नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
14-07-2024
Warora :- वरोरा व भद्रावती तालुक्यातील विद्यार्थ्यांना बस सेवेत होणाऱ्या समस्यांना घेऊन भारतीय जनता पक्षाच्या एका शिष्टमंडळाने १२ जुलै रोज शुक्रवारला वरोरा Warora बस आगर प्रमुखांची भेट घेऊन विद्यार्थ्यांना सतावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याची मागणी केली.
भद्रावती व वरोरा येथे शिक्षणासाठी ग्रामीण भागातून दररोज येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बससाठी बरेच ताटकळत राहावे लागते. तसेच बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी कोंबले जातात.
यासारख्या समस्येबाबत बस आगर प्रमुखांना निवेदन देऊन सुद्धा समस्यांचे निराकरण होत नसल्याने भाजपचे प्रदेश अल्पसंख्यांक सेलचे उपाध्यक्ष व वरोरा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने येथील बस आगर प्रमुख पुण्यवर्धन वर्धेकर यांची भेट घेतली व विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्येबद्दल विस्तृत चर्चा केली.
ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांना ये जा करण्याकरता बसेस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी शिष्टमंडळाने आगार प्रमुखांना केली.
गावात शिक्षणाची पुरेशी सोय नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी यावं लागते.मात्र त्यांना बसने प्रवास करत असताना मोठ्या समस्यांना सामोरे जावं लागत आहे.
काही गावात बसच जात नसल्याने विद्यार्थ्यांना पायदळ प्रवास करत मोठी कसरत करावी लागत असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तर काही ठिकाणी बस थांबा असून सुद्धा बस थांबत नाही तर बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना कोंबणे आदी समस्यांबाबत सकारात्मक भूमिका घेऊन विद्यार्थ्यांची सोय करण्याची विनंती शिष्टमंडळाने आगार प्रमुखांना करत विद्यार्थ्यांच्या समस्या त्वरित सोडविण्याची मागणी केली.
सध्या वरोरा बस आगारात ३५ बसेस असून त्यापैकी नऊ बसेस पंढरपूर यात्रेसाठी देण्यात देण्यात आल्याने समस्या निर्माण निर्माण झाली आहे. २१ जुलै नंतर यावर आपण योग्य नियोजन करून तोडगा काढण्याची माहिती यावेळी बस आगर प्रमुख पुण्यवर्धन वर्धेकर यांनी शिष्टमंडळाला दिले दिली.
भाजप प्रदेश अल्पसंख्यांक सेलचे उपाध्यक्ष माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांच्या नेतृत्वात गेलेल्या शिष्टमंडळात वरोरा Warora येथील आशिष ठाकरे, खुशाल बावणे, बाबू शेख, आतिश बोरा,कादर शेख तर भद्रावतीचे रवी पवार, अरुण मेदमवार, मनोज शेंडे, सुरेंद्र घुगल, शैलेंद्र मेश्राम, रोहित पाराशर आदींचा समावेश होता.
अधिक वाचा :- Warora News :- वरोरा पोलीस ठाण्यातील शिपायाने केले विष प्राशन
अधिक वाचा :- Today Horoscope :- १४ जुलै २०२४ ; विश्वासार्हता वाढेल, व्यवसायात लाभ, शुभ दिवस आहे
अधिक वाचा :- Warora News :- वरोरा शहरात चोरीचे सत्र सुरूच, लखोचे सोने चांदी आणि रोख रक्कम केली लंपास
अधिक वाचा :- Chandrapur News :- चंद्रपूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी निलंबित ! नोटीस येताच कार्यवाही
अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा Chandrapur
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा
☎️ : ७७५८९८६७९८
जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments