समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
F
22-11-2024
नवी दिल्ली: ज्या बँक खात्यांत सरकारी योजनांच्या थेट लाभाचे (डीबीटी) पैसे हस्तांतरित होतात, त्या खात्यांची केवायसी नसली तरी ती खाती गोठवू (फ्रीझ) नका, असे निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकांना दिले आहेत.
डीबीटीद्वारे केंद्र सरकारकडून सबसिडी, पेन्शन आणि काही विशेष योजनांचे पैसे देशभरात असलेल्या लाभधारकांना हस्तांतरित केले जातात. केवायसीअभावी खातेच बंद झाल्यास या योजनांच्या मार्गात अडथळा निर्माण होतो, त्यामुळे ही खाती गोठवली जाऊ नयेत, अशा सूचना रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर स्वामीनाथन जे. यांनी दिल्या आहेत.
ग्राहकांना मिळेनात पैसे
स्वामीनाथन यांनी म्हटले की, रिझर्व्ह बँकेच्या सूचनांचे पालन योग्य होत नसल्यामुळे बँक खाती गोठवली जात आहेत. त्यामुळे ग्राहकांना त्यांचेच पैसे मिळेनासे झाले आहेत. यामुळे खातेधारक त्रास सहन करीत आहेत.
केवायसी न होण्यास बँकाच जबाबदार
■ रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर स्वामीनाथन जे. यांनी सांगितले की, अनेक कारणांमुळे बँक खात्यांची केवायसी रखडल्याचे आढळून आले आहे. याला बँका दोषी आहेत.
■ वेळोवेळी केवायसी अद्ययावत करण्यात बँकांकडून दिरंगाई होते.
■ ग्राहकांना साह्य आणि आवश्यक कागदपत्रे प्राप्त करणे, यासाठी आवश्यक सक्रिय दृष्टिकोनाचा बँकांत अभाव असल्याचे दिसते.
■ अनेक बँकांकडे अपुरा कर्मचारी वर्ग असल्यामुळे केवायसी प्रक्रिया रखडून पडलेली दिसते. प्रत्येकाचे काम बँका गृहशाखेकडे पाठवतात.
■ ग्राहकांची कागदपत्रे बँकांकडून सिस्टममध्ये अपडेशन केले जात नाही.
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
National
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments