ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
F
03-01-2025
सोनापूर शिवारातील घटना : दुचाकीमुळे घटना उघडकीस
पोंभूर्णा : तालुक्यातील सोनापूर येथील एका युवकाने मित्रांसोबत थर्टी फर्स्टची पार्टी केल्यानंतर विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि. १) सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. विकास परशुराम वडस्कर (२७) असे मृतकाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अशी घटना घडल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
थर्टी फर्स्टच्या निमित्ताने मित्रांनी सोनापूर येथे पार्टी आयोजन केली होती. या पार्टीत विकास वडस्कर हा युवक सहभागी झाला. पार्टी आटोपल्यानंतर स्वतःच्या घरी आला. कुणालाही न सांगता एम. एच. ३४ बि. के. ६७७१ दुचाकी घेऊन घराबाहेर निघाला. विकास सकाळी घरी न आल्याने वडिलाने मित्रांकडे चौकशी केली. नातेवाइकांनाही कळविले. मात्र, विकासचा कुठेही पत्ता लागला नाही.
दरम्यान, बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास काही व्यक्तींना गावातीलच शरद ठेंगणे यांच्या शेतातील विहिरीजवळ दुचाकी उभी असल्याचे दिसून आले. विहिरीत चप्पल तरंगताना दिसत होती. माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी विहिरीत गळ टाकला असता विकासचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबाकडे सोपविण्यात आला. आत्महत्याचे कारण कळू शकले नाही.
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Politics
No Comments