अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
F
04-03-2024
Education News :- नागपूर :- सरकारने इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी परीक्षे मधू बदल केला आहे, सरकारने नवीन शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली असून ३४ वर्षांनंतर देशात नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार आहे.
येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यात नवीन शैक्षणिक धोरण लागू करणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणाद्वारे शिक्षण व्यवस्थेतही अनेक मोठे बदल करण्यात आलेले आहेत.
अधिक वाचा :- Tadoba News ; ताडोबा उत्सवा दरम्यान दोन वाघांनी घेतले हनुमानजी चे दर्शन
यामध्ये गुणवत्तेला अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे शालेय शिक्षणातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे दोन टप्प्यात मूल्यांकन करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
यासाठी महाराष्ट्र शासनाने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार नियम २०११ मध्ये सुधारणा केली आहे. यासाठी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून कोणालाही नापास करायचे नाही.
अधिक वाचा :- Nagpur News ; लग्नाला फक्त २० दिवस झाले होते, पण नववधूने उचलले टोकाचे पाऊल
प्रत्येक विद्यार्थ्याची पात्रता परीक्षा पाचवी आणि आठवी टप्प्यात घेतली जाईल. राज्य शिक्षण मंडळाच्या सर्व अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांना हा नियम लागू असेल.
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास करता येत नव्हते.
अधिक वाचा :- Yewatma News ; दारूच्या नशेत तीन मुलींनी एका तरुणांची मारहाण केली आणि पोलीस बगतच राहिली
तथापि, कायद्याने विद्यार्थ्यांचे सतत मूल्यमापन करणे बंधनकारक आहे. त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे बहुतांश विषयात विद्यार्थी मागे राहू लागले.
विद्यार्थी परीक्षेत नापास होत होते कारण त्यांची क्षमता थेट नववीच्या वार्षिक परीक्षेत मोजली जात होती.
अधिक वाचा :- 26/11 attack ; २६/११ च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड दहशतवाद्याचा मृत्यू
सुधारित नियमांनुसार, मुलाला पाचवीपर्यंत वयानुसार वर्गात प्रवेश दिला जाईल. इयत्ता ६ वी ते ८ वी मध्ये वयानुसार प्रवेश देताना मुलाने इयत्ता ५ वी साठी विहित केलेली वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असेल.
या परीक्षेत मुलाने उत्तीर्ण न झाल्यास मुलाला पाचव्या वर्गात प्रवेश दिला जाईल. यामुळे शाळेत प्रवेशाच्या एका टप्प्यावर त्याला पाचवीच्या परीक्षेत बसून आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागणार आहे.
अधिक वाचा :- Automobile News ; बजाज ने बाजारात आणले Pulsar NS125 चे अपडेटेड व्हर्जन
यामुळे शिक्षक आणि पालक दोघांची शैक्षणिक जबाबदारी वाढेल. यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
इयत्ता पाचवी आणि आठवीच्या वार्षिक परीक्षा प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या शेवटी घेतल्या जातील जेणेकरून विद्यार्थी पुढील वर्गात जाण्यासाठी त्यांची पात्रता सिद्ध करू शकतील.
अधिक वाचा :- Gadchiroli News ; सर्व कुटुंबे गाढ झोपेत होते आणि तीन घरे आगीत जळून खाक झाली, संसार उघड्यावर पडला
जर विद्यार्थी वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकला नाही, तर अशा मुलाला संबंधित विषयात शाळेला अतिरिक्त पूरक मार्गदर्शन द्यावे लागेल आणि वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत त्याची/तिची पुनर्परीक्षा करावी लागेल.
जर विद्यार्थी पुनर्परीक्षेत अनुत्तीर्ण झाले, तर त्यांना इयत्ता पाचवी किंवा आठवीमध्ये, जसे असेल तसे ठेवले जाईल. परंतु, प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही विद्यार्थांना शाळेतून काढून टाकले जाणार नाही.
अधिक वाचा :- Dolly Chai Wala ; Bill Gates ला चहा माहीत नव्हता! 'डॉलीला यावेळी या मोठया हस्तीला चहा सर्व्ह करायचा आहे
*अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा.*
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
*आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा*
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
*वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा*
☎️ : _७७५८९८६७९८_
*_जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा._*
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Food
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
No Comments