STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
19-05-2024
Gadchiroli News : सिरोंचा : ग्रामपंचायत एका तालुक्यात तर, महसूल मंडळ दुसऱ्या तालुक्यात. अशी स्थिती जिल्ह्यातील काही गावांची आहे. आता आमचे गाव नेमके कोणत्या वन विभागात आहे? असा प्रश्न कोरेपल्ली वनहक्क पदाधिकाऱ्यांनी समितीच्या सिरोंचाचे उपवनसंरक्षक यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.
आमचे गाव सिरोंचा वन विभागातच ठेवावे, अशी मागणीही मागणी केली आहे. कोरेपल्ली वनहक्क समितीने दिलेल्या निवेदनानुसार, सिरोंचा वन विभागांतर्गत येणाऱ्या कमलापूर वन परिक्षेत्राच्या हद्दीत असलेल्या कोरेपल्ली येथे सध्या वन विभागाच्या माध्यमातून बीट कटाईचे काम सुरू आहे. कोरेपल्ली जंगल परिसरातून कटाई केलेल्या बीटांची वाहतूक आलापल्ली वन विभागाच्या हद्दीत येणाऱ्या ताडगुडा येथे केली जात आहे. सदर जंगल परिसर कोरेपल्ली गावाचा असतानाही संबंधित वन कर्मचाऱ्यांनी जंगलातून लाकूड आणि बीट कापण्याचे काम सुरू करण्यापूर्वी वन हक्क समिती अथवा नागरिकांना कोणतीही माहिती दिली नाही.
सध्या कोरेपल्ली जंगल परिसरातील सुरू असलेल्या लाकडाची वाहतूक ताडगुडा येथे केली जात आहे, ती थांबवून सिरोंचा वन विभागाने आपल्या ताब्यात घ्यावे, यासोबतच कटाई करण्यात आलेल्या लाकडांची व
बिटांची वन विभागाच्या कायद्यानुसार शासकीय कार्यवाही करून सदर जंगलाचा हक्क कोरेपल्ली गाव सिरोंचा वन विभाग यांच्याकडे अबादीत ठेवावे, अशी विनंतीही या निवेदनातून करण्यात आली आहे.
सदर निवेदन कोरेपल्ली येथील नागरिकांनी वनपरिक्षेत्र अधिकारी एन. टी. चौके यांना दिले. यावेळी येरमनारचे माजी सरपंच बालाजी गावडे, वन हक्क समितीचे अध्यक्ष रामा गावडे, ग्रामपंचायत सदस्य इरपा गावडे, झुरू गावडे, गिल्ला गावडे, कोरके गावडे, झुरू आत्राम, उंगा वेलादी, इरपा पुसाली, सुधाकर गावडे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments