अमित मेडिकल स्टोर & निर्मल जल, गडचिरोली
निर्मल जल शुद्धतात का वादा
F
24-01-2025
Walmik Karad | बीड (Beed) मस्साजोगचे (Massajog) सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला वाल्मिक कराडचा आणखी एक धक्कादायक कारनामा समोर आला आहे. सामाजिक कार्यकर्ते भैया पाटील (Bhaiya Patil) यांनी वाल्मिक कराडने अनेक पोलिसांना (Police) नव्या कोऱ्या बुलेट (Bullet) आणि आयफोन (iPhone) वाटल्याचा गंभीर आरोप केला आहे. (Walmik Karad )
“पोलीस (Police) वाल्मिक कराडच्या (Walmik Karad) ताटाखालचे मांजर”
भैया पाटील (Bhaiya Patil) यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून पोस्ट करत हा खळबळजनक आरोप केला आहे. “आज या क्षणापर्यंत बीड (Beed) व परळीतील (Parli) पोलीस प्रशासन हे मुंडे (Munde) व कराड (Karad) यांच्या ताब्यात आहे. गेल्यावर्षी वाल्मिकने अनेक पोलिसांना (Police) नव्या कोऱ्या बुलेट (Bullet) परळीतून (Parli) दिल्या. त्याच बुलेट घेऊन आज हे पोलीस (Police) गुन्हेगारांच्या (Criminals) इशाऱ्यावर नाचत आहेत. तसेच बुलेटसोबत नवीन आयफोन (iPhone) सुद्धा बऱ्याच पोलिसांना (Police) वाल्मिकने दिले आहेत,” असा आरोप त्यांनी केला आहे.
पीआय पाटीललाही (PI Patil) बुलेट (Bullet) आणि आयफोन? (iPhone)
“काल सीसीटीव्हीमध्ये (CCTV Footage) वाल्मिकसमोर गोंडा घोळणारा पीआय पाटील (PI Patil) याला सुद्धा नवी कोरी बुलेट (Bullet) व आयफोन (iPhone) वाल्मिकने (Walmik Karad ) दिलेला,” असा खळबळजनक दावाही भैया पाटील (Bhaiya Patil) यांनी केला आहे.
“गुन्हेगारांना फाशी द्या, पोलिसांना बडतर्फ करा”
“बीडमध्ये (Beed) एखादा मर्डर (Murder) करायचा असेल तर हे गुन्हेगार (Criminals) पोलिसांना (Police) सोबत घेऊन मर्डरचे कृत्य करतात. त्यामुळे पीआय महाजन (PI Mahajan) व पीआय पाटील (PI Patil) यांना सहआरोपी करायला हवे,” अशी मागणी करत, “जातीच्या नावाने गुन्हेगारांचे समर्थन करणाऱ्या लोकांप्रमाणे आम्ही नाहीत. आमची मागणी आहे या गुन्ह्यात पीआय पाटील (PI Patil) व पीआय महाजन (PI Mahajan) यांचा सहभाग आहे, हे नीच आमच्या जातीचे असो किंवा कोणत्याही जातीचे असो, यांना फाशी द्या. बाकी परळीतून (Parli) ज्या पोलिसांना (Police) बुलेट (Bullet) दिल्यात, आयफोन (iPhone) दिलेत त्या पोलिसांना जिल्ह्याच्या बाहेर हाकलून द्या किंवा हे वाल्मिकचे पोलीस म्हणून काम करत असतील तर त्यांना बडतर्फ करा,” अशी संतप्त मागणी भैया पाटील (Bhaiya Patil) यांनी केली आहे.
आरोपांमुळे खळबळ
दरम्यान, वाल्मिक कराड , सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) आणि प्रतीक घुले (Pratik Ghule) हे तिघे आवादा कंपनीकडे (Aavada Company) खंडणी (Extortion) मागितल्याच्या दिवशीचे, म्हणजे २९ नोव्हेंबर २०२४ चे, सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) समोर आले आहे. या फुटेजमध्ये ते एकाच ठिकाणी दिसत आहेत. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय (Close Aide) असल्याचे बोलले जाते. त्यामुळे संतोष देशमुख (Santosh Deshmukh) खून प्रकरण आणि खंडणी प्रकरणाचा (Extortion Case) पोलीस तपास योग्य दिशेने व्हावा, यासाठी विरोधक (Opposition) धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) राजीनाम्याची (Resignation) मागणी करत आहेत. त्यातच आता भैया पाटील (Bhaiya Patil) यांच्या या गंभीर आरोपांमुळे खळबळ उडाली असून, प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.
निर्मल जल शुद्धतात का वादा
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Education
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Health
Vaingangavarta19
Local News
No Comments