संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
28-06-2024
Gadchiroli News: अचानक प्रकृती खालावल्यानंतर वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने उपचाराअभावी ४ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना 24 जून 2024 ला अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम पेरमिली येथे घडली. तीन दिवसांनंतर उजेडात आलेल्या या घटनेने आदिवासीबहुल जिल्ह्यात आरोग्य सेवेचे अक्षरशः धिंडवडे निघाले आहेत. आर्यन अंकित तलांडी (वय 4, रा. कोरेली, ता. अहेरी) असे मृत बालकाचे नाव आहे. 23 जून रोजी मध्यरात्री त्याची प्रकृती खालावली. त्याला पोटदुखीचा त्रास होता.
हे देखील वाचा : Bus Pass : आता शाळेतच मिळणार विध्यार्थ्यांना बस पास
भामरागडहून नागपूरला येण्यासाठी लालपरी निघाली होती. वाटेत एक गरीब दाम्पत्य चिमुकल्याला घेऊन बसले. तापाने ते मूल अत्यवस्थ झाले होते. वाहकाला ही बाब समजली. त्याने चालकाशी चर्चा करून बस परत वळवली व तासभर धावत आलापल्लीच्या रुग्णालयात आणली. पण... पण हे माणुसकीचे प्रयत्न निष्फळ ठरले. डॉक्टरांनी सांगितले, दोन तासांपूर्वी चिमुकला जग सोडून गेला.
हे देखील वाचा : Sarkari Yojana 2024: वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास, घ्या या योजनेचा आधार !
आर्यनवर 23 जूनच्या रात्रीपासून उपचार सुरु करण्यात आले होते. शेवटच्या क्षणी प्रकृती अधिक खालावल्याने त्याला अहेरीला 'रेफर' करण्यात आले. उशीर न करता आधीच त्याला अहेरीला पाठविले असते आणि रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध झाली असती तर आर्यनचा जीव वाचला असता, असा पालकांचा दावा आहे. दरम्यान, रुग्णवाहिका नसताना चिमुकल्याला शेवटच्या क्षणी रेफर केले कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments