RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
F
24-01-2025
संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणी आरोपी असलेला आरोपी वाल्मिक कराड आणि बीड पोलिसांची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
बीड : वाल्मिक कराड आणि बीडमधल पोलिस अधिकाऱ्यांची कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही ऑडिओ क्लिप बनावट नोटा प्रकरणात आरोपी असलेल्या सनी आठवले या आरोपीने स्वतःच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे. या ऑडिओ क्लिपमधून वाल्मिक कराड बीड जिल्हा पोलीस दलात हस्तक्षेप कशा पद्धतीने होता हे यातून दाखवण्याचा प्रयत्न केलाआहे. या ऑडिओ क्लिपची न्यूज 18 लोकमत पुष्टी करत नाही
संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणी आरोपी असलेला आरोपी वाल्मिक कराड आणि बीड पोलिसांची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये कराड आणि पोलिसांमधील संवाद असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. हा ऑडिओ सोशल मीडियावर चांगलाचा व्हायरल झाला आहे.
कोण आहेत पोलिस अधिकारी?
वाल्मिक कराड आणि बीड शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ यांचा ऑडिओ कॉल सध्या व्हायरल होतोय. या मोबाईल कॉलमध्ये गुन्हेगार सनी आठवले याच्यावर कारवाई करू नका. त्याला कशात गुंतवू नका. तो सध्या माझ्याकडे कार्यरत नसला तरीही तो माझ्या भावासारखा आहे. सध्या स्थानिक राजकारणामुळे योगेश आणि त्याचे जमत नाही म्हणून तो सध्या तिकडे गेला आहे, असा संवाद व्हायरल झाला आहे.
पोलिस अधिकारी काय म्हणाले?
सनी हा सराईत गुन्हेगार आहे. आणि त्याच्या संबंधी वाल्मीक कराड आणि पोलीस निरीक्षक शितकुमार बल्लाळ यांच्यात थेट संवाद झाला असल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान सदर क्लिप खोटी आहे. क्लिपमधील संवाद माझा नाही. सनी आठवले हा गुन्हेगार आहे. त्याचा भाऊ देखील गुन्हेगार आहे. सनी आठवले सध्या फरार आहे. यातील आवाज माझा नाही. याप्रकरणी मी गुन्हा दाखल करणार आहे, असे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ म्हणाले.
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Education
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Health
Vaingangavarta19
Local News
No Comments