ProfileImage
17

Post

0

Followers

1

Following

PostImage

Pankaj Lanjewar

Aug. 11, 2024

PostImage

अनोळखी व्यक्तीचा गाडीवर बसने पडले महागात, महिलेचे मंगळसूत्र हिसकावून युवक फरार


कुही:=

बस स्थानकावर बसची वाट पाहत बसलेल्या गावाला सोडून देण्याचे आमिष दाखवून युवकाने महिलेच्या गड्यातील दोन मंगळसूत्र लंपास केल्याची घटना कुही पोलिस ठाण्याचा हद्दित घडली असून महिलेच्या तक्रारीवरून कुही पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांची विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

फर्यादी पुष्पा पांडुरंग चौधरी वय 65 वर्षे  रा. मोहखेडी ता. मौदा या शनिवारी मुलीला भेटण्यासाठी मुलीचा सासरी उमरेड येथे जाण्यासाठी मौदा बस स्थानकावर बसची वाट पाहत बसल्या होत्या. 

माञ बसमध्ये प्रचंड गर्दी असल्याने दुसर्‍या बसची वाट पाहत असतांना एक अनोळखी तरुण दुचाकी घेऊन त्यांच्या जवळ आले. आणि तुम्ही कोठे जात आहे असे विचारताच महिलाने उमरेडला जात आहे असे सांगितले. तेव्हा यवकाने रा. मौजा मांढळ येथील रहिवासी असल्याचे सांगितले, आणि कामासाठी उमरेडला जात असल्याचे सांगून तुम्हाला सुध्दा उमरेड सोडतो असे म्हणून महिलाने सुध्दा युवकावर विश्वास ठेवून गाडी वर बसल्या. 

तरूणाने सुरुवातीला चहा पिण्याचा बहाण्याने चापेगडी येथे थांबले, आणि कुही मार्ग मुसळगाव कडे नेत असताना हा रस्ता  उमरेडला जात नाही असे फिर्यादी महिलाने म्हटल्यावर हा एक रस्ता तारणा मार्गे उमरेडला जातो. 

असे सांगून पेट्रोलची  विचारणी करण्यासाठी गाडी थांबवली माञ स्थानकाने येथे प्रेटोल मिळत नाही, कुहीला परत जावे लागणार असे स्थानिकाने सांगितले. 

तरुणाने गाडी परत घुमवरी माञ कुही कडे न जाता सोनपुरी माल्गे नेऊ लागला. तितक्यात महिलेच्या फोन वाजू लागली .

महिला गाडीचा खाली उतरवून फोनवर बोलत असतांना महिलेचा माणेवर अळी असल्याचे सांगून गड्यातील दोन मंगळसूत्र 29000 किमतीचे हिसकावून पळून गेला. 

महिलेने कुही पोलिस ठाण्यात आरोपी विरुद्ध तक्रार केली. 

 

 


PostImage

Pankaj Lanjewar

Aug. 10, 2024

PostImage

विद्युत तार चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, कुही पोलिसांची कारवाई


विद्युत ताल चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, कुही पोलिसांची कारवाई 

कुही := कुही पोलिस स्टेशन हद्दीतील मोजा नवरगाव येथून

शेतातून विद्युऊ ताल चोरून नेणाऱ्या चोरट्यांचा कुही

पोलिसांनी एका दिवसात छडा  लावत मुसक्या आवळल्या आहेत.

तालुक्यातील मौज नायगाव येथील कोल्हे फळबागे मध्ये

असलेल्या १५०० फूट विद्युत कंडक्टर तार व ७० फूट

जिआय तार असा एकूण २८००० हजार रुपये इतका माल

अज्ञात चोरट्यांनी नेल्याची घटना (दिनांक ८/०८/०२४)

कुही पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. 

लगेच कुही पोलिसांनी घटना स्थळी जावुन घटनेची चौकशी

केली. एका शेतकऱ्याने लाल रंगाच्या आटो मध्ये माल नेल्याचे

चौकशीत समजले, पोलिसांनी तपासाचे चक्र घुमवून अवघ्या

एका दिवसातच संशयित असलेले आरोपी असलम शेख नूर

वय (३३) रसूल शेख वय(६०) या दोघानाही रा.  मोठा ताज

बाग  त्यांना ताब्यात घेऊन चोरी कबुल केले.

पोलिसांनी त्यांच्याकडून चोरी गेलेले १५०० फूट विद्युत तार

७०  फूट जिआय तार असा एकूण २८००० हजार मालासह

 चोरांनी वापरेल्या लाल रंगाच्या १ लाख २५ हजार

किमतीच्या मालवहू आँटो क्र. एम एच ४९ ए आर ५३०८

जप्त केला आहे.  

हि कारवाई कुही पोलिस ठाण्याचे ठाणेदार भानुदास पिदुरकर

यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक  स्वप्नील गोपाले,

ओमप्रकास रेहपाडे, राहुल देहिकर ,अनिल करडखेडे यांनी

केली. 

 

       


PostImage

Pankaj Lanjewar

July 26, 2024

PostImage

विष प्राशन करून वृध्द व्यक्तीची आत्महत्या


नागपूर सावनेर :


सावनेर पोलीस यांच्या माहितीनुसार

 

विषप्राशन करून मृतक:राजुभाउ गजभिये यांनी जीवनयात्रा

संपविली, मूकबधिर शाळेजवळ वॉर्ड no ३ येथील रहिवाशी


पोलीस स्टेशन सावनेर हद्दीतील घटना


रात्री ११.३० चे दरम्यान


त्यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉ. यांनी मृत

 घोषित केले.


टीप......


.रात्रीच वेळी मृतदेह मारचूरी मध्ये घेउन जातांना वाढलेले गवत

धोकादायक बसून येथे रात्री बे रात्री पोलिसांना ambulece

वाले, नातेवाईक, यांचा जीवाला धोका नाकारता येतं नाहीं

अशीच एक घटना काल रात्रीच वेळी राजू गजभिये याचा मृतदेह

 शवाविच्छेदन ब करण्याकरता मृतदेह रात्री ठेवत

असताना,गाडीतून उतरताना गवतावर पाय ठेवला असता,

सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांच पायावरून धामण

जातीचा बिनविषारी साप गेला, त्याचं ठिकाणी विषारी साप

असता तर जीवावर बेतली असती, नगरपरिषद प्रशासनाने तिथे

वाढलेला गवत पूर्णपणे साफसफाई करण्यात यावी पुढील

तपास सावनेर पोलीस यंत्रणा करीत आहे

 

 


PostImage

Pankaj Lanjewar

May 6, 2024

PostImage

पत्रकारांची मुस्कुटदाबी, लोकशाहीचा खून


पत्रकारांची मुस्कुटदाबी, लोकशाहीचा खून.

निपक्ष,स्वच्छ निवडणूक प्रक्रियेत पत्रकारांच्या पासेस नाकारल्या.
दोशींचे निलंबन,पासेसचे वाटप करण्याची मागणी.

स्वच्छ आणि निपक्ष निवडणूक प्रक्रियेत पत्रकारांची मुस्कुटदाबी होत असल्याची गंभीर बाब बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे. असंख्य पत्रकारांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी, परवानगी पासेस नाकारण्यात आल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. तर या अनुषंगाने संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा माहिती अधिकारी यांच्याशी पत्रकारांच्या शिष्टमंडळाने चर्चा केली.निवेदन, तक्रार दिले. तरीही अद्याप कोणतेही पास वाटप वगळलेल्या पत्रकारांना केली नाही. तर पासेस नाकारणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई सूद्धा करण्यात आली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पत्रकारांनी नुकतीच एक ऑनलाइन बैठक घेतली. त्यामध्ये जिल्हा प्रशासनाच्या हुकूमशाहीचा निषेध नोंदविला. तर संबंधित दोषी अधिकारी यांना तत्काळ निलंबित करावे. शेवटच्या पत्रकाराला सुद्धा पासेस वाटप करावे.अशी भूमिका या ऑनलाइन बैठकीत घेण्यात आली.        
निपक्ष आणि स्वच्छ प्रशासनात पत्रकारांना माहिती मिळविण्यासाठी आणि देण्यासाठी कोणतेही प्रयत्न करावे लागत नाही. परंतु गलथाण आणि भ्रष्ट प्रशासनामध्ये पत्रकारांना माहिती मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते.तरीही माहिती मिळेल असे नाही. उलट पक्षी पत्रकारांची मुस्कुट दाबी करून त्यांना बदनाम केल्या  जाते. त्यांना बनावट गुन्ह्यात अटकविण्यात येते. परंतु पत्रकारांची एकताच अधिकारांचे सार्वभौमत्व आबाधीत ठेवत असते. याकडे काही पत्रकार बांधवांचे दुर्लक्ष झाले आहे.त्यामुळेच आपल्यावर ही वेळ आली आहे. लोकशाहीमध्ये पत्रकारांच्या अभिव्यक्ति स्वतंत्र्यावर गधा. ही हुकूमशाहीची नांदी आहे. जोपर्यंत पत्रकारांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. निर्भीड पत्रकार जिवंत आहे. तोपर्यंतच लोकशाही जिवंत आहे.तोपर्यंत समाजाच्या हितासाठी लिहिणारे, बोलणारे आणि लढणारे कोणीतरी आहे. अन्यथा सामान्य व्यक्ती या हुकूमशाही विरोधात, पुढे येण्यासही धजावत नाही. परंतु जनसामान्यांनी पत्रकारांच्या या अधिकारासाठी कमीत कमी आवाज उचलला पाहिजे. पत्रकार समाजासाठी आहे. त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी सुद्धा समाजाची आहे. स्वच्छ शासन प्रशासनासाठी जनहितार्थ लेखनी झिजवणाऱ्या पत्रकारांना आपण तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपलं पाहिजे.तरच लोकशाही जिवंत राहील, आणि हुकूमशाहीचा अंत होईल.
तर पत्रकारांनीही सौजन्यशीलतेने, आपल्या जबाबदारीचे भान ठेवत जनतेसाठी सर्वस्वपनाला लावले पाहिजे.जाहिराती मिळतील नाही मिळतील. परंतु आपल्यातील पत्रकार जिवंत राहिला पाहिजे. जाहिराती मिळाल्यावरही जर काही आक्षेपार्य चुकीचे आढळल्यास त्यावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे. आपल्यावरच भोळ्या भाबड्या सामान्य जनतेचा विश्वास आहे. या विश्वासाला तडा जाणार नाही. यासाठी पत्रकारांनी सदसदवेकबुद्धी जिवंत ठेवीत जनसामान्यांच्या हितासाठी लेखणी झिजवली पाहिजे. बुलढाणा जिल्ह्यातील पत्रकारिता आदर्श आहे. याच जिल्ह्यातील पत्रकारितेने सरकार सूद्धा पाडले आहे. सरकारचे मोठमोठे निर्णय बदलले. असंख्य योजना पत्रकारांच्या लेखणीतून उदयास आल्या. त्याच योजना नंतर संपूर्ण महाराष्ट्राने स्वीकारल्या. पत्रकारांनी या जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी ही निवडले आहे. तर भल्या भल्यांना जमीन दोस्त करण्याची ताकदही पत्रकारांच्या लेखणीने दाखवली आहे.ही क्षमता बुलढाणा जिल्ह्यातील पत्रकारांची आहे. बुलढाणा जिल्ह्यातील पत्रकारितेच्या इतिहासाची सद्यस्थितीतील हुकूमशाही सरकारला आणि जिल्हा प्रशासनाला आठवण करून देण्याची वेळ आली आहे.
जर निवडणूक प्रक्रिया निपक्ष आहे. स्वच्छ प्रशासनाचा कार्यभार आहे.तर मग पत्रकारांच्या उपस्थितीस मज्जाव का.❓त्यांची मुस्कुटदाबी का..?कोणाच्या सांगण्यावरून.         असे असंख्य प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे. जिल्हा प्रशासन सुज्ञ आहे. लवकर निर्णय घेईल, दोषींवर त्वरीत कारवाई करेल. हीच माफक अपेक्षा जिल्ह्यातील पत्रकार आणि नागरिकांची आहे.
        तूर्तास एवढेच.
पुढील विश्लेषणात.                                                     स्वच्छ निपक्ष निवडणूक प्रक्रिया.
10.03 टक्केवारी कोणाच्या पथ्यावर.
प्रतापराव तुपकर की, खेडेकर.
शेळके शाह कूणाला गारद करणार. 
_____________________

 


PostImage

Pankaj Lanjewar

May 5, 2024

PostImage

मौत के अनेक रास्ते


" मौत के तो अनेक रास्ते है दोस्तों , जन्म केवल मां ही दे सकती है ।"
बात सन 1975 की है जब मै कक्षा छः में पढता था ।
 रविवार का दिन था सरकारी बस में बैढकर मैं अपनी बडी बहन से मिलने उसकी ससुराल जा रहा था । मै आगे वाली खिडकी के साथ वाली सीट पर बैठा था और सामने रोड को देख रहा था । बस का ड्राइवर मुझे जानता था क्योंकी मै अक्सर उसको नमस्ते करता था जब भी उसकी बस मेरे स्कूल के आगे से गुजरती थी । बस एक गांव के बस स्टाप के बहुत करीब थी इसलिए बस की रफ्तार भी  बहुत कम थी ।
अचानक दो छोटी बच्चियां (8-10 वर्ष की) जो खेतों से अपने घर आ रही थी रोड पार करने की कौशिशें करती है दोनों बच्चियों ने आधे से ज्यादा सडक पार कर ली थी और बस उनके करीब पहूंच चूकी थी ड्राइवर हार्न बजा रहा था । अचानक दोनों बच्चियां हडबडा गई और सडक पर इधर-उधर भागने लगी और छोटी लडकी बस के पिछले टायर के नीचे आ गई और अपनी जान गंवा बैढी । ड्राइवर तुरन्त बस रोक कर खिडकी से उतर कर बच्ची को देखने लगा और मै भी बहुत फूर्ती से नीचे उतरा और  मैने बडी बच्ची का हाथ पकडकर सडक से उढाया जो छोटी बहन के दूसरी साइड पर पडी थी । वो लडकी बहुत घबराई हुई थी और वो मुझसे लिपट गई । उसको ये भी नही पता था कि वो कि उसकी छोटी बहन मर चुकी है । ये मेरी छोटी उम्र में पहला हादसा था जिसका मै प्रत्यक्ष गवाह था । लडकी के आंसुओं से मेरी शर्ट और बनियान गिली हो गई थी और मेरे हाथ पैर कांप रहे थे । चूंकि बस गांव के बस स्टैंड के आसपास थी और दुकानदार , ग्रामीण तथा बस की इंतजार में खडे लोग इस घटना को प्रत्यक्ष देख रहे थे तुरन्त बस के पास पहुंच गए और उस ड्राइवर (जो मृत बच्ची को निकाल रहे थे ) पर टूट पडे । कुछ समझदार लोगों ने ड्राइवर को लोगों से बचाया क्योंकि वे देख रहे थे कि ड्राइवर का इसमें बिल्कुल भी दोष नही है तभी किसी ने उन बच्चियों की मां को बताया जो सात-आठ महिने पहले ही विधवा हुई थी वो बदहवास हालत में वहां पहुंची और हाथ जोडकर सभी से विनती करने लगी कि मैने मेरी बेटी खोई है शायद इसकी उम्र इतनी ही थी लेकिन मै नही चाहती कि किसी बच्चे का बाप उनसे बिछूड जाए । इस ड्राइवर भाई को छोड दो  मै इसके खिलाफ कोई कार्यवाही नही करूंगी क्योंकि मै एक मां हूं और ये भी किसी बुढी मां का बेटा होगा और मां का दर्द एक मां ही जानती है । हो सकता है इसकी मां में इतनी  सहनशीलता बची ही ना हो । सभी ने उस विधवा औरत के फैसले की बहुत तारीफ की और उस ड्राइवर ने अपनी मृत्यु तक एक सगे भाई की तरह अपना फर्ज निभाया । हालांकि उस विधवा औरत का कोई सगा भाई भी नही था वे दो बहने ही थी ।
  लडकी की मां ने इधर-उधर देखा शायद वो अपनी बडी बेटी को खोज रही थी । वो मेरे पास आई और मेरे सर पर अपना हाथ रखा और अपनी बेटी को अपने साथ ले गई । गांव वाले लडकी का प्राथिव शरीर उसके घर ले गए और बस अपने गंतव्य की तरफ रवाना हो गई और मैं अपनी बहन के घर पहूंच गया ।
वक्त गुजरता गया और मैंने कालेज से वायुसेना तक का सफर तय कर लिया । मै उस हादसे को लगभग भूल चुका था । 1984 में मेरी शादी हो गई । मुझे छः महीने तक पता नही चला कि मेरी शादी उसी लडकी से हुई है जो बचपन में उस हादसे की वजह से मुझसे लिपट गई थी । जिस गांव में ये हादसा हुआ था उसका मुझे केवल नाम याद था लेकिन उसी नाम से उसी सडक पर दो गांव आसपास बसे थे । शादी के छः महीने बाद मैं दूसरी  बार अपनी ससुराल गया तो मेरे साले साहब मुझे अपने खेतों में घुमाने ले गए । जब मै उस बस स्टाप पर पहूंचा तो वह घटना मेरे मस्तिष्क में घुमने लगी क्योंकि बस स्टाप और आसपास की जगह में कोई खास परिवर्तन नही आया था ।
शाम को मैं ससुराल से अपनी पत्नि के साथ अपने घर आ गया । मेरे दिमाग में वही घटना घुम रही थी । रात को मैने अपनी पत्नि से उस घटना के बारे में पूछा तो वो मुझे विस्मित नजरों से देखने लगी , उसकी आंखों में कुछ सवाल तैरने लगे । उसने मुझसे पूछा आपको उस हादसे के बारे में किसने बताया है ? मैने कहा आज जब मैं आपके भाई के साथ आपके खेतों में जा रहा था तो बस स्टैंड को देखकर मुझे वह दुर्घटना याद आ गई । उसने फिर पूछा उस दिन क्या आप मेरे गांव के बस स्टैंड पर थे ? मैने कहा मै उसी बस में था जो एक लडकी का काल बनी थी । दूसरी लडकी को सडक से मैने ही उठाया था । अब तो मेरी पत्नि की हालत देखने लायक थी वह कुछ बोलना चाहती थी मगर उसकी आवाज नही निकल पा रही थी बस उसके होंठ फडफडा रहे थे । उसने तुरंत अपने आपको संभाला और मुझसे कहने लगी क्या आप उस लडकी को अब पहचान लोगे । मैने कहा  मैने तो उस समय भी उसका चेहरा नही देखा था अब भला कैसे पहचान सकता हूं । पत्नि ने फिर शरारती व्यंग्य में मुझसे पूछा क्या आप उस लडकी से मिलना चाहते हो ? मैने कहा मिलने में तो कोई बुराई नही है हो सकता है वो लडकी भी मुझसे मिलना चाहती हो । पत्नि ने फिर मुझसे कहा अगर मैं उस लडकी से आपको मिला दूं तो आप मुझे क्या ईनाम दोगे ? मैने कहा सब कुछ तो आपको सौंप चुका हूं अब मेरे पास बचा ही क्या है ? इतना सुनकर उसकी आंखे भर आई और मेरी बांहों में सिमट कर बोली कितने भोले है आप जिसको छः महीने से दिल में बसा रखा है उसको पहचानते भी नही । मैने कहा दिल में बसने वाले अजनबी नही होते पगली । 
"आंखों से तो कोई भी औझल हो सकता है दिल से भला कौन निकल पाया है ।" 

सुप्रभात , जय भारत 

 


PostImage

Pankaj Lanjewar

May 4, 2024

PostImage

पेटगांव परिसरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा बळी


सिंदेवाही : ०४ मे २०२४

 


सिंदेवाही : तेंदूपत्ता हंगाम सुरू आहे. रोजी रोटी साठी हातावर पान असणारी जनता जीव मुठीत धरून तेंडु पत्ता संकलित करण्यासाठी जीवाचे रान करीत असल्याचे दिसून येते.


दिवसाचे रात्र करून तेंदू हंगामात दोन पैसे शिल्लक पाडण्याकडे तेंदू हंगाम करणाऱ्या जनतेचा कल दिसून येतो.

 

त्यामुळे नेहमीप्रमाणे आज दिनांक ०५ मे २०२४ रोजी  सकाळी दीपा दिलीप गेडाम नामक महिला राहणार बामणी माल तालुका सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर तेंदू पत्ता संकलन करण्यासाठी जंगलात गेली असता  ०८.३० च्या सुमारास दीपा तेंदू संकलन करण्यात गुंग झाली असता आणि सोबती थोडे लांब असल्याचा फायदा घेत पट्टेदार वाघाने दिपावर हल्ला करून दिपाला जागीच ठार केले.


सभोवतालच्या सोबत्यांना सदर घटना माहिती होताच एकच गोंधळ उडाला.


सदर घटना सिंदेवाही पोलीस ठाणे हद्दीत वन विभाग शिवणी कंपार्टमेंट नंबर ३२२ मधील पेटगाव खातेरा जंगल परिसरात घडली.

 

जमावाने संताप व्यक्त केल्याने आणि प्रेत नेऊ देण्यास मनाई केल्याने वनविभागाची धांदल उडाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता वनविभागाने सिंदेवाही पोलीस स्टेशनला माहिती दिली.


पोलीस निरीक्षक तुषार चव्हाण टीम सह तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन हाताबाहेर जात असलेल्या जमावाची वनविभागाच्या मार्फत समजून काढून संतापलेल्या जमावाला शांत केले आणि पंचनामा करून प्रेत ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे रवाना करण्यात आले.


सदर ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला असून परिसरात शांतता आहे. 


PostImage

Pankaj Lanjewar

March 19, 2024

PostImage

चिन्ह धनुष्यबाण... उमेदवार काँग्रेसचा आणि प्रचार करणार भाजप


*चिन्ह धनुष्यबाण... उमेदवार काँग्रेसचा आणि प्रचार करणार भाजप?*


🎯 *रोखठोक*
_रामटेक लोकसभा_
_नेत्यांचा फार्म्युला कार्यकर्त्यांना पचणार का?_

*केंद्रासह* देशातील विविध राज्यात भाजपची एकहाती सत्ता असतांना सुध्दा भाजपकडून सुरू असलेले नवनवे प्रयोग अनेकांच्या भुवया उंचावणारे आहे. वाढत्या पक्षप्रवेशामुळे मागील काळात 'काँग्रेस मुक्त' भारतचा नारा देणारा भाजप पक्ष आता स्वत:च 'काँग्रेस युक्त' होत असल्याचे शल्य कार्यकर्त्यांच्या मनाला बोचत आहे. रामटेकसाठी भाजपकडून सुरू असलेला प्रयोग 'न भुतो' ठरते की काय? कारण मागील दोन दिवसांपासून ज्यापध्दतीने राजकीय हालचाली सुरू आहेत. त्यानुसार शिंदेच्या धनुष्यबाण चिन्हावर काँग्रेसमधील एक आयात उमेदवार लढणार असुन त्याचा प्रचार माञ देशातील सर्वात शक्तीशाली पक्ष असलेला भाजप करणार असल्याचे चिञ आहे.
        रामटेकची जागा शेवटच्या क्षणापर्यंत भाजपच्या पदरात पडेल आणि उमेदवार म्हणून माजी आमदार सुधीर पारवे किंवा माजी जिल्हाध्यक्ष अरविंद गजभीये मैदानात उतरतील. असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांना आहे. माञ मागील दोन दिवसांपासून प्रत्येक तासाला धक्कादायक राजकीय घडामोडी घडत आहे. काँग्रेसचा एक आमदार गुरूवारला (दि.१३) विदर्भातील शिंदेसेनेची जबाबदारी सांभाळणा-या नागपूर येथील एका नेत्याच्या गृहभेटीला गेल्याची चर्चा आहे. याकरीता स्वत: कोराडीवरून 'फिल्डींग' लागल्याचेही सुञांनी सांगितले. त्यानंतर हाच आमदार राज्याचे उपमुख्यमंञी देवेंद्र फडणविस यांच्या नागपूर निवास्थानी सुध्दा पोहचला. कृपाल तुमाने यांच्या नावाला मतदारांकडून होणारा विरोध लक्षात घेत, काँग्रेसच्या एका 'इमेज डाऊन' आमदाराची शिंदेसेनेत 'एन्ट्री' करायची आणि त्याच्या हाती धनुष्यबान ठेवून रामटेकच्या गडावर चढवायचे. यासाठी भाजपने संपूर्ण ताकत लावायची. अशा प्रयोगाची आखणी कोराडीतून सध्या सुरू आहे. माञ त्यास कार्यकर्त्यांकडून मोठा विरोध आहे. उमेवार काँग्रेस मधून आलेला... त्याला चिन्ह द्यायचे शिंदेसेनेचे आणि मेहनत घ्यायची भाजपने? हा कुठला प्रयोग? असा संतत्प सुर निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांकडून होत आहे. महत्वाचे म्हणजे हा अफालातून प्रयोग करण्यामागचे कारण तरी काय? याचे उत्तर माञ कुणालाही मिळालेले नाही.

*_कार्यकर्त्यांनी कुणासाठी लढायच?_*

रामेटक लोकसभा क्षेञात शिवसेेनेचा सुपडासाफ आहे. त्यात सेनेत दोन गट पडल्यानंतर परिस्थीती आणखीनच बिघडली आहे. कुठलीही ताकत नसतांना सुध्दा मागील पंधरावर्षापासून केवळ सेनेच्या उमेदवारासाठी भाजप कार्यकर्ते निवडणुकीत राबत आहे. विजयी झाल्यानंतर माञ सदर खासदार कुणालाही 'मानत' नाही. राबणा-यांना सोडाच, ते मतदारांनाही विचारत नसल्याने भाजप कार्यकर्त्यांना मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागते. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी सेनेच्या उमेदवारासाठी कशाला राबायचे? असा संतप्त सुर उमटत आहे.

*_कुणी तिकीट देता का तिकीट?_*

शिंदे सेनेकडून रामटेक लढण्यासाठी धडपडत असलेला हा काँग्रेसचा 'इमेज डाऊन' आमदार खूद: काँग्रेससाठीच डोकेदुखी ठरला आहे? प्रारंभी त्याने काँग्रेसकडून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न चालविले. माञ पक्षनेत्यांसह सामान्य कार्यकर्त्यांचा विरोध होत असल्यामुळे दिल्ली हायकमांडने त्यास नकार दर्शविला. त्यामुळे आता काँग्रेसच्या या 'इमेज डाऊन' आमदाराने भाजपशी जवळीक साधत, पक्षप्रवेशासाठी तयारी दर्शविली. येथेही दुहेरी संकट ओढवले. कोराडीचा होकार असला तरी दिल्लीसह नागपूरच्या वाड्यावरून नकार असल्यामुळे शेवटी त्याला शिंदेसेनेचा पर्याय देण्यात आल्याचे सुञांनी सांगितले. एकंदरीत 'इमेज डाऊन'मुळे विधानसभेची पायरी चढणे कठीन होत असल्याने या आमदार महाशयाने लोकसभेची पायरी चढण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणने आहे.


PostImage

Pankaj Lanjewar

March 17, 2024

PostImage

बॅरिस्टर शेषराव वानखेडे महाविद्यालय येथे निरोप व सत्कार समारंभ साजरा


मोहपा
       गुरू विना ज्ञान नाही,
      गुरूच्या ज्ञानाला अंत नाही.
      गुरूने जिथे दिलं ज्ञान.
      तेच खरं तीर्थस्थान.
बॅरिस्टर शेषराव वानखेडे महाविद्यालय येथे निरोप व सत्कार समारंभ साजरा
                विद्यार्थ्या मध्ये अत्यंत लोकप्रिय असलेले सम्मानिय डॉ. संजय ठवळे सर यांचा आज दिनांक:- 17/03/2024 रोजी  निरोप व सत्कार समारंभ चा कार्यक्रम बॅरिस्टर शेषराव वानखेडे महाविद्यालय मोहपा या ठिकाणी आयोजित करण्यात आला.
या ठिकाणीं कार्यक्रमाचे अध्यक्ष सोमंकुवर सर . उपस्थित मान्यवर श्री. श्रावण दादा भिंगारे जी उपसभापती कळमेश्वर पंचायत समिती, श्री. विजय जी वानखेडे माजी नगर सेवक नगर परिषद मोहपा. श्री.ज्ञानेश्वर जी काळे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती. एडवोकेट लंकेशजी गजभिये, डॉ. वडते सर. कार्यक्रमाचे आयोजन माजी विद्यार्थी महेंद्र खाटीक, उमेश भेलकर, सुनिल बनसोड, राहुल श्रीखंडे, अतुल चर्जन, गोलू टेकाडे,सचिन बनसोड, राहुल श्रीखंडे, प्रितम वाराडे, प्रगट सिंग बावरा, संगिता टुले, सुवर्णा तपासे, योगिता दहाट,प्रिती तभाने, कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ. छाया काळे मॅडम यांनी केले.
यावेळी पंचायत समिती कळमेश्वर चे उपसभापती श्री.श्रावण दादा भिंगारे जी, विजय जी वानखेडे, सोमंकुवर सर, डॉ.वडते सर,राहूल श्रीखंडे, प्रिती तभाने, महिंद्र खाटीक, प्रगट सिंग बावरा यांनी आपल्या लाडक्या गुरूजी विषयी भाषणाच्या माध्यमातून आप आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

यावेळी उपस्थित सर्वच विद्यार्थ्याने ठवळे सर यांचा गिफ्ट देऊन सत्कार केला. श्री. ठवळे सर हे इतिहास या विषयाचे प्राध्यापक होते. श्री. ठवळे सर यांनी संपुर्ण विद्याथ्र्यांचे आभार मानले. भाषना दरम्यान श्री. ठवळे सर विद्यार्थ्यांचं आपल्या विषयी प्रेम पाहून अत्यंत भाऊक झाले.
चंदू मडावी


PostImage

Pankaj Lanjewar

Nov. 3, 2023

PostImage

राट्रिय इंटर कॉलेज हाददीपुर परिसर तंबाकू मुक्त घोषित


आज दिनांक 3 अक्टूबर 2023 को राजकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय सोलपुर व राष्ट्रीय इंटर कॉलेज हाददीपुर के परिसर को तंबाकू मुक्त परिसर घोषित किया। राज्य के उच्चतर माध्यमिक विद्यालय सोनपुर व राष्ट्रीय इंटर कॉलेज हददीपुर हरिद्वार में आयोजित राष्ट्रीय तंबाकू नियंत्रण टीबी,जागरूकता कार्यक्रम में स्वास्थ्य विभाग से विनोद कुमारी व सहयोगी संस्था बहुउदय लोक सेवा संस्थान हरिद्वार, विनोद कुमारी ने बताया कि तंबाकू से बना हर उत्पाद मनुष्य के शरीर को नुकसान पहुंचता है तंबाकू 7000 रासायनिक पदार्थों से मिलकर बनाया जाता है निकोटीन की मात्रा होती है।

तंबाकू चबाना ओरल कैंसर के लिए सबसे बड़ा जोखिम बन सकता है तंबाकू चबाने से या सिगरेट बीड़ी की वजह से ओरल कैंसर का खतरा बढ़ जाता है।

इसके अलावा किसी भी तरह के कैंसर की बड़ी वजह  है इसके साथ ही डाइट में आ रहे बदलाव कैंसर का जोखिम पैदा कर सकते हैं। लउत्पादों की बिक्री पर प्रतिबंध , धारा 6ख शिक्षा संस्थानों के 100 गज के भीतर तंबाकू उत्पादों की बिक्री दंडनीय है उल्लंघन करने पर ₹200 तक का जुर्माना  हो सकता है।

 कॉलेज के प्रधानाचार्य श्री जितेंद्र सिंह, चंद्रभान भास्कर, दीपक कुमार सैनी , श्रीमती शरद सैनी ,दीपक सैनी विनोद कुमारी, सलाम मुंबई फाउंडेशन एनएसएफ की सहयोगी संस्था बहुउदय लोक सेवा संस्थान के अध्यक्ष मनोज कुमार पाल। छात्र-छात्राओं को राष्ट्रीय तंबाकू नियंत्रण जागरुकता कार्यक्रम में प्रसन्न  उत्तर कार्यक्रम में पुरस्कार देकर सम्मानित किया गया ।


PostImage

Pankaj Lanjewar

Oct. 21, 2023

PostImage

कर्म का महत्व


 

कर्म का महत्व  

 जीवन में कर्म का महत्व सर्वविदित है, योगी कृष्ण ने तो यहाँ तक कहा कि मनुष्य का अधिकार केवल कर्म पर है , फल पर उसका अधिकार नही है .

मनुष्य को अपना कर्म करना चाहिये और फल की इच्छा और चिंता नही करनी चाहिये. प्लेटो के विख्यात ग्रंथ 'दि रिपब्लिक'के अत्यंत दीर्घ व्याख्यान का सार भी यही है कि हर मनुष्य को अपना काम करना चाहिये.

पंच तंत्र की कथाओं में भी अपने काम के महत्व को बताया गया है. उपनिषदों में तो सत्कर्म की शिक्षा दी गयी है. परन्तु क्या आज हम अपने देश में इन शिक्षाओं को लोगों को अपनाते या पालन करते हुये पाते हैं. प्लेटो अपने काम को करने को ही न्याय(धर्म) बताता है.

हमारे यहाँ इसी को जीवन का लक्ष्य माना गया है. पर वास्तव में क्या होता है ? हम फल की इच्छा , कामना करते है और उसी की प्राप्ति के लिये काम करते हैं.

बच्चे शिक्षा के लिये नहीं पढ़ते है वो केवल अधिक से अधिक नंबरों के लिये पढ़ते है. वो कैसे भी प्राप्त किये जाएं. वहीं वे अपने कर्म से विमुख होजाते हैं और फल , कभी कभी तो केवल और केवल फल के पीछे भागने लगते हैं.

अक्सर बहुत से विद्यार्थी इसके लिये गलत रास्ते भी अपना लेते हैं. 


PostImage

Pankaj Lanjewar

Sept. 13, 2023

PostImage

कुही शहरात माझी वसुंधरा अभियान,जनजागृती  


नगरपंचायत कुही
जि. नागपूर
ULB CODE - 900307                                                                                                                                                                   स्वच्छ भारत अभियान 2.0♻️
🔎स्वच्छ सर्वेक्षण 2024🔎
🌲🌏माझी वसुंधरा अभियान 4.0🌏🌲
👉Awareness जनजागृती                                                                                                                                                                 🌺 स्वच्छ कुही ,सुंदर  कुही,🌳🌳हरित  कुही 
🌳🌱🌴☘️🌿🍀🌱🌳
आपले प्रत्येक सण आणि उत्सव हे पर्यावरणपूरक पध्दतीने साजरे होणे आवश्यक आहे. अगदी काही दिवसांवर येउन ठेपलेला गणेशोत्सव सुध्दा पर्यावरणपूरकच असायला हवा, कारण पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही काळाची गरज आहे. पर्यावरणाची काळजी घेऊन आपल्याला गणेशोत्सव साजरा करता येईल.
यासाठी आपल्याला काळजी घ्यावी लागेल.
• पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. पण या प्रयत्नात आपण आपलाही सहभाग नोंदवूया.
• आपण आपले सगळे उत्सव आणि सण यापुढे पर्यावरणपूरक पध्दतीने साजरे व्हावे यासाठी आग्रह धरुया.
• पर्यावरणाचे रक्षण करण्याची राज्य शासनाची जबाबदारी असली तरी पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे.
• कोणतेही सामाजिक बदल आपल्याला आत्मसात करण्यासाठी वेळ लागतो, पण आपली मानसिकता आपण बदलली तर आपण नक्कीच बदल घडवू शकतो.
•  हा उत्सव हा पारंपरिक पद्धतीने साजरा करताना तो पर्यावरणपूरक पद्धतीनेही साजरा करण्याचा आग्रह धरुया.
• शांततापूर्ण वातावरणात, सुरक्षाविषयक सर्व प्रकारची काळजी, ध्वनी प्रदूषणविषयक सर्व कायदे काटेकोरपणे पाळून हा उत्सव साजरा करुया..
• गणेशोत्सव घरगुती आणि सार्वजनिक स्वरुपात साजरा केला जातो. तो साजरा करीत असताना पर्यावरणपूरक होईल, तसेच या कालावधीत पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनाची काळजी घेतली जाईल, हे पाहणे आपल्या सर्वांचे नैतिक आणि राष्ट्रीय कर्तव्य आहे.
• गणेशोत्सव काळात होणारा थर्माकोल आणि प्लॅस्टिकचा वापर पर्यावरणाला हानी पोहचवत असल्यानं तो कटाक्षाने टाळायला हवा. प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती, तसेच मोठय़ा आकाराच्या मूर्तींमुळे विसर्जनाच्यावेळी होणारे पाण्याचे प्रदूषण जैवविविधतेला गंभीर धोका निर्माण करणारे असते, त्यामुळे त्याचाही आज गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. ध्वनीक्षेपक आणि डॉल्बीसारख्या मोठय़ा आवाजातील वाद्यांमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाने मानवी आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होत असतात.
• कागदाच्या लगद्यापासून गणपतीच्या सुंदर मूर्ती बनविल्या जातात. या मूर्ती पाण्यात अगदी सहजपणे विरघळतात. या मूर्तीना रंगविण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर केला जातो. इकोफ्रेंडली गणपती तयार करताना कागद, टिश्यूपेपर, माती, वॉटरकलर, भाज्यांपासून तयार केलेले रंग, डिंकापासून बनविलेला गम, कापड इत्यादी साहित्य लागते.
• पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आपण स्वत:सह अधिकाधिक लोकांना प्रोत्साहित करा. गणेशोत्सव हा आपल्या अस्मितेचा, परंपरेचा आणि संस्कृतीचा ठेवा आहे. गणपतीच्या मूर्ती पर्यावरणपूरक असल्यास गणपतीचे विर्सजन केल्यानंतर या मूर्ती तत्काळ विसर्जित होतात. म्हणूनच आपण प्रत्येकाने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर द्या.
• गणपती विसर्जित केल्यावर गणपतीच्या मूर्तीची आणि निर्माल्य यांची होणारी दशा आपण पाहतो. यामुळेच आपला दृष्टीकोन बदलून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होणे आवश्यक आहे. वाढते प्रदूषण, जागतिक तापमानवाढ आणि वाढते नदी प्रदूषण व त्याचे होणारे परिणाम या पार्श्वकभूमीवर "पर्यावरणपूरक गणेशोत्सवा'चा नवा मूलमंत्र आपण जपणे आवश्यक आहे.
• गणेशोत्सवाच्या काळात ध्वनी आणि जलप्रदूषण मोठया प्रमाणावर होते. हे प्रदूषण थांबविणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही संकल्पना पुढे आली.  निर्माल्य व गणेशमूर्ती नदीत विसर्जित केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण होते; पण दर वर्षीप्रमाणे निर्माल्यसाठी कलश व गणेश मूर्ती विसर्जित करण्यासाठी कृत्रीम हौदांचा पर्यायही अनेक ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत असल्याने जलप्रदूषण रोखण्यास मदत होते.
• गणेशोत्सवाच्या काळात आपले महाराष्ट्र पोलीस सतर्क असते. त्यामुळे पोलिसांना सहकार्य करा.
• पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत समाजात अजून प्रबोधन होणे आवश्यक आहे. इकोफ्रेंडली गणपतींमुळे खरोखरच पर्यावरणाचा समतोल राखला जातो. पर्यावरणाचे महत्त्व लोकांना समजू लागल्याने इकोफ्रेंडली गणेशमूर्तीच्या संख्येत वाढ होत आहे.
• वाढते प्रदूषण, पर्यावरणाचा ऱ्हास, ग्लोबल वॉर्मिंग आदींमुळे सजीवसृष्टीपुढे अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. प्रदूषण थांबवून पर्यावरणाचा समतोल राखण्याचे आव्हान आपल्यापुढे उभे आहे. पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून सर्वांनीच आपला आनंद द्विगुणीत केला पाहिजे.
गणेशोत्सवाचा खरा उद्देश सफल करण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पर्यापरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे ही काळाची गरज बनली आहे. गणेशोत्सवाचे पावित्र्य आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्याची जबाबदारी आपलीच आहे. चला तर मग यावर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचा संकल्प करूया.


PostImage

Pankaj Lanjewar

Sept. 7, 2023

PostImage

भगवान श्रीकृष्णाचे आयुष्य


कृष्णाला बर्‍याच गोष्टी मिळाल्या नाहीत. त्याच्या जन्मानंतर तो लगेच आई वडिलांपासून वेगळा झाला, नंतर नंद-यशोदा भेटले, पण आयुष्यातून ते ही गेले. राधा गेली. गोकुळ गेलं. मथुरा गेली. त्याचं आयुष्यात काही ना काही निसटतचं गेलं. कृष्णाने आयुष्यभर त्याग केला, तो पण अगदी आनंदाने. ज्याला कृष्ण समजला त्याच्या आयुष्याचा सोहळा झाला. आयुष्यात काही सोडावं लागलं तरीही खुश कसं रहायचं? हे कृष्ण शिकवतो. कुरुक्षेत्रावरच्या कृष्णनीतीपेक्षा या गोष्टी जास्त व्याकुळ करतात. आयुष्यात बाकी काही जमलं नाही तरी, कृष्ण बनून हातातून निसटलेल्या गोष्टींचा, क्षणांचा, स्वप्नांचा, आठवणींचा सोहळा करता आला पाहीजे.........
पहिली शिवी दिल्यानंतर मुंडके छाटण्याची शक्ती असून देखील नव्व्याण्णव आणखीन शिव्या ऐकण्याची क्षमता ज्याच्यात आहे तो कृष्ण आहे, सुदर्शन चक्रासारखे शस्त्र जवळ असून देखील हातात नेहमी बासरी आहे तो कृष्ण आहे, द्वारकेसारखे वैभव असून देखील सुदामासारखा मित्र आहे तर तो कृष्ण आहे, मृत्यूच्या फण्यावर उभारलेला असून देखील जो नृत्य करतो तो कृष्ण आहे, सर्वसामर्थ्यवान असून देखील जो सारथी बनला तो कृष्ण आहे.

"🌺सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा🌺"
🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩
🌺पंंकज ज्ञानेश्वर लांजेवार🌺


PostImage

Pankaj Lanjewar

Sept. 3, 2023

PostImage

नेरचे भूमिपुत्र डॉ. आर. टी. बोरसे यांनी क्षयरोग ( टी. बी.) आजारावर संशोधन केल्यामुळे नेर ग्रामस्थांतर्फे सत्कार


 

  नेर- पुणे येथील ससून रुग्णालयाचे एच.ओ. डी. व नेरचे भूमिपुत्र डॉ. आर. टी. बोरसे यांनी क्षयरोग ( टी. बी.) व एच. आय. व्ही. या आजारावर प्रतिबंधात्मक म्हणून अँटी रिप्ट्रो वायरस ट्रीटमेंट शोधून काढली, त्यामुळे देशातील व जगभरातील अनेक रुग्णांना जीवनदान मिळणार आहे.  हे काम मोलाचे व अभिमानास्पद आहे. यापूर्वी स्वाईन फ्लू या साथीच्या आजाराच्या वेळी ही त्यांनी मोठे योगदान दिले होते. त्यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल  यांनी त्यांचे कौतुक करून सत्कार केला होता. आज नेर येथे त्यांच्या निवासस्थानी आले असता त्यांचे अभिनंदन व सत्कार करतांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू व नेरचे भूमिपुत्र डॉ.योगेंद्र नेरकर व नेर चे माजी सरपंच शंकरराव खलाणे, निवृत्त बँक अधिकारी प्रकाश खलाणे, माजी ग्रा. पं. सदस्य आर. डी. माळी,सुरेश सोनवणे,भाजपचे गुलाबराव बोरसे, विद्युत कर्मचारी सदाशिव सोनवणे,पत्रकार संतोष ईशी, सुरज खलाणे  व राकेश अहिरे आदी.


PostImage

Pankaj Lanjewar

Aug. 31, 2023

PostImage

शेतकऱ्यांना दिवसा सुरळीत विद्युत पुरवठा होईल यासाठी केला रास्ता रोको आंदोलन -उप अभियंता राजपुत यांचे लेखी आश्वासन


 धनच बु. सर्कल मधील धनज खुर्द बस स्थानक येथे जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर डोईफोडे यांच्या नेतृत्वात  शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन करून महावितरण कंपनी ला वेठीस धरून  शेतीसाठी व्यवस्थित लाईन पुरवठा मिळावा भारणीयमन कमी करावे माळेगाव येथील सब स्टेशनचे काम तातडीने सुरू करावे शेतीसाठी विद्युत पुरवठा दिवसा मिळावा संदर्भात इतर मागण्यासह धनज खुर्द बस स्टॉप वरती रास्ता रोको करून  तीव्र आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला आटोक्यात आणण्याकरिता धनज पोलीस स्टेशन येथील  पीएसआय योगेश इंगळे यांच्या नेतृत्वात सर्व पोलीस कर्मचारी तसेच प्रशासकीय कर्मचारी यांनी या आंदोलनाला उपस्थिती दर्शवून या आंदोलनाच्या मागण्या उपअभियंता राजपुत साहेब महावितरण कंपनी कारंजा यांनी लेखी स्वरूपात आश्वासन देवुन  शेतकऱ्यांना दिवसा विद्युत पुरवठा केल्या जाईल व विद्युत पुरवठा खंडित झाल्यास तेवढाच विद्युत पुरवठा वेळ वाढवुन देऊन शेतकऱ्यांना पूर्ण काळ दिवसाविद्युत पुरवठा  सुरळीत देण्यात येईल असे लेखी आश्वासन राजपूत साहेब व कटके साहेब यांनी पूर्व वत व सुरळीत देण्यात येईल असे लेखी आश्वासन राजपूत साहेब व कटके साहेब यांनी या आंदोलनाचे प्रणेते श्री चंद्रशेखर डोईफोडे यांना लेखी स्वरूपात दिले त्यामुळे  धनज जिल्हा परिषद सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर डोईफोडे यांचे सर्व विभागीय स्तरातून कौतुकांचा वर्षाव त्यांच्यावर होत आहे या आंदोलनात प.सद्स्य मयूर मस्के, उमेश बोरेकर, निलेश टेकाडे, अंकुश भेंडे सरपंच ,प्रमोद साठोडे,सरपंच धनराज खिराडे सरपंच,शिशिर ठाकरे, नितीन ठाकरे,निलेश जाधव,अमोल घेटे प्रमोद बोथरा,जयेश बोथरा, रोशन ठाकूर,संजय गुल्हाने,आदी सह शेकडो शेतकरी उपस्थिती होते.


PostImage

Pankaj Lanjewar

Aug. 31, 2023

PostImage

रक्षाबंधन एका आगळ्यावेगळ्या प्रकारे खाकी वर्दीतले कर्मचारी यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरी.


 

माजलगाव दि.30.08.2023. माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे खाकी वर्दीतले सर्व कर्मचारी यांना दरवर्षीप्रमाणे बहिन भावाचं नातं  जपण्यासाठी ममता  दता शिंगाडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महिला शहराध्यक्ष व संध्याताई भांडेकर यांनी राखी बांधून सर्व पोलीस कर्मचारी यांना रक्षाबंधन साजरी केले. भारतीय संस्कृती प्रमाणे बहिणीचे रक्षण भावाने करावे प्रत्येक सुखा दुःखात भावाने धावून यावे यासाठी राखी रुपी धागा बांधून तुम्ही माझं रक्षण करावं असा अनन्य साधारण महत्व या राखी पौर्णिमेला दिला जातो यासाठी कितीही लांबची बहीण मानलेली असो सखी असो या गुरु बहीण आसो बहीण भावासाठी राखी बांधण्यासाठी आपल्या माहेराकडे येऊन राखी बांधत असते आपल्या भावासाठी बहीण देवाकडे मागणं करीत देखील तेव्हा माझ्या भावाला सुखाचे ठेव. प्रत्येक संकटकाळी माझ्यासाठी उभा राहील अशी ताकद माझ्या भावाला दे असं प्रत्येक बहिणीला वाटतं जो भाव बहिणीचे प्रेम टिकून ठेवत आहे भारतीय संस्कृती आज पण जशास तसे टिकून आहे. माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथील डी वाय एस पी श्वेता खाडे पीएसआय गांजले सर पीएसआय रंजीत कासले सर सह पोलीस निरीक्षक संजय राठोड सह पोलीस निरीक्षक उबाळे सर पोलीस पीएसआय ऐटवार नाना पीएसआय गिलबिले सर या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना ममता दत्ता शिंगाडे व संध्याताई भांडेकर यांनी दरवर्षीप्रमाणे सर्व पोलीस कर्मचारी यांना ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये जाऊन रक्षाबंधन हा सण साजरा केला.


PostImage

Pankaj Lanjewar

Aug. 31, 2023

PostImage

सेलू येथील लहान विद्यार्थिनीनी पोलिस कर्मचारी बांधवाना राखी बांधून रक्षा बंधन केले साजरे.


सेलू येथील लहान विद्यार्थिनीनी पोलिस कर्मचारी बांधवाना राखी बांधून रक्षा बंधन केले साजरे.

 

सेलू : दि.30 ऑगस्ट 2023 बुधवार रोजी सौ.सावित्रीबाई बद्रिनारायणजी बिहाणी नूतन प्राथमिक शाळेतील कब आणि बुलबुल  पथकातील विद्यार्थ्यांनी सेलू पोलीस स्टेशन येथील पोलीस कर्मचारी बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांच्या परवानगीने हा कार्यक्रम पार पडला. तसेच या कार्यक्रमाला पंजाब येथून व्हीजीटसाठी आलेले गुरमित सिंग, सुरेंद्र सिंग हेही उपस्थित होते. दामिनी पथक प्रमुख सौ.मोरे मॅडम, पो.हे.काँ. ममिलवाड, पो.हे.काँ. जाधव , पो.हे.काँ. मुंडे उपस्थित होते.हा कार्यक्रम घेण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक बेंडसुरे एस.डी. जेष्ठ शिक्षक रत्नपारखी ए. पी. व पांडे यु.जी.यांचे मार्गदर्शन लाभले. संचलन सौ.कुबरे एस.एस.यांनी केले.या कार्यक्रमासाठी महामुनी डी. पी. व सौ. कुंभार आर.डी. यांनी सहकार्य केले.


PostImage

Pankaj Lanjewar

Aug. 9, 2023

PostImage

अल्पवयीन मुलीचा वेश्याव्यवसाय संबंधी व्हिडिओ वायरल करू नका


*अल्पवयीन मुलीचा वेश्याव्यवसाय संबंधी व्हिडिओ  वायरल करू नका : रविंद्र शिंदे*

*या प्रकरणी कुणीही व्हिडिओ वायरल केला असल्यास गुन्हा नोंदवून कडक कारवाई करावी; पोलीस विभागाकडे मागणी*

भद्रावती : सोशल मीडिया वर वरोरा मधील एका अल्पवयीन मुलीचा वेश्याव्यवसाय संबंधी व्हिडिओ फिरत असून कोणत्याही अल्पवयीन मुलीचा व्हिडिओ काढणे, इतरांना पाठवणे, साठवणे कायद्याने गुन्हा आहे. 

याबाबत शिवसेना (उबाठा) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी आवाहन केले आहे की, सदर व्हिडिओ ज्यांच्याकडे असेल त्यांनी सोशल मीडियावर कुणालाही पाठवू नये आणि मोबाईल मधला व्हिडिओ डिलीट करावा.

सर्व सामाजिक संस्था, समाजातील सर्व घटक तसेच सुजान भारतिय नागरीक, यांनी लक्ष देवून असा प्रकार रोखावा असेही या आवाहना दरम्यान रविंद्र शिंदे म्हणाले.

या प्रकरणी ज्या कुणी सदर खोडसाळ प्रकार करून सोशल मीडिया वर त्या अल्पवयीन मुलीचा वेश्याव्यवसाय संबंधी व्हिडिओ  वायरल केला असेल, त्याच्यावर गुन्हा नोंदवून कड़क कारवाई करावी, असे रवींद्र शिंदे यांनी म्हटले आहे.
--------------------------------------
*एक अल्पवयीन मुलीचा व्हिडीओ वायलर केलेला जो कुणीही व्यक्ती असो, ज्यांनी हा घाणेरडा प्रकार केला आहे, समाजाचे हित लक्षात घेता, एक सुजान नागरीक म्हणून यात कोणीही व्यक्ती असो यांचे विरोधात मी कायदेशीर तज्ञांचे मार्गदर्शन घेवुन  कारवाई करणार, भविष्यात असे प्रकाराची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती नको : रविंद्र श्रीनिवास शिंदे*