रोज ब्युटी पार्लर
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
12-09-2024
Beed News: बीडच्या केज शहरातील एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडवून दिली आहे. एका महाविद्यालयीन तरुणीवर तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. हा प्रकार केवळ एकदाच नाही, तर आरोपीने पीडितेवर तब्बल 10 ते 12 वेळा अत्याचार केला आहे.
हा भयानक प्रकार जानेवारी 2024 मध्ये घडला.19 वर्षांची पीडित तरुणी नीट परीक्षा तयारीसाठी लातूरला जाण्यासाठी बसची वाट पाहत असताना आरोपी सूरज गुंड, जो तिचा सोशल मीडियावरचा ओळखीचा होता, तिला कारने लातूरला घेऊन जाण्याचे आमिष दाखवून फसविले. केजपासून 70 किमी दूर रेणापूर येथे आरोपीने गाडी थांबवून तिला जीवे मारण्याची धमकी दिली आणि एका लॉजमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्याने तरुणीचे नग्न फोटो आणि व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल केले.
या घटनेनंतर आरोपीने पीडितेवर वारंवार अत्याचार केला. तो तिला तिच्या फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत होता. अखेरीस, पीडितेच्या आई-वडिलांना फोटो आणि व्हिडिओ पाठवल्यानंतर या घटनेची पोलिसांना माहिती मिळाली.
हे देखील वाचा: Fall In Love: प्रेमात पडल्यावर तुमच्या शरीरात होतात हे आश्चर्यकारक बदल
केज पोलिसांनी या प्रकरणात आरोपीवर बलात्कार, ॲट्रॉसिटी आणि आयटी ॲक्ट अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल केले असून त्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना करत आहेत.
आरोपी आणि पीडिता यांची ओळख इन्स्टाग्रामवरून झाली होती. त्यानंतर हा प्रकार घडला. पोलिसांनी अशा घटनांविरोधात सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. केज पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत महाजन यांनी लोकांना अशा घटनांची माहिती गुप्तपणे पोलिसांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले आहे.
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments