RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
F
04-12-2024
पोंभुर्णा : वनपरिक्षेत्र चिचपल्ली उपक्षेत्र केळझर अंतर्गत सातारा तुकूम येथील कक्ष क्र. ४३६ मधील जंगलात वाघाने गुराख्यावर हल्ला केला. यात गुराखी गंभीर जखमी झाला. गुराख्याने कुन्हाड व काठी उगारल्याने वाघाने जंगलात धूम ठोकली. ही घटना मंगळवारी (दि. २) सायंकाळच्या सुमारास घडली. नामदेव पेंदोर (रा. सातारा तुकूम, ५०) असे जखमीचे नाव आहे.
नामदेव पेंदोर हे गुरे चराईसाठी जंगलात गेले होते. संध्याकाळी गुरे घेऊन गावाकडे परत येताना दबा धरून बसलेल्या वाघाने नामदेववर हल्ला चढवला. त्यात तो गंभीर जखमी झाला मात्र, जीवाची पर्वा न करता कुऱ्हाड व काठीच्या साहाय्याने वाघाला पळवून लावण्यात यशस्वी ठरला. केळझर उपक्षेत्राचे क्षेत्र सहायक एन.डब्लू, पडवे व वनरक्षक संदीप दुपारे यांनी पंचनामाकेले. गुराख्याला चंद्रपूरला हलविण्यात आले. केळझर उपक्षेत्राचे क्षेत्र सहायक एन. डब्लू, पडवे व वनरक्षक संदीप दुपारे उपस्थित होते.
वाघाच्या हल्ल्यात बैल जखमी
विरूर स्टेशन : शेतात बांधून ठेवलेल्या बैलावर वाघाने हल्ला करून जखमी केल्याची घटना सोमवारी (दि. २) दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास सुब्बई शिवारातील थोमापूर येथे घडली. हा बैल वीरेंद्र पवार यांच्या मालकीचा आहे.
काही दिवसांपासून सुबई शेतशिवारात भरदिवसा वाघाचे दर्शन होत आहे. त्यामुळे शेतात जाण्यास शेतकरी, मजूर व महिला घाबरत आहेत. परिसरात भरदिवसा वाघाचे दर्शन झाल्याने नागरिकांनी वनविभागाला माहिती दिली. परंतु विरूर वनविभागातील अधिकाऱ्यांनी बंदोबस्त केला नाही. याच घटनेबाबत नाराजी उमटत असताना वीरेंद्र पवार यांच्या बैलावर वाघाने हल्ला केला. यात बैल गंभीर जखमी झाला. वनविभागाने वाघाला जेरबंद करावे, अशी मागणी सुब्बई परिसरातील नागरिकांनी केली आहे.
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Politics
विदर्भ फायर न्यूज
International
विदर्भ फायर न्यूज
Food
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments