ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
25-11-2023
Warora news : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे (excise department) वरोराचे निरीक्षक विकास थोरात यांच्या कारवाईत वरोऱ्यामधील बनावट मद्य तस्कर करणारे आरोपी अनिलसिंग अजबसिंग जुनी उर्फ पिंटू सरदार व आशिष पुरुषोत्तम मडावी ह्या दोन आरोपीस जेर बंद केले आणि त्यांच्या वाहन ही जप्त केले, अखेर राज्य उत्पादन शुल्क विभागास बनावट मद्य तस्करी करणाऱ्यांना पकडण्यात यश आलेले आहे.
गुप्त मिळालेल्य माहिती नुसार शुक्रवारी दि. २४ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या वेळी आनंदवन चौक वरोरा येथे आरोपींना वाहना सोबत ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या वाहनात ९० मिलीच्या ६०० देशी मद्याच्या बनावट बाटल्या असून एकूण १ लाख १६ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे वरोरा तालुक्या मधील बनावट देशी मद्य विक्री करणारा मुख्यसूत्रधार पकडला गेला.
आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले, पुढील तपासासाठी आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे.
ही संपूर्ण कारवाई नागपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपआयुक्त अनिल चासकर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शना खाली वरोराचे निरीक्षक विकास थोरात, सचिन पोलेवार, दुय्यम निरिक्षक भगीरथ कुडमेथे, सहाय्य कदुय्यम निरीक्षक जगदीश मस्के, विलास महाकुलकर यांनी पार पाडली. गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक सचिन पोलेवार करत आहेत.
अशाच बातम्य साठी what's app ग्रुप ला जाईन व्हा
https://chat.whatsapp.com/D1DbYlUu9dlKOUSFhuhBYW
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Education
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
M S Official
National
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
MK CREATION
Agriculture
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
No Comments