अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
F
23-07-2024
नांदेड : आपल्या वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून अनेकदा कार्यालयीन कामाकाजातील कर्मचारी आत्महत्येसारखे (Crime News) टोकाचे पाऊल उचलतात.
अनेकदा अशा घटना पोलीस खात्यातही घटना घडल्याचं समोर आलं आहे. आता, पुन्हा एकदा अशीच हादरवरुन टाकणारी घटना समोर आली आहे. त्यामध्ये, एका पोलीस पाटलाने (Police) चक्क ग्रामपंचायत कार्यालयातच आपले जीवन संपवले.
या घटनेनंतर गावावर शोककळा पसरली असून नातेवाईकांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
नांदेड (Nanded) जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील पेवा या गावात ही घटना घडली.दरम्यान, या घटनेनंतर तात्काळ गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयाकडे धाव घेतली होती. तर, तालुका ग्रामीण पोलिसही घटनास्थळी पोहोचले.
पेवा गावचे पोलीस पाटील असलेल्या बालाजी जाधव यांनी काल ग्राम पंचायत कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडीओ बनवला होता.
त्या व्हिडिओ मध्ये त्यांनी हदगाव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक बडीकर यांच्या नावाचा उल्लेख केल्याचे आढळून आले आहे. नेवा येथील पोलिस पाटील बालाजी जाधव यांनी काल सकाळी आत्महत्या केल्याने गावात एकच खळबळ उडाली.
माझ्या मृत्युला पोलीस उपनिरीक्षक PSI बडीकर हे जबाबदार असल्याचा उल्लेख त्यांनी व्हिडीओ मध्ये केलेला आहे. बडीकर यांनी माझ्यावर अन्याय करायला नको होता, मी त्या घटनेची माहिती देऊनही माहिती लपवली असा रिपोर्ट त्यांनी केला, असं मृत बालाजी जाधव यांनी व्हिडीओ मध्ये म्हटले.
दरम्यान, याबाबत अधिक माहिती घेतली असता, १५ दिवसापूर्वी पेवा या गावात एकाचा खून झाला होता. जातीय वादातून हा खून झाल्याचे सांगण्यात येते आहे, याच घटनेतील आरोपीबद्दल पोलीस पाटील बालाजी जाधव यांनी माहिती लपवली असा वरिष्ठ पोलिसांचा समज होता.
पोलीस उपनिरिक्षक PSI बडीकर यांनी बालाजी जाधव यांना विचारणा केलेली होती. पण, आपल्यावर खोटा आरोप होत असल्याचे त्यांनी आत्महत्या केली असा आरोप आता होत आहे.
या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी मृतदेह थेट पोलीस ठाण्यात नेल्याचे पाहायला मिळालं.
तसेच, संबंधित वरिष्ठ पोलिसांवर कारवाई करण्याची मागणीही ग्रामस्थांनी व बालाजी यांच्या कुटुंबीयांना केली आहे. मात्र, या घटनेमुळे पोलीस स्टेशन आणि तालुक्यात खळबळ उडाली आहे.
अधिक वाचा :- Chimur News :- पुरात वाहून गेलेल्या दोन बँक कर्माऱ्यांनी झाडाला अडकून जीव वाचवला
अधिक वाचा :- Today Horoscope :- २२ जुलै २०२४ ; आजचा पूर्ण दिवस आनंद, उत्साह व मनोरंजनात जाईल
अधिक वाचा :- विक्की कौशल ने खुलासा किया कि पर काम करते समय रेत माफिया ने उन्हें लगभग पीटा था
अधिक वाचा :- आंबोली धबधब्यावर गेलेल्या तरुणाचा मृत्यू, बाईक घसरली अन् क्षणात सगळं संपलं
ये पढ़िए :- ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन का ग्रे तलाक होगा? Grey Divorce क्या है?
अधिक वाचा :- Gadchiroli News : सॅल्यूट... हातातून गोळी आरपार गेली, तरीही ६ तास लढला
अधिक वाचा :- Chandrapur News :- चंद्रपूर जिल्ह्यात पाऊसाचा जोर सुरूच, दोघे जण गेले वाहून
अधिक वाचा :- Chandrapur News :- पत्नी ने संपवली पतीची जीवन यात्रा
अधिक वाचा :- Warora News :- रागाच्या भरात तरुणीने उचलले टोकाचे पाऊल
अधिक वाचा :- Chandrapur News :- डॉक्टर युवतीने वैनगंगा नदीमध्ये केली आत्महत्या
अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा
☎️ : ७७५८९८६७९८
जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments