STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
F
04-12-2024
गडचिरोली, ब्युरो. तुळशी विवाह आटोपताच लग्नसोहळ्यांना सुरुवात झाला आहे. यामुळे उपवर मुला-मुलींसह स्थळ शोधण्याच्या कार्यक्रमाला वेग आला आहे. ग्रामीण भागात मंडईच्या माध्यमातून उपवर-वधू शोधण्यासाठी आप्तेष्ट, नातेवाईकांना विचारणा होऊ लागली आहे. मात्र आता ग्रामीण भागातील वधु मुलींच्या अपेक्षा खुप वाढल्या असल्याने शेतकरी मुलांची चांगलीच कुचंबणा होत असून, त्यांना मुलगी मिळणे कठीण झाले आहे.
शिकलेल्या मुली व त्यांचे पालक मुलीसाठी शिकलेला, सरकारी नोकरी व घरी थोडीफार शेती असलेल्या मुलांनाच पसंती देत आहेत. खासगी नोकरी आणि सध्या कमी पगार असला, तरी चालेल पण तो शहरात राहणारा असावा, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे. जुन्या काळामध्ये उत्तम शेती, मध्यम व्यापार, तर कनिष्ठ नोकरी समजली जायची. मात्र, आता उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि शेतीला कनिष्ठ दर्जा दिला जात आहे. सध्या नोकरी करणाऱ्यांसह व्यावसायिकांना मुलीच्या कुटुंबीयांकडून प्राधान्य दिले जात आहे. परिणामी, अनेक शेतकरी तरुणांची फरफट होत आहे.
अलीकडे जोडीदारनिवडताना मुलींना नोकरीसह मुलाकडे शेतीही हवी असते मात्र शेतकरी नवरा त्यांना नको आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सामाजिक समस्या जटील झाली आहे. मुलींसह त्यांचे पालक मुलींसाठी शिकलेला, सरकारी नोकर व घरी थोडीफार शेती असलेल्या मुलांना पसंती देत आहेत. यामुळे मात्र, शेतकरी, शेतमजूर वरांची कुचंबणा होत आहे.
ग्रामीण भागातही वाढल्या अपेक्षा
सद्यःस्थितीत ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मुली सुशिक्षित झाल्या असल्याने त्यांच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. उच्अशिक्षित नोकरी, निर्व्यसनी, घरंदाज, कमविता वर मिळावा, अशी त्यांची इच्छा असते. शेतकरी. शेतमजूर वरांना त्यांचेकडून नाक मुरडल्या जात असल्याने ग्रामीण भागातील लग्नाळूना कारभारीन मिळणे कठीण झाले आहे.
वधू-वर सूचक केंद्रांमध्ये नोंदणी वाढली!:
पूर्वी ग्रामीण भागातील तरुण वधू-वर सूचक केंद्रांमध्ये सहसा नोंदणी करीत नव्हते. मात्र, आता वधू मिळत नसल्याने समाजातील वधू-वर सूचक केंद्रामध्ये नोंदणी वाढली आहे. शेतकरीही नातेवाइकांना एखादी मुलगी पाहा हो' असा सूर आळवत आहेत.
फसवणुकीच्या प्रमाणात वाढ :
लग्नासाठी मुलगी मि मिळत नसल्याने ग्रामीण भागात अनेक तरुणांची फसगत होण्याचे प्रमाणही वाढले आहे. फसवणूक करणाऱ्या अनेक टोळ्या सक्रिय झाल्या असून, पैसे, दागिने घेऊन लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच वधू फरार होण्याचे प्रमाण वाढले आहे. यातील काही टोळ्यांना पकडण्यात पोलिसांना यशही आले आहे.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Politics
विदर्भ फायर न्यूज
International
विदर्भ फायर न्यूज
Food
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments