संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
F
28-07-2023
जळगाव :- मुलींच्या वसतिगृहात पाच अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांकडूनच देण्यात आलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. गणेश पंडित असे नराधमाचे नाव आहे. एरंडोल तालुक्यातील एका गावात शासनमान्यता असलेल्या खासगी संस्थेचे मुलींचे वसतिगृह जूनमध्ये बंद पडल्यानंतर तेथील पाच मुलींना जळगावातील शासकीय मुलींच्या निरीक्षणगृहात दाखल करण्यात आले. या मुलींनी वसतिगृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे गावातील वसतिगृहातील काळजीवाहकाने अत्याचार केल्याचा प्रकार कथन केला. ऑगस्ट २०२२ ते जून २०२३ या कालावधीत गावातील मुलींच्या वसतिगृहात पाच मुली अभिरक्षेत असताना तेथील काळजीवाहक गणेश पंडित याने पाचही मुलींवर वेळोवेळी अत्याचार केले. यासंदर्भात मुलींच्या वसतिगृहाच्या अधीक्षिकांसह सचिवांकडे वेळोवेळी तक्रार करूनही त्यांनी टाळाटाळ केल्याचा प्रकारही समोर आला. दरम्यान, यासंदर्भात जळगावच्या बालकल्याण समितीच्या अध्यक्षांनी एरंडोल येथील पोलिसांना पत्र दिले. त्याअनुषंगाने या प्रकरणाची तातडीने दखल घेत पोलिसांनी स्वतःच फिर्यादी होऊन एरंडोल येथील पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल केला. वसतिगृह बंद होईपर्यंत म्हणजे वर्षभर मुलींवर अत्याचार करण्यात आल्याचे पोलिसांच्या तक्रारीत म्हटले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पाचही मुलींवर अत्याचार करणारा काळजीवाहक गणेश पंडित याला अटक करण्यात आली आहे. या प्रकाराची माहिती असूनही हे प्रकरण लपवून ठेवून गणेश पंडितला साथ देणारी पत्नी, वसतिगृह अधीक्षिकांसह सचिवांनाही पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्या फिर्यादीवरून गणेश पंडित, सचिव भिवाजी पाटील, वसतिगृहाच्या अधीक्षिका अरुणा पंडित यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
International
विदर्भ फायर न्यूज
Food
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments