अमित मेडिकल स्टोर & निर्मल जल, गडचिरोली
निर्मल जल शुद्धतात का वादा
F
11-12-2024
राज्यातील निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर तब्बल बारा दिवसांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडला गेला आणि त्याही शपथविधीला आता एक आठवड्याचा कालावधी होऊन जातोय,तरी पण अद्याप मंत्रिमंडळ गठित झालेला नाही.म्हणजे आत काहीतरी शिजतय असं म्हणाला हरकत नाही.किंवा पुन्हा कोणता मुहूर्त बघावं लागणार हा एक न उलगडणार कोड आहे.
पाच तारखेला शपथविधी पार पडला त्या दिवशी फक्त तीनच लोकांच्या शपथविधी झाल्या आणि आजही माननीय एकनाथ शिंदे आणि माननीय अजित पवार अजूनही बिन खात्याचे उपमुख्यमंत्री बनलेले आहेत. तीन पक्ष मिळून महायुती तयार झाली तिन्ही पक्षाने किती मंत्री पदे सांभाळण्याची याची देखील रीतसर बोलणे झाली. भाजपाला 15 जागा शिंदे गटाला 10 जागा आणि अजित पवार गटाला 9 जागी मंत्रीपदे बहाल करण्यात आलेले आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तार लामणीवर जात आहे म्हणजे दाल मे कुछ काला है असं म्हणाला काहीही हरकत नाही.कारण तिन्ही पक्षात निवडून आलेल्या आमदारांची संख्या जास्त आहे आणि मंत्रिपदे कमी आहेत याची सुद्धा भीती मनात असेलच.कोणाला मंत्रिपदी द्यायची आणि कुणाला नाही हा सर्वात हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
ज्याची मंत्रीपदावर वर्णी लागेल त्याचा काही प्रश्न नाही परंतु ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही तो नाराज होईल आणि नाराजी ओढवून घेणं सुद्धा हिताचं ठरणार नाही.कदाचित जे नाराज आहेत ते बंडखोरी करून पक्ष सोडून जातील,ही भीती सुद्धा मनात येत असेल.आज निवडून आलेल्या प्रत्येक आमदाराला आपली मंत्रिपदी वर्णी लागावी हीच अपेक्षा असते परंतु तसं होत नाही,आणि कधी होणारही नाही.
त्यामुळे समोर अधिवेशन सुरू होणार आहे आणि अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर ते राज्याच्या हिताच होईल. म्हणून लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा गटन करावं आणि राज्याला पाच वर्षे चालणार स्थिर सरकार निर्माण व्हावं ही अपेक्षा राज्यातील जनतेची आहे आणि त्यावर विरजण पडू नये म्हणजे झालं.
निर्मल जल शुद्धतात का वादा
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Politics
विदर्भ फायर न्यूज
International
विदर्भ फायर न्यूज
Food
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments