आयुर्वेदिक पंचकर्म मल्टीस्पेशलिटी क्लिनिक
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
F
25-12-2024
विरूर स्टेशन: दोन दिवसापूर्वी बगुलवाई येथिल शेतकरी जंगु मारु आत्राम याला वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असतांना २३ डिसेंबरला सायंकाळी ४:३० वाजताच्या सुमारास आपल्या स्वतःच्या शेतात कापूस वेचणी करीत असलेल्या एका महिलेला दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करुन ठार केले. या महिलेला दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करुन ठार केल्याची घटना घडली आहे. वच्छला अर्जुन आत्राम (५९)असे मृत महिलेचे नाव आहे.
कविठपेट येथील गणपत आत्राम हे नेहमी प्रमाणे सकाळी ११ वाजताच्या सुमारास कविटपेठ बंजारागुळा शेतशिवारात बैल बंडीने पत्नी वच्छलासहीत मुलगा, सुन, व एक मजुर यांना सोबत कापुस वेचणीसाठी गेले होते. वेचणी करीत असतांना दबा धरुन बसलेल्या वाघाने अचानक वच्छला आत्राम यांच्यावर झडप घेतली व जागीच ठार केले.
सदर घटना वाऱ्यासारखी पसरताच वनविभागाचे अधिकारी उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, उपविभागीय वनाधिकारीपावनकुमार जोंग, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड, आदी वनधिकारी भेट दिली
मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या वन्यप्राणी मानव संघर्ष प्रकरण हाताळण्यात हे अधिकारी सपशेल अपयशी ठरले आहेत. नुकतेच कोष्टाला येथील वाघाच्या हल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला हे प्रकरण सुद्धा केवळ वनपाल, वनरक्षक, पोलिसांनी निभावून घेतले. त्यामुळे अधिकाऱ्या कडून या वनपरिक्षेत्र अधिकारी पदाचा कार्यभार काढण्यात यावे अशी मागणी वनजीव प्रेमी संघटनेने केली आहे
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
National
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments