ध्यास कॅरिअर अकॅडमि
तुमचे स्वप्न पूर्ण करणे,,
हाच आमचा ध्यास..
23-07-2024
Gold Rate :- देशभरात सध्या 'वन नेशन, वन रेट' चर्चेत आहे. नावावरुनच लक्षात आलं असेल की, One Nation One Rate म्हणजे काय, संपूर्ण देशात वस्तूंसाठी एकच किंमत. पण हा नियम सर्व वस्तूंसाठी नाहीतर फक्त सोन्यासाठी लागू करण्यात येईल. म्हणजेच, लवकरच संपूर्ण देशात सोन्याचा एकच दर असेल.
देशातील विविध शहरांमध्ये सोन्या- Gold Rate वेगवेगळे असतात. सोन्या-चांदीच्या दरांत प्रत्येक राज्याच्या वेगवेगळ्या करांशिवाय इतर अनेक गोष्टींचीही भर पडते. यामुळे या मौल्यवान धातूंच्या किमतीही राज्यांमध्ये बदलत असतात. मात्र, आता देशात मोठा बदल होणार आहे. लवकरच 'वन नेशन, वन रेट' धोरण संपूर्ण देशात लागू होणार आहेत.
हे धोरण संपूर्ण देशभरात लागू झालं, तर तुम्ही देशात कुठेही सोनं खरेदी केलं, तरीसुद्धा तुम्हाला सारखाच दर मिळेल. तसं झाल्यास सोन्याचे व्यापारी आणि ज्वेलर्स यांनाही सोन्याची खरेदी-विक्री करणं सोपं होईल. देशभरातील सर्व बड्या ज्वेलर्सनीही याची अंमलबजावणी करण्याचं मान्य केलं आहे.
'वन नेशन, वन रेट' पॉलिसी म्हणजे, नेमकं काय?
केंद्र सरकारनं प्रस्तावित केलेली One Nation One Rate पॉलिसी असून त्याद्वारे संपूर्ण देशातील प्रत्येक राज्यात सोन्याची किंमत सारखीच ठेवण्याचा प्रस्ताव ठेवला जाईल. म्हणजेच, हे धोरण जर लागू झालं, तर संपूर्ण देशात एकाच Gold Rate उपलब्ध होणार आहे.
सध्याच्या व्यवस्थेनुसार, देशभरातील सोन्याच्या दरांत तफावत दिसून येते. देशातील प्रत्येक राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये सोन्याचे दर कमी-अधिक असल्याचं पाहायला मिळतं.
तसं पाहायला गेलं तर देशातील प्रत्येक शहरांतील सोन्याच्या किमतींमधील फरक फारसा नसतो. तरीदेखील सोन्याच्या दरात 200 ते 500 रुपयांचा फरक पाहायला मिळतो. विशेष म्हणजे, जेम अँड ज्वेलरी कौन्सिलनंही याला पाठिंबा दिला आहे. मात्र, याबाबत सरकार अंतिम निर्णय कधी घेणार? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
या धोरणावर बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनेक ज्वेलर्स असोसिएशन या धोरणाशी सहमत असून लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी करत आहेत.
'वन नेशन, वन रेट' पॉलिसीमुळे काय बदल होणार?
'वन नेशन, वन रेट' या पॉलिसीमुळे केंद्र सरकारला संपूर्ण देशातील सोन्याच्या किमती समान करायच्या आहेत. या धोरणाच्या अंमलबजावणीनंतर, तुम्ही दिल्ली, मुंबई, चेन्नई किंवा कोलकातासारख्या मेट्रो शहरात असाल किंवा लहान शहरात सोनं खरेदी करत असाल, तुम्हाला समान किंमत मोजावी लागेल. या धोरणांतर्गत सरकार नॅशनल बुलियन एक्स्चेंज तयार करेल, जे सर्वत्र सोन्याच्या समान किमती ठरवेल. तसेच, ज्वेलर्सना या किमतीतच सोनं विकावं लागणार आहे.
'वन नेशन, वन रेट' पॉलिसी अंतर्गत कसे ठरणार सोन्याचे दर?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, One Nation One Rate या धोरणांतर्गत सरकार नॅशनल बुलियन एक्सचेंज तयार करू शकते, ज्याद्वारे Gold Rate ठरवले जातात. जर सामान्य भाषेत सांगायचं झालं तर, सोन्याच्या दरांचंही शेअर बाजारासारखं होईल.
जसं शेअर मार्केटमध्ये बाजाराचा निर्णय बॉम्बे स्टॉक एक्सचेंज किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंजद्वारे केला जातो. त्याचप्रमाणे आता सोन्याचे दरही याच आधारावर ठरवले जातील. यामुळे असे होईल की, ज्वेलर्स स्वत:च्या मना प्रमाणे सोन्याचे दर ग्राहकाला देऊ शकणार नाहीत आणि दराबाबत केंद्रीकृत व्यवस्था असेल.
सध्या सोन्याचा दर कसा ठरवला जातो?
Gold Rate दर मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच, MCX च्या आधारे ठरवल्या जातात. या किमती स्पॉट किमती आहेत आणि प्रत्येक शहरातील सराफा असोसिएशनचे व्यापारी बाजार उघडण्याच्या वेळी एकत्रितपणे किंमत ठरवतात.
मागणी, पुरवठा, जागतिक बाजारपेठ आणि महागाई लक्षात घेऊन या किमती ठरवल्या जातात. हे दर वेगवेगळे असतात कारण प्रत्येक शहरातील सराफा व्यापाऱ्यांनी दर ठरवले आहेत.
'वन नेशन, वन रेट' पॉलिसी लागू झाल्यास सोनं स्वस्त होणार?
One Nation One Rate पॉलिसी लागू झाल्यानंतर विविध शहरांतील ज्वेलर्सच्या मनमानी कारभाराला चाप बसणार आहे. ज्वेलर्स आपल्या मनाप्रमाणे दर वाढवू किंवा कमी करू शकणार नाहीत.
एक्सचेंजद्वारे किंमत निश्चित केल्यानंतर, ज्या ठिकाणी सध्या सोन्याचे दर सर्वाधिक आहेत. त्या ठिकाणी दर कमी होण्याची शक्यता आहे. सोन्याचे दर सर्वत्र समान असल्यानं दर खाली येतील आणि ज्या शहरांमध्ये सोनं महाग आहे, तिथे अधिक फरक पडेल, असं अनेक अहवालांमधून सांगण्यात येत आहे.
'वन नेशन, वन रेट' पॉलिसीचा फायदा होणार?
One Nation One Rate पॉलिसीच्या अंमलबजावणीमुळे बाजारपेठेत पारदर्शकता वाढेल. सोन्याच्या किमतीत तफावत असल्यानं त्याच्या किमतीही कमी होऊ शकतात. याशिवाय सोनं विक्रीसाठी काही वेळा मनमानी दर आकारणाऱ्या ज्वेलर्सवरही अंकुश ठेवण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांत सोन्याच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. सध्या 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 74 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
अधिक वाचा :- Chandrapur News :- मुलानेच केली वडिलांची हत्या
अधिक वाचा :- Today Horoscope :- २३ जुलै २०२४ ; धनलाभ होईल, कुटुंबात सुख- शांती लाभेल
अधिक वाचा :- मृत्यूपूर्वी व्हिडिओ बनवून पोलीस पाटलाने ग्रामपंचायत कार्यालयातच आपले जीवन संपवले
अधिक वाचा :- Chimur News :- पुरात वाहून गेलेल्या दोन बँक कर्माऱ्यांनी झाडाला अडकून जीव वाचवला
ये पढ़िए :- ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन का ग्रे तलाक होगा? Grey Divorce क्या है?
What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा
तुमचे स्वप्न पूर्ण करणे,,
हाच आमचा ध्यास..
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments