ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
17-03-2024
यवतमाळ : State Bank of India कडे विश्वासार्ह वित्तीय संस्था म्हणून पाहिले जाते. परंतु, एका प्रकरणात या बँकेने केलेली फसवणूक विश्वासघात झाला आहे.
शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर विमा पॉलिसी काढण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी विविध डावपेचांचा अवलंब करण्यात आला. बँकेचा हा प्रयत्न ग्राहक आयोगाने उघडकीस आणला. शेतकरी कुटुंबाला विमा दव्याचे रु. २० लाख देण्याचे आदेश दिले आहे.
अधिक वाचा :- Nagpur News :- live-in relationship मध्ये राहत आसलेल्या गर्लफ्रेंड ला मरहाण
पांढरकवडा तालुक्यातील कवठा येथील रामेश्वर शंकर झोडे यांचा नदीत बुडून मृत्यू झाला. त्यांच्या मुलाने State Bank of India च्या पटनाबोरी (पांढरकवडा पोलीस स्टेशन) शाखेत विम्याची रक्कम मिळवण्यासाठी दावा केल्यानंतर अशी फसवणूक झाल्याचे समोर आले.
बँक व विमा कंपनीने नुकसान भरपाई देण्यास नकार दिल्याने रामेश्वर झोडे यांचा मुलगा नंदकिशोर झोडे याने यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगाकडे तक्रार दाखल केली.
अधिक वाचा :- Nagpur News :- रेल्वे मध्ये तरुणीशी अश्लील वर्तन करणाऱ्या आरोपीची प्रवाशांनी केली धुलाई
रामेश्वर झोडे यांना State Bank of India च्या पाटणबोरी शाखेतून 64 हजार 300 रुपयांचे पीक कर्ज मंजूर झाले. 16 जून 2019 रोजी त्याच्या खात्यात 61 हजार रुपये जमा झाले.
तीन हजार ३०० रुपये वजा केले. पीक कर्ज देताना विमा Policy घेण्याचे संकेत आहेत. SBI जनरल इन्शुरन्स कंपनी State Bank of India शी संबंधित आहे आणि या संस्थेमार्फत पॉलिसी काढण्याची प्रथा आहे.
अधिक वाचा :- Today Horoscope ; १७ मार्च २०२४ ; संपत्ती, प्रतिष्ठा वाढेल आणि सरकारकडून लाभ मिळण्याची शक्यता आहे
रामेश्वर झोडे यांच्या मृत्यूनंतर नंदकिशोर झोडे यांनी विम्याचा दावा मिळवण्यासाठी बँकेशी संपर्क साधला. मात्र, रामेश्वर झोडे यांचे पॉलिसी आपल्याकडे नसल्याचे सांगत त्यांना भरपाई नाकारण्यात आली.
२१ ऑगस्ट २०२९ रोजी निधन झाले. त्यावेळी त्यांची कोणतेही पॉलिसी नसल्याचे सांगण्यात आले. यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगाकडे दावा दाखल करण्यात आला होता,
अधिक वाचा :- Akshay Kumar भारत सरकारला विनंती करत म्हणतो की, संकट काळात नेहमी अमेरिका....
त्यावेळी बँकेने सांगितले होते की, पॉलिसी २६ फेब्रुवारी २०२० ते २५ फेब्रुवारी २०२१ या कालावधीसाठी होती. आयोगाने असा निष्कर्ष काढला की बँकेने पॉलीसी नुसार २०१९ मध्ये प्रत्यक्षात रक्कम कमी केली होती.
पॉलिसीची रक्कम द्यावी लागू नये यासाठी अनेक कारणे पुढे करण्यात आली असल्याचे आयोगाने आपल्या निर्णयात म्हटले आहे.
अधिक वाचा :- Pulkit Kriti Wedding ; Pulkit Samrat आणि Kriti kharbanda अडकले लग्न बंधनात
बँकेने सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये अनेक बाबींवरून शंका उपस्थित झाल्या. 26 फेब्रुवारी 2020 रोजी खात्याच्या स्टेटमेंटमध्ये 'मायक्रो इन्शुरन्स' या शीर्षकाखाली 1510 रुपयांची वजावट दिसली.
रामेश्वर झाडे यांचे 21 ऑगस्ट 2019 रोजी निधन झाले. या प्रकरणात आयोगाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, बँक आणि विमा कंपनीने आपली पॉलिसी काढण्याचा प्रस्ताव कोणी दिला होता हे स्पष्ट केलेले नाही.
अधिक वाचा :- Pushpa 2 ; श्रेयस तळपदे पुष्पा 2 लाही आवाज देणार काय ? तो म्हणतो माझी इच्छा तर आहे पण...
2019 मध्ये कर्ज मंजूर करताना 3,300 रुपये का कापले गेले याचे कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. बँकेने आपली जबाबदारी नीट पार पाडली नसल्याचे स्पष्ट होत असल्याचे आयोगाने म्हटले आहे.
रामेश्वर शंकर झोडे यांचा मृत्यू अपघाती नव्हता, असा युक्तिवाद SBI जनरल इन्शुरन्स कंपनीने केला होता.
अधिक वाचा :- Wardha News ; संपत्तीच्या वादातून बहिणीने भावाच्या घरी केली आत्महत्या
पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार रामेश्वर जोडे यांचा मृत्यू अपघाती झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आयोगाने कंपनीच्या विरोधात निकाल दिला.
सभापती नंदकुमार वाघमारे व सदस्य हेमराज ठाकूर यांनी हा निर्णय दिला आहे. यामध्ये नंदकिशोर झाडे याची बाजू ॲड. रवींद्र सोनटक्के यांनी प्रस्तुत केली होती.
अधिक वाचा :- Amitabh Bachchan ; अमिताब बच्चन यांना मिळाला डिस्चार्ज, या कारणामुळे रूग्णालयात दाखल झाले होते
*अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा.*
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
*आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा*
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
*वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा*
☎️ : _७७५८९८६७९८_
*_जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा._*
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Education
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
M S Official
National
Vaingangavarta19
Local News
MK CREATION
Agriculture
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
No Comments