नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
11-03-2024
Gadchiroli News :- गडचिरोली : दारासमोर खेळणाऱ्या पाच वर्षांच्या चिमुरडीचा शासकीय निवासस्थानी बोलावून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हवालदाराने विनयभंग केला.
एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम गावात ९ मार्च रोजी ही भीषण घटना घडली. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे उपचाराअभावी पीडितेचा हेळसांड होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
अधिक वाचा :- Gadchiroli News ; चपराळा येथे महाशिवरात्री यात्रेत ऑन ड्युटी असताना चक्कर आली आणि...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष नागोबा कोंडेकर वय वर्ष ५२, रा. भेंडाळा जि. चामोर्शी असे आरोपीचे नाव आहे.
९ मार्च रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास पीडित मुलगी घरासमोर खेळत होती. जवळच आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी शासकीय निवासी वसाहत आहे. संतोष कोंडेकर हे तेथे एकटेच राहतात.
त्याने मुलीला जवळ बोलावून घरात नेले आणि तिचा विनयभंग केला. एका मुलीने हा सर्व प्रकार पाहिले आणि घरी जाऊन याबाबत सांगितले.
त्यानंतर या घटनेला वाचा फुटली. कुटुंबीय पीडितेला गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेले, मात्र वैद्यकीय अधिकारी गैरहजर होते.
त्यामुळे त्यांनी उपचारासाठी मुलीला घेऊन रात्री जिल्हा महिला व बाल रुग्णालय गाठले. १० मार्च रोजी सकाळी मुलीला पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले आहे.
पीडितेच्या आईच्या जबानीवरून गडचिरोली पोलीस ठाण्यात बलात्कार, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे प्रकरण तपासासाठी एटापल्ली तालुक्यातील संबंधित पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे. दरम्यान, ही घटना अत्यंत दुर्दैवी असून सविस्तर अहवाल मागविण्यात येणार आहे. दावल साळवे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.
संतोष कोंडेकर हा आरोपी या घटनेनंतर हा फरार झालेला असून, पोलीस समोरील कारवाई करत आहे. सुरुवातीला ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून काम करणारा संतोष दोन वर्षांपासून एटापल्ली तालुक्यातील आरोग्य केंद्रात हवालदार म्हणून रुजू झाला आहे.
त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पेंढरीचे उपअधीक्षक जगदीश पांडे यांनी ही माहिती बोलताना दिली.
अधिक वाचा :- Entertainment News ; सारा अली खानला हा मराठी पदार्थ आणि हे मराठी गाणं आवडते
*अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा.*
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
*आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा*
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
*वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा*
☎️ : _७७५८९८६७९८_
*_जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा._*
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Education
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
M S Official
National
Vaingangavarta19
Local News
MK CREATION
Agriculture
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
No Comments