निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
21-07-2024
Chandrapur News :- दिनांक १९ व २० जुलै पासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने काही तालुक्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच प्रादेशिक हवामान खात्याने सोमवार दि. २२ जुलै रोजी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, शाळा आणि महाविद्यालये २२ जुलै २०२४ रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी निर्गमित केले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात १९ व २० जुलै रोजी अनेक तालुक्यात अतिवृष्टी होऊन अनेक रस्ते पाण्याखाली गेले. तसेच गावांना पुराचा वेढा पडल्याने जनजीवन विस्कळीत होण्याच्या घटना घडल्या आहेत.
हवामान खात्याने २१ व २२ जुलै रोजी Chandrapur जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये व अतिवृष्टीमुळे शालेय विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारे समस्या होऊ नये, याकरिता Chandrapur जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा, विद्यालय व महाविद्यालय यांना २२ जुलै २०२४ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
या काळात सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे व सदर आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी.
तसेच भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी व आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर दूरध्वनी क्रमांक 07172-250077 तसेच 07172 -272480 या क्रमांकावर संपर्क करावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद आहे.
अधिक वाचा :- विक्की कौशल ने खुलासा किया कि पर काम करते समय रेत माफिया ने उन्हें लगभग पीटा था
अधिक वाचा :- आंबोली धबधब्यावर गेलेल्या तरुणाचा मृत्यू, बाईक घसरली अन् क्षणात सगळं संपलं
ये पढ़िए :- ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन का ग्रे तलाक होगा? Grey Divorce क्या है?
आज का राशिफल :- Today Horoscope :- २१ जुलै २०२४ ; किसी महत्वपूर्ण व्यक्ति से मुलाकात होगी
अधिक वाचा :- Gadchiroli News : सॅल्यूट... हातातून गोळी आरपार गेली, तरीही ६ तास लढला
अधिक वाचा :- Chandrapur News :- चंद्रपूर जिल्ह्यात पाऊसाचा जोर सुरूच, दोघे जण गेले वाहून
अधिक वाचा :- Gadchiroli News :- जनता वाऱ्यावर, पालकंत्र्यांना फ्कत उधोग्यासाठी वेळ
अधिक वाचा :- Chandrapur News :- पत्नी ने संपवली पतीची जीवन यात्रा
अधिक वाचा :- Warora News :- रागाच्या भरात तरुणीने उचलले टोकाचे पाऊल
अधिक वाचा :- Chandrapur News :- डॉक्टर युवतीने वैनगंगा नदीमध्ये केली आत्महत्या
अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा
☎️ : ७७५८९८६७९८
जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments