CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
F
11-12-2024
Gadchiroli News: सध्या सोशल मीडियाचे युग सुरू आहे. नागरिक ऑनलाईन खरेदी विक्री करतात. विविध कॉल्स किंवा मेसेजद्वारे नागरिकांची फसवणूक होत असते मात्र नागरिकांची आर्थिक लुबाडणूक करण्याची नवीन पद्धत आता आली असून जिल्ह्यातील हजारो नागरिकांना ऑनलाईन ट्रेडिंगने लाखो रुपयांचा गंडा घातला असून आणखी अनेक नागरिकांची नागरिकांची लुबाडणूक होण्याची शक्यता आहे.
ऑनलाईन ट्रेडिंगच्या नावाखाली काहीजण व्हॉट्सअॅपवर ग्रुप तयार करून दररोज रात्री 8 वाजता ग्रुपमध्ये मेसेज टाकतात. पिपिमी एक्सचेंज, एआयजी (नाव बदललेले आहे) सारख्या अॅपमध्ये पैसे टाकण्यास सांगतात.
सुरुवातीला कमीत कमी एक हजार, दोन हजार, पाच हजार आणि जास्तीत
जास्त कितीही रूपये आपण टाकू शकता असे सांगण्यात येते. त्यानंतर दररोज आपण टाकलेल्या रकमेवर व्याज किंवा कमिशन मिळते असे
सांगण्यात येते. सुरुवातीला काही जणांना पैसेही मिळाले त्यांनी आणखी जास्ती गुंतवणूक केली. काही जणांनी पाच दहा लोकांना जोडून साखळी तयार केली.
मात्र मागील काही दिवसांपासून दोन्ही अॅप मधून लोकांना पैसे येणे बंद झाले असून आपली आर्थिक फसवणूक झाली आहे असे नागरिकांना कळत आहे. काही जणांनी पोलिस तक्रार करण्याची तयारी दर्शविली आहे.
विशेष म्हणजे या दोन्ही अॅपमध्ये पैसे टाकताना फोन पे किंवा गुगल पे व पेटीएम सारख्या अॅपचा वापर करण्यात आला. त्यामुळे अशा अनोळखी आणि अनधिकृत अॅपकडे सर्वांची पूर्ण बँक डिटेल्स गेल्या आहेत. त्यामुळे भविष्यात मोठी आर्थिक हानी होणार काय याची भीती सर्वांना लागली आहे.
Redefine your style
book your appointment now
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Politics
विदर्भ फायर न्यूज
International
विदर्भ फायर न्यूज
Food
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments