समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
F
03-01-2025
आधीच्या काळात स्त्रियांना चूल आणि मूल एवढी जबाबदारी होती परंतु आज जग बदलला तशा स्त्रियांमध्ये मोकळीकता निर्माण झाली आणि बरीचशी प्रगती होऊन आजच्या स्त्रिया स्वावलंबी होऊन जगाला दाखवून दिल्या की,हम भी कुछ कम नही आणि हे सत्य आहे.
जमान्यानुसार बदल व्हायला पाहिजे होता आणि तो झाला.शिक्षण क्षेत्रात गगन भरारी घेत स्त्रियांनी प्रगती साधली हा मुख्य कारण आहे.शिक्षणामुळे आजची स्त्री स्वतःच्या पायावर उभी आहे याचा सार्थ अभिमान आहे.तिहेरी भूमिका चांगल्या प्रकारे सांभाळून पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून संसाराचा गाडा उडण्यापासून तर रोजगारापर्यंत उंच भरारी घेत स्वतःचं नाव लौकिक केलं आणि स्त्री ही एक अबला नसून ती रणरागिणी आहे,हे सिद्ध करून दाखवलं.
महत्त्वाचं म्हणजे स्त्री चूल आणि मोल या घोषणा वाक्यावर मर्यादित न राहता स्वतःच्या कर्तृत्व सिद्ध करीत जगात आपली ओळख निर्माण करून दाखवली आणि इतकी प्रगती शिक्षणाच्या भरोशावर झाली.जर स्त्री शिकलीच नसती तर प्रगती अशक्य तर होतीच परंतु तिला समाजात जीवन जगणं देखील अशक्य होऊन गेलं असतं.शिक्षण वाघिणीचं दूध आहे,असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं आणि शिक्षणामुळे स्त्री ही वाघीण झाली हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही,म्हणून शिक्षण काळाची गरज आहे.
सावित्रीच्या लेकी झपझप पाऊल पुढे टाकत कधी पुढे निघून गेल्या हे कळलच नाही परंतु ज्या मातेने स्त्रियांसाठी शिक्षणाची गंगा आणली ती माता सावित्रीबाई फुले हिला त्रिवार वंदन.स्त्री ही क्षणाची पत्नी असून अनंत काळाची माता हे अगदी बरोबर आहे.घराला घरपण हा स्त्रीमुळे टिकून आहे ज्या घरात स्त्री नाही त्या घरात थोडंसं डोकावून पहा म्हणजे सहज लक्षात येते.आजची स्त्री शिक्षणाच्या भरोशावर एवढी प्रगती केली स्वतःचा संसार सांभाळून नोकरी वर्गात आणि व्यवसायात स्वतःचा दबदबा निर्माण करीत आपल्या नाजूक पायाला धीर देत स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच ती सावित्रीची लेक म्हणून सिद्ध झाली हे सर्वात अभिमानास्पद बाब आहे.
शहरी भागापाटोपाठ ग्रामीण भागात सुद्धा सावित्रीच्या लेकी बचत गटाच्या मार्फत उत्तुंग भरारी घेत आर्थिक प्रगती साध्य करीत देशाला मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहेत.तेही उत्तमरीत्या बचत गटाच्या माध्यमातून सावित्रीच्या लेकी सुद्धा महत्त्वाचा कणा म्हणून बँकिंग व्यवहार चांगल्या प्रकारे हाताळत आहेत.आज प्रत्येक खेड्यापाड्यात महिला बचत गटाची स्थापन करून चूक व्यवहाराच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीत सामील होत आहेत.
जी सावित्रीची लेक चूल आणि मूल सांभाळत होती ती अभागी लेक आज बँकेत जाऊन आपला व्यवहार चौक सांभाळीत आहे आणि पुरुषाच्या बचत गटापेक्षा महिलांचे बचत गट सक्षम करून आर्थिक प्रगती साधलेली आहे.बचत गटाच्या माध्यमातून भारतात कितीतरी महिला आपला रोजगार निर्माण केलेला आहे अशा पद्धतीने सावित्रीच्या लेकी आम्ही कुठेच कमी नाही हे दाखवून दिले आणि ही बाब अभिमानास्पद आहे म्हणून सावित्रा आईला त्रिवार वंदन मानाचा मुजरा.
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
National
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments