आयुर्वेदिक पंचकर्म मल्टीस्पेशलिटी क्लिनिक
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
F
12-12-2024
अमिर्झा : येथील युवक नेहमीप्रमाणे सकाळच्या सुमारास व्यायाम करीत असतांना मोटारसायकलने धडक दिल्याने दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास अमिर्झा ते मुरमाडी मार्गावर घडली.
सचिन उमाजी कोडाप (१९) याच्या एका पायाचा चुराडा झाला तर ज्ञानेश्वर देवनाथ सोरते (२१) हा जबर जखमी झाला आहे. दोघांनाही गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
अमिर्झा येथील युवक अमिर्झा ते मुरमाडी मार्गावर नेहमीप्रमाणे आजही व्यायाम करण्यासाठी गेले होते. व्यायाम करून परत येत असतांना. व्यायाम व रनिंग करून परत येत असताना अमिर्झा येथील बैलाच्या आखराजवळ एमएच ३३ वाय ५६८ क्रमांकाच्या दुचाकीने मौशीचक येथील राकेश वासुदेव गावडे याने भरधाव वेगाने दुचाकी चालवून व्यायाम करणाऱ्या युवकांना धडक दिली.
ही धडक एवढी जबरदस्त होती की या धडकेत सचिन उमाजी कोडाप याच्या एका पायाचा चुराडा झाला तर दुसरा ज्ञानेश्वर देवनाथ सोरते हा जबर जखमी झाला.
दोघांनाही अमिर्झा प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्याकरिता नेले असता, डॉक्टरांनी गडचिरोली येथे रेफर केले. अपघात घडताच मौशिचक येथील मोटरसायकलस्वार राकेश गावडे याने काही वेळ बेहोश असल्याचे सोंग करून घटनास्थळी पडून राहीला. कालांतराने त्याने मोटारसायकल घटनास्थळी ठेऊन जंगलात पळ काढला.
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments