निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
F
11-12-2024
Chandrapur News: “पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समझे क्या, फ्लॉवर नही, फायर है मै” – या दमदार डायलॉगने प्रसिद्ध झालेला दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जूनचा पुष्पा चित्रपट आणि त्याचा दुसरा भाग पुष्पा २ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलाय. लाल चंदनाच्या तस्करीवर आधारित असलेल्या या चित्रपटाने लाल चंदनाचे झाड चर्चेचा विषय बनवले आहे.
आता या प्रसिद्ध लाल चंदनाचे झाड भारतातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सुद्धा आढळते. मोहर्ली वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ताडोबाच्या जंगलात तीन लाल चंदनाची झाडे आहेत. विशेष म्हणजे, या झाडांची योग्य निगा राखण्यासाठी वनविभागाने त्या ठिकाणी चबुतरा बांधला असून, झाडांची ओळख पटवण्यासाठी त्यावर नाव लिहिलेले आहे.
लाल चंदन हे अत्यंत दुर्मिळ आणि महागडे झाड असून, त्याची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये असते. पुष्पा चित्रपटाने याला विशेष प्रसिद्धी मिळवून दिली. लाल चंदनाच्या झाडांभोवती अनेक रंजक कथा आहेत, ज्यामुळे त्याचे महत्व अधिक वाढले आहे.
ताडोबातील वाघ हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण असले तरी आता लाल चंदनाचे झाड सुद्धा प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग बनले आहे. ताडोबात येणाऱ्या पर्यटकांना या झाडाबद्दल माहिती दिली जाते, आणि पुष्पा चित्रपटामुळे या झाडाला पाहण्यासाठी लोकांची गर्दी वाढली आहे. लाल चंदनाचे झाड ताडोबातील जैवविविधतेचे खास वैशिष्ट्य ठरले आहे.
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Politics
विदर्भ फायर न्यूज
International
विदर्भ फायर न्यूज
Food
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments