अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
F
25-12-2024
तक्रार झाल्यास जेलची हवा, तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट करू नका
गडचिरोली : आपण सोशल मीडियावर सक्रीयअसाल, तर सावधान ! आपण कोणतीही पोस्ट करताना खात्रीपूर्वक करा, अन्यथा एखादी चुकीची पोस्ट केलात, तरआपल्या विरुद्ध कारवाई केली जाऊ शकते. परिणामी आपल्याला जेलची हवा सुद्धा खावी लागेल.
व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, फेसबुक, व्टिटर, टेलिग्राम अशा विविध सोशल मीडियावर चर्चा करताना किंवा कोणतीही पोस्ट टाकताना पोस्ट आपत्तीजनक तर नाही ना. याचा विचार करूनच ती पोस्ट टाका. अन्यथा आपण टाकलेल्या पोस्टवर कुणी आपत्ती दर्शविल्यास आपल्याविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत कारवाई होऊ शकते. परिणाम स्वरूप त्यापोस्टवरून चिघळलेल्या वादाचे गांभीर्य पाहून आपल्याला तुरुंगाची हवा देखील खावी लागू शकते. सामाजिक तेढ निर्णाण होणार नाही, कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे.
🟠सोशल मीडियाचा वापर सांभाळून करा
सोशल मीडियावरून आपत्तीजनक पोस्ट केल्यास त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊ शकतो. त्याला अटक करून तुरुंगाची हवा देखील खावी लागू शकते. कुणी आपत्तीजनक पोस्ट केली, तर त्याला समर्थन देऊ नका, त्यावर कॉमेंट करून तेढ निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य करू नका.
🟠मुलींनो डीपी सांभाळा
मुलींनो आपण सोशल मीडियावर सक्रीय असाल, तर आपण आपलीही काळजी घ्या. आपल्या डीपीवर : समाजकंटकांचे डोळे आहेत. समाजकंटक मुलींच्या डीपी चोरून त्या फोटोंचा वापर चुकीच्या कामासाठी करतात. अश्लील फोटो किवा व्हिडीओच्या ठिकाणी त्या फोटोचा वापर करू शकतात. अनोळखी व्यक्तीला फॉलो करू नका, आपल्याला संशय आल्यास त्या व्यक्तीला ब्लॉक करा.
🟠अशी घ्या काळजी
सोशल मीडियावरून आपत्तीजनक पोस्ट करू नये, कोणतीही पोस्ट करताना तिची खात्री करूनच पोस्ट करावे. अश्लील फोटो, आक्षेपार्ह फोटो किंवा व्हिडीओ टाकू नये, सामाजिक तेढ़ निर्माण होईल आणि समाजाची शांतता भंग होईल, असे कोणतेही कृत्य करू नये. कुठलीही पोस्ट आली आणि आपण त्या पोस्टला समजून न घेता सरळ तिला फॉरवर्ड करू नये, अन्यथा आपण त्यातही गुन्हेगार ठरू शकतो.
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
National
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments