संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
F
16-01-2025
आरमोरी, (ता. प्र.). मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरमोरी पोलिसांचे पथक आरमोरी-गडचिरोली मार्गावर सापळा रचून असताना एका संशयित दुचाकीस्वाराला थांबवून चौकशी केली असता, त्याच्याकडे विक्रीसाठी अवैध सिंधी आढळून आली. पोलिसांनी सिंधी व दुचाकी असा एकूण 55 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी (दि. 15) केली. याप्रकरणी सतीश याडय्या पोडीचेट्टी (29, रा. कंटगगुर, जि. नालगुंडा तेंलगणा, ह.मु. अरसोडा आरमोरी) याला ताब्यात घेतले.
आरमोरी पोलिसांचे पथक आरमोरी गडचिरोली मार्गावर गस्त घालताना, टीएस-05 इजी-5610 क्रमांकाचीदुचाकी संशयितरित्या येताना दिसून आली. पोलिसांनी दुचाकीस्वाराला थांबवून चौकशी केली असता, 84 प्लास्टिक बॉटलमध्ये 8 हजार 400 रुपये किंमतीची 84 लीटर सिंधी, प्लास्टिक कॅनमध्ये 1 हजार 500 रुपये किंमतीची 15 लीटर सिंधी, सिंधीच्या वाहतुकीसाठी वापरलेली 35 हजार रुपये किंमतीची दुचाकी, 40 लीटर क्षमतेच्या प्लास्टिक ड्रममध्ये भरलेली 3 हजार रुपये किंमतीची सिंधी, प्लास्टिक कॅनमध्ये 6 हजार किंमतीची 60 लीटर सिंधी, प्लास्टिक बॉटलमध्ये भरलेली 1300 रुपये किंमतीची सिंधी असा एकूण 55 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी सतीश पोडीचेट्टी याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोनि कैलास गवते यांच्या मार्गदर्शनात पोहवा रणजित पिल्लेवान, पोशि हंसराज दास यांनी केली. अधिक तपास सफौ नीलकंठ कोकोडे करीत आहे.
तसेच आरमोरी तालुक्यांतील वैरागड येथे सुद्धा मोठया प्रमाणात नकली सिंधी विकली जाात आहे याकडे पोलीसांनी लक्ष देण्याची गरज आहे असे नागरिकांची मागणी आहे.
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
National
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments