ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
09-03-2024
Resturant Reviews Scam ;- गोंदिया: गुगलवरील रेस्टॉरंटकरिता रिव्ह्यू दिल्यास घरबसल्या पैसे मिळणार, असा मेसेज पाठवून त्यानंतर तरुणाकडून टप्प्याटप्प्याने पैसे घेऊन तब्बल तीन लाख ८८ हजार ५०० रुपयांची फसवणूक करण्यात आली.
रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत न्यू लक्ष्मीनगर परिसरात २३ ते २९ फेब्रुवारी दरम्यान हा सर्व प्रकार घडलेला आहे.
फिर्यादी संजोग प्रमोद दारोडकर वय वर्ष २६, रा. न्यू लक्ष्मीनगर या तरुणाच्या मोबाइलवर Google वरील रेस्टॉरंटकरिता रिव्ह्यू दिल्यास घरबसल्या पैसे मिळतील असा मेसेज आला.
अधिक वाचा :- Today Horoscope ; जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस.., काय सांगते तुमची राशी...
मोबाइल क्रमांक ९५७२७३३६५९ धारक रितूश्री बोउरूह एच.आर.फार्म स्कूल व्हुप इंडियन ऑनलाइन मीडिया पीवीटी. एलटीडी कंपनी दिल्ली या नावाने पाठविला.
तसेच संजोगच्या What's App वर रेस्टॉरंटची Google लिंक पाठवून नंतर राधिका ०२३३६३ या टेलिग्राम आयडीची धारक राधिका मित्तल हे रेस्टॉरंट करिता Review करण्यासाठी २१ टास्क करावे लागतील.
अधिक वाचा :- Nagpur News ; नागपुर मध्ये महिला दिनाच्या दिवशीच कॅब मध्ये बसलेल्या तरुणीला मारहाण
त्याबद्दल Review चे पैसे मिळतील असे सांगून Telegram वर Google Review टीम-७०३२ या group मध्ये समाविष्ट केले.
त्यानंतर तिवारी-१२३०३ या Telegram आयडी धारक किसन तिवारी याच्याशी संगनमत करून किसन तिवारीने Telegram वर जॉईन मिशन -७९ या ग्रुपमध्ये समाविष्ट करून घेत १०-१२ टास्कच्या टप्प्यांमद्ये १५०००, ३६,००० व ९७,८००, अडकलेले पैसे परत मिळविण्यासाठी रिपेअर ऑर्डर करिता २,३८,००० रूपये राधिका मित्तलने फिर्यादीच्या टेलिग्रामवर पाठविलेल्या वेगवेगळ्या UPI आयडीवर सेंड करण्यास लावून फिर्यादीची ३,८८,५०० रुपयांची फसवणूक केली.
अधिक वाचा :- आमिर खानने इंस्टाग्राम लाइव्ह दरम्यान धूम्रपान केले
पोलिसांनी भादंवि कलम ४२० सहकलम ६६ D माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
या प्रकरणात मोबाइल क्रमांक ९०५४६७९४४६ नंबरधारक आणि Telegram, राधिका ०२३३६३ धारक राधिका मित्तल न्यू दिल्ली तसेच टेलिग्राम आयडी तिवारी १२३०३ चा धारक किसन तिवारी न्यू दिल्ली यांच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
अशा प्रकारे चे scam करणारे लोक What's App वर, Telegram वर आणि SMS द्वारे आपल्याला संपर्कात येऊन, आपल्याला सोबत scam करू शकतात, म्हणून कोणताही घरून पैसे कमवण्याबाबत एसएमएस येत असल तर आधी सतर्क व्हा तुमच्या सोबत scam होऊ शकतो.
म्हणून सावधान रहा, जागृत राहा.
अधिक वाचा :- Lok Sabha Elections ; BJP मध्ये कोण जाणार ?
*अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा.*
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
*आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा*
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
*वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा*
☎️ : _७७५८९८६७९८_
*_जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा._*
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Education
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
M S Official
National
Vaingangavarta19
Local News
MK CREATION
Agriculture
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
No Comments