संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
F
12-12-2024
साताऱ्यातील घटना; वडिलांना सोडण्यासाठी तरुणीचा होता अर्ज
सातारा: सातारा जिल्हा सत्र न्यायालयात दाखल जामीन अर्जाबाबत मदत व जामीन करून देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह इतर तिघांविरोधात तक्रार देण्यात आली आहे. त्यानंतर सातारा शहर पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलमांन्वये चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पुण्यातील तरुणीने तक्रार दिलेली आहे. त्यानुसार आनंदमोहन खरात (रा. खरातवस्ती, दहिवडी, ता. माण), किशोर संभाजी खरात (रा. वारली, मुंबई), जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम विरोधात गुन्हा नोंद झालेला आहे. हा प्रकार ३, ९ तसेच १० डिसेंबरला घडला आहे.
प्रकरण काय?
■ तक्रारदार तरुणीच्या वडिलांचा जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज आहे. यासाठी संशयित एक आणि दोन यांनी जिल्हा सत्र न्यायाधीश निकम यांच्याशी संगनमत केले तसेच जामीन करून देतो म्हणून न्यायाधीश निकम यांच्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली. जामिनाबाबत पूर्वी ठरलेल्या एमएसईबी कोडमध्ये चर्चा करण्यात आली.
■ १० डिसेंबरला संशयित आनंद खरात, किशोर खरात आणि त्यांच्यासोबत अनोळखी व्यक्तीने तक्रारदार तरुणीकडे पाच लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दाखविली. त्यानंतर पैसे गाडीत आणून द्या, असे सांगून लाच रक्कम मिळविण्याचा प्रयत्न केला.
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments