अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
F
09-01-2025
पांढरकवडा (यवतमाळ): दहाव्या वर्गातील एका १६ वर्षीय मुलीस फूस लावून तेलंगणामध्ये पळवून नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांचा बेत नागरिकांच्या सतर्कतेने उधळला. याबाबत पोलिसांनी तीन: जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.
आरोपींमध्ये एका मुलीसह एका अल्पवयीन मुलाचा सुद्धा समावेश आहे. आदिलाबाद येथील रणदिवसनगरमधील एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा, अजय गंगाधर आडे (३०), वीणा मारोती किनाके (२३, रा. पाटणबोरी) अशी आरोपींची नावे आहेत. ७ डिसेंबरला सायंकाळच्या दरम्यान पाटणबोरी येथील एका शाळेतील दहाव्या
वर्गातील १६ वर्षीय मुलीस तिच्या ओळखीच्या गावातीलच वीणा मारोती किनाके (२३) हिने शाळेतून घरी नेले व त्यानंतर ती तिला इतर दोन आरोपीसोबत अदिलाबाद येथे घेऊन जात होती. यावेळी त्या अल्पवयीन मुलीच्या मामाच्या मित्रास ती मुलगी दिसून आल्याने त्याने मुलीच्या मामाला याची माहिती दिली. तेव्हा त्या अल्पवयीन मुलीच्या मामासह गावातील इतर नागरिक पाटणबोरी येथील अदिलाबाद मार्गावर आले. त्यांनी तिनही आरोपींना मुलीस कुठे नेत आहे याची विचारणा केली असता, ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. नागरिकांनी त्या सर्वांना पाटणबोरी आऊटपोस्टमध्ये नेले. पोलिसांनी विचारपूस केली असता, या मुलीस फूस लावून अदिलाबाद येथे नेत असल्याचे स्पष्ट झाले.
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Education
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Health
Vaingangavarta19
Local News
No Comments