नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
20-03-2024
Fake Marriage :- उत्तर प्रदेशा मध्ये, मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेद्वारे नवविवाहित जोडप्यांना आर्थिक मदत दिली जाते. या योजनेत अनेक गैरप्रकार होत असल्याचे समोर येत आहेत. यातील एक प्रकरण समोर आल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
सामूहिक विवाह सोहळ्यात जोडप्यांना अनुदान आणि घरगुती वस्तूंचे वाटप केले जाते. त्याचा गैरवापर करण्यासाठी अनेक एजंट सक्रिय आहेत.
अधिक वाचा :- LOK SABHA ELECTIONS ; आजपासून विदर्भात या ५ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरता येणार
या दलालांनी भाऊ-बहिणीचे लग्न लावून दिल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या बहिणीचे आधीच लग्न झाले होते. तरीही, तिचे तिच्या भावाशी लग्न लावून देण्यात आले आणि हा गैव्यवहार सामोरं आलं.
आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय लोकांना मदत करण्यासाठी Uttar Pradesh मध्ये मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजना सुरू करण्यात आली. या योजनेतील भ्रष्टाचाराच्या अनेक चांगल्या कथा वेळोवेळी समोर येत असतात.
अधिक वाचा :- Ajche Rashibhavish ; २० मार्च २०२४ ; भाग्यवान, आर्थिक लाभ ; आनंदाचा दिवस आहे
नुकतीच महाराजगंज जिल्ह्यातून एक घटना समोर आली आहे. योजनेची सबसिडी मिळवण्यासाठी मध्यस्थ एजंटने भाऊ बहिणीचेच लग्न लाऊन दिली. यानंतर दोघांना ३५ हजार रुपयांचे अनुदान आणि संसारोपयोगी साहित्य मिळाले.
सामुहिक विवाह सोहळा योजनेंतर्गत महाराजगंज जिल्ह्यातील लखीमपूर मंडळात ५ मार्च रोजी ३८ जोडप्यांचा विवाह पार पडला. यावेळी वर्षभरापूर्वी लग्न झालेल्या महिलेने सरकारी अनुदानासाठी पुन्हा लग्न करण्याची तयारी दर्शवली.
अधिक वाचा :- Buldhana News ; लोकांनी रस्त्यावरच केला अंत्यसंस्कार...
मात्र लग्नाच्या दिवशी अचानक ठरलेला पती मंडपात पोहोचू शकला नाही. त्यामुळे अडचणीत आलेल्या दलालांनी महिलेच्या भावाला तिचा पती बनवले आणि त्यांच्यामध्ये रितीरिवाजा प्रमाणे विवाह पार पडला.
वरील घृणास्पद घटना उघडकीस आल्यानंतर Uttar Pradesh च्या प्रशासनाला खडबडून जाग आली.
प्रांत विकास अधिकाऱ्यांनी ही घटना गांभीर्याने घेत जोडप्याला लग्नासाठी दिलेले साहित्य परत करण्याची मागणी केली आहे.
अधिक वाचा :- Golden Vastara ; सोन्याच्या वस्ताऱ्याने दाढी - कटिंगसाठी लोकांच्या रांगा
३५ हजार रुपयांचा धनादेश अनुदान म्हणून देऊ नये, असे आदेशही देण्यात आले. लक्ष्मीपूरचे जिल्हा अधिकारी अमित मिश्रा यांनी सांगितले की, ५ मार्च रोजी झालेल्या सामूहिक विवाह सोहळ्यातील फसवणूक आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही कारवाईचे आदेश दिले आहेत.
*अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा.*
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
*आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा*
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
*वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा*
☎️ : _७७५८९८६७९८_
*_जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा._*
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Education
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
M S Official
National
Vaingangavarta19
Local News
MK CREATION
Agriculture
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
No Comments