बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
F
19-06-2024
Bus Pass : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने MSRTC एक पाऊल पुढे टाकत विद्यार्थ्यांना शाळेतच पास वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता तासिका बुडवून पासकरिता रांगेत उभे राहावे लागणार नाही. जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी, विद्यार्थिनींना याचा लाभ होणार आहे.
हे देखील वाचा : Sarkari Yojana 2024: वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास, घ्या या योजनेचा आधार !
दुसऱ्या गावांतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जाण्यासाठी शाळेत शासनाने एसटीच्या माध्यमातून तिकिटात सवलत दिली आहे. केवळ 33 टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक प्रवास पास काढता येतो. शिवाय, शासनाच्या अहिल्याबाई पुण्यश्लोक होळकर योजनेअंतर्गत पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत पासचे वितरण केले जाते.
पास घेण्यासाठी किंवा काढण्यासाठी विद्यार्थ्यांना घरून लवकर निघावे लागते, ते शक्य नसल्यास शाळेतील काही तासिका बुडवाव्या लागतात. या प्रकारात त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आहे. आता शाळेतच पास मिळणार असल्याने विद्यार्थ्यांची धावपळ थांबण्यासोबतच पूर्णवेळ अभ्यास करण्यास मदत होणार आहे.
मिळविण्याकरिता पाससाठी दरमहा विद्यार्थी, विद्यार्थिनींना बसस्थानकावर येऊन रांगेत उभे राहून किंवा गटागटाने जाऊन आगार व्यवस्थापनाकडून पास घ्यावा लागत होता. महामंडळाच्या निर्णयाने या त्रासापासून सुटका होणार आहे. जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात बसने प्रवास करून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बरीच आहे. या विद्यार्थ्यांना आता स्थानिक स्तरावर शाळांमध्येच बस पासेस उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनींना शाळेत बस पासेस देण्याच्या सूचना वरिष्ठस्तरावरून प्राप्त झाल्या आहेत. एसटीचे कर्मचारी शाळांना भेटी देऊन पासेस काढण्याची कार्यवाही करणार आहेत. जे विद्यार्थी बसस्थानकात येऊ शकतात, त्यांना बसस्थानक कार्यालयातून बस पासेस उपलब्ध होतील. ज्या विद्यार्थ्यांना शाळेतून बस पासेस पाहिजे, त्यांना शाळेतच बस पासेस देण्यात येतील. त्यांना बसस्थानकापर्यंत येण्याची आवश्यकता नाही.
अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
Your car is our responsibility
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Education
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments