संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
F
06-02-2025
गडचिरोली : माझ्याशी बोलली नाहीस,तर बघ तुझे काय हाल करतो, तुला चपलेले मारहाण करीन, मारून टाकीन, असे मेसेज धाडून धमकी देणाऱ्या तरुणाने युवतीला मैदानावर गाठून मोबाइल हिसकावून नेला. मोबाइल आणण्यासाठी ती त्याच्या खोलीवर गेली असता, त्याने तिला बेदम मारहाण केली. शहरातील रामनगर भागात ही घटना घडली. याप्रकरणी फेब्रुवारीला गडचिरोली ठाण्यात विनयभंग व मारहाण केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला.
पीडितेच्या फिर्यादीनुसार, तिची या तरुणाशी चार वर्षापासून ओळख असून, दोन वर्षापासून प्रेमसंबंध आहेत. मात्र, अनेकदा तरुण तिच्याशी वाद घालायचा. १ फेब्रुवारी रोजी युवतीने त्याचा क्रमाक ब्लॉक केला, त्यानंतर त्याने वारंवार कॉल करण्याचा प्रयत्न केला. शिवाय टेक्स्ट मेसेज पाठवून तिला जीवे मारण्याची धमकी दिली. ४ फेब्रुवारी रोजी युवती नित्याप्रमाणे सकाळी सहा वाजता जिल्हा क्रीडा संकुलावर सरावासाठी गेली असता, तेथे येऊन त्याने तिचा मोबाइल हिसकावून नेला. उपनिरीक्षक माधुरी मिसाळ तपास करीत आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित २० वर्षीय युवती व आरोपी ३३ वर्षीय तरुण हे दोघेही कोरची तालुक्यातील असून, नातेवाईक आहेत.
● युवती शहरातील लांझेडा रोडवरील आदिवासी वसतिगृहात राहून एका खासगी महाविद्यालयात बीए द्वितीय वर्षात शिक्षण घेते व पोलिस भरतीचीही तयारी करते, तर आरोपी देखील पोलिस भरतीची तयारी करतो.
कोवेंनी दिला धीर
पीडित युवती मानसिक तणावात होती. माहिती मिळताच राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) नेत्या डॉ. सोनल कोवे यांनी वसतिगृहात धाव घेतली. पीडितेला उपचारासाठी साहाय्य केले. डॉ. सोनल व डॉ. चेतन कोवे यांनी तिला धीर दिला. पो. नि. रेवचंद सिंगनजुडे यांनी पीडितेचे समुपदेशन करून संवेदनशीलपणे प्रकरण हाताळले.
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Education
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Health
Vaingangavarta19
Local News
No Comments