निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
F
05-09-2023
gadciroli news 5/9/2023: अनेक लोकांना बसल्या बसल्या पाय हलवण्याची, पायाची बोटं हलवण्याची सवय असते. अशा हालचालींना इंग्लिशमध्ये 'फिजिटिंग' म्हटलं जातं. या सवयी चांगल्या नसतात असे काहींचे म्हणणे असते.
मात्र, तज्ज्ञांनी म्हटले आहे की ही सवय आरोग्यासाठी चांगलीच ठरते! विशेषतः वजन घटवण्यासाठी बसल्या बसल्या अशा हालचाली करणे लाभदायक ठरते.
फिजिटिंगकडे पूर्वी बघण्याचा द़ृष्टिकोन वेगळा होता; पण आता त्याकडे बघण्याची द़ृष्टी बदलली आहे. यासंबंधी झालेल्या नवीन संशोधनातून समोर आलंय की चंचलता आपल्याला निरोगी ठेवण्यात, वजन आटोक्यात ठेवण्यात आणि आपला स्ट्रेस मॅनेज करण्यात आयुष्यभर मदत करते. लीडस् विद्यापीठात न्युट्रिशनल डिसीज तज्ज्ञ असणार्या जॅनेट केड यांनी सांगितले, "जर तुम्ही एकाच ठिकाणी स्थिर बसून राहात असाल तर ते चांगलं नाही.
जर तुम्ही बसलेले असताना हालचाल करत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे." फिजिटिंग म्हणजे दडपण घेणं, बेचैन असणं असं सहसा समजलं जातं; पण इप्सेन फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि मेयो क्लिनिकमध्ये मेडिसिनचे प्रोफेसर जेम्स लेवाईन यांचं म्हणणं आहे की शरीराच्या एका भागाची एका लयीत होणारी हालचाल मेंदूतून नियंत्रित केली जाते. तज्ज्ञांच्या मते, फिजिटिंग अनेक कारणांमुळे होऊ शकतं. एक म्हणते तुमची नेहमीची सवय असू शकते किंवा कधी कधी तुम्हाला कुठला तरी आजार झाला असला असल्याची शक्यता असते. आणखी एक शक्यता अशी आहे की तुमचं फिजिटिंग तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो.
जगभरात 1975 पासून आतापर्यंत लठ्ठ लोकांच्या लोकसंख्येत तिप्पट वाढ झाली आहे. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे बैठी जीवनशैली. यामुळे आपल्या शरीराचं मेटॅबोलिझम म्हणजेच चयापचय क्रिया मंदावतं. यामुळे आपल्या रक्तातल्या साखरेची पातळी रक्तदाब नियंत्रित करण्याची क्षमता प्रभावित होते. यामुळे आपल्या शरीरातील चरबीही काम करू शकत नाही; पण आता याचे पुरावे मिळालेत की फिजिटिंगमुळे आपलं वजन आटोक्यात राहण्यात मदत होते. कारण यामुळे आपण एका जागी स्वस्थ न बसता हालचाल करत असतो.
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
International
विदर्भ फायर न्यूज
Food
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
National
No Comments