नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
20-12-2023
नागपूर : राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारी २०२४ मध्ये राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून maratha aarakshan दिले जाईल, ही घोषणा करतानाच मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही, याची खात्री देतो, अशी ग्वाही मुख्यमंत्री eknath shinde यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.
मागील आठवड्यात maratha aarakshan वर सत्ताधारी पक्षाकडून प्रस्ताव आणण्यात आलेला होता. भाजपचे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सुरुवात केलेल्या प्रस्तावावरील चर्चेत ७४ आमदारांनी भाग घेतला. ही चर्चा एकूण १७ तास चालू होती. त्याला मुख्यमंत्री eknath shinde यांनी उत्तर दिले. आपण सरकारच्या कामावर विश्वास ठेवावा. मी मराठा समाजातील तरुणांना आश्वस्त करतो, समाजाला टिकणारे आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
शिंदे समितीच्या अहवालाची छाननी शिंदे समितीने दोन अहवाल सरकारला दिलेले आहेत. पहिला अहवाल सरकारने ३१ ऑक्टोबरला स्वीकारला. दुसरा ४०७ पानांचा अहवाल सोमवारी सादर झाला. तो छाननीसाठी विधि व न्याय विभागाला पाठवलेला असून, त्यांच्या अभिप्रायानंतर तो मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्यात येणार आहे.
maratha aarakshan च्या विषयावर माझ्या अध्यक्षते खाली १० बैठका झाल्या, उपसमितीच्या १२ बैठका झाल्या, मुख्य सचिवांच्या अध्यक्षते खाली एक आणि सल्लागार मंडळाच्या ७ अशा एकूण ३० बैठका आमच्या कार्यकाळात झाल्या. सर्वपक्षीय बैठका देखील घेतल्या आहेत, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाला आरक्षण नेमके कसे देणार, याबाबत मुख्यमंत्र्यांनी ना पुढील दिशा सांगितली, ना कालमर्यादा स्पष्ट केली. ही मराठा समाजाची शुद्ध फसवणूक आणि दिशाभूल आहे.- अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री
आणखी काय म्हणाले मुख्यमंत्री?
गेल्या काही दिवसांत सामाजिक वातावरण दूषित करणारे प्रसंग घडले. पुरोगामी महाराष्ट्राला हे परवडणारे आणि भूषणावह नाही. राज्यात तणाव वाढणार नाही, याची काळजी घेण्याची आपली सगळ्यांची जबाबदारी आहे.ज्यांच्याकडे जुने पुरावे आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत कुणाचाही विरोध नाही. १९६७ पूर्वीच्या ज्यांच्या कुणबी नोंदी आहे त्यांच्या रक्त्तातील सर्व नात्यांमधील कुणबी प्रमाणपत्र मिळेल; मात्र प्रमाणपत्रासाठी खोटी कागदपत्रे देणाऱ्यांवर सक्त कारवाई होईल.
विरोधकांचा सभात्याग maratha aarakshan बाबत सरकारने कोणतीही ठोस घोषणा न केल्याचा आरोप करीत, तसेच मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर बोलायला दिले नाही म्हणून विरोधकांनी घोषणाबाजी करीत सभात्याग केला.
ओबीसींना धक्का न लावता obc aarakshan नाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्यात येईल, असे मुख्यमंत्री eknath shinde यांनी सांगितले.
*अशाच बातम्य साठी what's app ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा.*
https://chat.whatsapp.com/D1DbYlUu9dlKOUSFhuhBYW
*जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा*
☎️ : _७७५८९८६७९८_
*_जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा._*
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Education
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
M S Official
National
Vaingangavarta19
Local News
MK CREATION
Agriculture
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
No Comments