अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
F
07-01-2025
छ्त्रपती संभाजीनगरमध्ये सैराटची पुनरावृत्ती झाली आहे. 17 वर्षीय मुलीची 200 फूट डोंगवरून खाली ढकलून हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रेम प्रकरणातून मुलीच्या सख्या चुलत भावानेच हे कृत्य केल्याचं तपासात उघड झालं आहे. आरोपीला ताब्यात घेतलं असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
नम्रता शेरकर असं मृत मुलीचं नाव आहे. तर ऋषिकेश शेरकर (25 वर्ष) असं भावाचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नम्रता अंबड तालुक्यातील शहागड येथील घर सोडून निघून गेली होती. घरच्यांकडून जीवाला धोका असल्याची तक्रार मुलीने शहागड पोलिसांना दिली होती.
चिडलेल्या मुलीची समजूत काढण्यासाठी घरच्यांनी तिला संभाजीनगरच्या वळदगाव येथे काकाच्या घरी पाठवले होते. काकाचा मुलगा ऋषिकेश याने नम्रताला गोड बोलून खावडा डोंगरावर नेले आणि तेथून ढकलून दिले. उंच डोंगरावरुन पडल्याने मुलीचा मृत्यू झाला. सुरुवातीला हा अपघात असल्याचं सर्वांना वाटलं. याप्रकरणी पोलिसांकडू सविस्तर तपास सुरु आहे.
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Education
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Health
Vaingangavarta19
Local News
No Comments