अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
F
09-12-2024
राज्यातील निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीचे सरकार अस्तित्वात आले आणि महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा ईव्हीएम मशीन कडे वढविला आणि राज्यभर सांगत फिरले की मतदान मशीन मध्ये घोळ झालाय म्हणून आम्ही पराभूत झालो वगैरे.
मुळात महाविकास आघाडीचा जन्म इंडिया आघाडी मधून झालेला असल्यामुळे,मतदान मशीनवर शंका घेणे हा त्यांचा उपक्रम होऊन गेलाय परंतु तो कसाॽ निवडणुक जिंकले की आम्ही विकासाच्या मुद्द्यावर जिंकलो अन हरलो तर मतदान मशीन मध्ये घोळ झालाय म्हणून हरलो.हे ब्रीदवाक्य उराशी बाळगूनच महाविकास आघाडी राजकारण करताना दिसतो आहे.
एवढी शंका असेल तर महाविकास आघाडी मधील राज्यातील जे काही 49 आमदार विजयी झालेत त्यांनी सर्व आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा नव्याने निवडणुकीला सामोरे जावे आणि जनतेला घसा कोरडा होईस्तोवर लक्षात आणून द्यावा की मतदान मशीन मध्ये बिघाड असल्यामुळे आम्ही आमच्या सत्सद विवेक बुद्धीचा विचार करून आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे आणि पुन्हा नव्या जोमाने आम्ही निवडणूक लढवू,असं राज्यात वातावरण निर्माण करावा.आणि मतदान मशीनचे योग्य निरीक्षण करून निवडणुकीला सामोरे जावे. कुणाला निवडून द्यायचे याचा विचार मतदार संघातील जनता करेल आणि त्यानंतरच तुम्ही आमदार झालात हे सिद्ध होईल नाहीतर नळी फुंकले सोनारे इकडून तिकडून गेले वारे,अशी गत झाल्याशिवाय राहणार नाही.
राजकारण म्हटलं की एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी कानावर ऐकू येतात यात काहीच नवल वाटण्यासारखं नाही परंतु मतदान मशीन वर न्यायालयाने निकाल दिलाय याचा सारासार विचार केला गेला पाहिजे आणि जनतेने दिलेला निर्णय मान्य करून नव्या दमाने निवडणुकीला सामोरे जायला पाहिजे आम्ही का पराभूत झालोय याचा गांभीर्याने आत्मकिंतन करायला पाहिजे.
राज्यातील महाविकास आघाडीचे नेते जनतेमध्ये सामील होऊन आपले कार्य घराघरात रुजवायला पाहिजे जेणेकरून पुढच्या निवडणुकीला हिताचं ठरल अन्यथा राज्यात महाविकास आघाडी नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र नक्की.
|| उठ उठ नेता जागा हो,विकासाचा धागा हो ||
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments