचे षडयंत्र सुप्रीम कोर्टाने केला त्याचा विरोधात बहुजन समाज पार्टीने कडकडीत बंद करून आपला विरोध करुन न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर आंदोलन केले. भारत सरकारने 9 सुची मध्ये संसदेत ठराव पारित करून एसी एसटी च्या आरक्षणाला सुरक्षित करण्याची मागणी व एसी एसटी समाजाच्या आरक्षणात उपवर्गीकरण व क्रिमीलेयर लागु करु नये असे निवेदन महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांना जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या मार्फत देण्यात आले. यापूर्वी एससी एसटी आरक्षणात वर्गवारी व क्रिमिलिअर निर्णयाच्या विरोधात भारत बंद . गडचिरोली - एससी. एसटी आरक्षणात वर्गवारी व क्रिमिलिअर निर्णयाच्या विरोधात वतीने गडचिरोली शहर कडकडीत बंद पाडण्यात आला. सकाळी ९ वाजता पासुन शहरातील सर्व दुकाने , शाळा महाविद्यालय
बंद पाळण्यात आल्यानंतर गांधी चौकात आदिवासी समाजाचे नेते माधव गावढ यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख अतिथी मा. भास्कर भाऊ मेश्राम जिल्हा प्रभारी बसपा गडचिरोली, यांनी बहन कुमारी मायावती जी यांच्या "भारत बंद" ला जिल्ह्यातील आदिवासी व बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. मा मंदीप गोरडवार विधानसभा अध्यक्ष बसपा गडचिरोली, यांनी उपवर्गीकरण व क्रिमीलेयर यावर मार्गदर्शन केले. आदिवासी समाजाची मागणी नसतानासुद्धा आदिवासी समाजाची उपवर्गीकरण व क्रिमीलेयर का लागु करण्यात आला असा प्रश्न उपस्थित केला. तसेच मा. रमेश मडावी प्रदेश सचिव बसपा गडचिरोली, यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर आक्षेप घेतला व सविस्तर भारत बंद विषयी माहिती दिली. प्रा. मुनिश्वर बोरकर ' एडव्होकेट राम मेश्राम , माजी आमदार डॉ. नामदेव उसेडी,प्रा ' भाष्कर मेश्राम जिल्हा प्रभारी बसपा गडचिरोली भोजराज कानेकर विलास कोडाप, यांच्या प्रमुख उपस्थितीत निषेध सभा घेण्यात आली. यात ॲड . राम मेश्राम म्हणाले की ' आमचा लढा हा राजकीय नसुन सामाजीक आहे. समाजाचे आरक्षण टिकले पाहिजे त्यासाठी राजकीय बाजु दुर ठेवून s C / s T सामाजाच्या लोकांनी एकत्र आले पाहीजे. माजी आमदार डॉ. नामदेव म्हणाले की मी राजकीय पदासाठी भांडत नसुन मला माझ्या समाजाचे हित लक्षात घेऊन संविधानाचे उल्लंघन होवू नये बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी कठीबद्ध आहे असे त्यांनी म्हटले याप्रसंगी माधवराव गावढ यांनी मार्गदर्शनात वर्गवारी करणे हि असंविधानिक आहे. जाती जाती मधे भेद निर्माण करून फोडा आणि राज्य करा हि रणनितीआहे. परंतु हि रणनिती एससी एसटी समाजाने ओळखून जागृत झाले पाहिजे याप्रसंगी विलास कोडाप संदानद ताराम प्रा. भाष्कर मेश्राम गुलाबराव मडावी, रमेश मडावी ,हंसराज उंदिरवाडे तुलाराम राऊत गौतम मेश्राम प्रशांत मडावी मारोती भैसारे मंदिप गोरडवार बसपा विधानसभा अध्यक्ष, धर्मानंद मेश्राम , ज्ञानेश्वर मुजुमकर तुळसिराम सहारे मालती पुडो मनोहर पोटावी आदिने मनोगत व्यक्त केले . तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि संचलन भोजराज कानेकर यांनी तर कार्याक्रमाचे आयोजक प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी सर्वाचे आभार मानले. कार्यकमास कुसमताई आलाम , मिलिंद बाबोळे, दुष्यांत चांदेकर साहेब बसपा नेते, सुरेखा बारसागडे सुधिर वालदे प्रेमदास रामटेके जिवन मेश्राम रोशन उके अमर खंडारे ' सुरेश कन्नमवार साईनाथ पुगाटी वनिता पदा, मायाताई मोहुर्ले, वेणुताई खोब्रागडे सुमन क-हाडे, हेमंत रामटेके, कैलास खोब्रागडे, अनिल साखरे, फुलझेले, मारोती वनकर, ज्ञानेश्वर वाडके, दुधे साहेब, इत्यादी बसपा पदाधिकारी व कार्यकर्ते, आदि सहीत ग्रामसभा परिसर पोटेगाव बांधवा सहीत बहुसंख कार्यकर्ते आदिवासी व बौद्ध बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.
Redefine your style
book your appointment now
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments