आयुर्वेदिक पंचकर्म मल्टीस्पेशलिटी क्लिनिक
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
F
05-02-2025
आरमोरी, (ता.प्र). आरमोरी तालुक्यातील वैरागडमध्ये खुलेआम ऑनलाइन सट्टा सुरू असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे आरमोरी पोलिसांनी छापा टाकून सट्टेबाजी करणाऱ्या एका आरोपीला अटक केली, तर दुसरा आरोपी पळूनजाण्यात यशस्वी झाला. सदर कारवाई सोमवारी (दि.3) सायंकाळच्या सुमारास पार पडली आहे. यात 12 हजारांचा मद्देमाल जप्तकरण्यात आला. अंकित माधव पिठाले (24) रा. वैरागड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून शरद मेश्राम (40) रा. काळागोटा असे फरार आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील वैरागड येथे अवैधरित्या ऑनलाईन सट्टा सुरु असल्याची माहिती आरमोरी पोलिसांना प्राप्त झाली.
या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने सोमवारी, सायंकाळच्या सुमारास मच्छीमार सोसायटीमागील खुल्या परिसरात चालणाऱ्या ऑनलाईन सट्ट्यावर धडक कारवाई केली. यावेळी पथकाने अंकित पिठाले यास अटक केली. त्याच्याजवळून रोख रक्कम, मोबाइलसह अन्य साहित्य असा एकूण 12 हजार 78 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी अन्य एक आरोपी फरार आहे. दोन्ही आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कारवाई आरमोरी पोलिस करीत आहेत.
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Education
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Health
Vaingangavarta19
Local News
No Comments