STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
F
07-11-2023
आष्टी, गडचिरोली: आष्टी-मुलचेरा मार्गावर वाघाचा मुक्तसंचार सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. लोहारा जंगल क्षेत्रा जवळ ५ नोव्हेंबरला सायंकाळी हा वाघ काही प्रवाशांना रस्ता ओलांडताना दिसला. ह्या वाघाचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच प्रसिद्ध झाला आहे.
चौडमपल्ली वनपरिक्षेत्र कार्यालया अंतर्गत येत असलेल्या चपराळा अभयारण्याच्या लोहारा या क्षेत्रात हा वाघ संचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी ह्या वाघाने एका शेतकऱ्यावर हल्ला देखील केला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गायी वर नजर होती. आष्टी-मुलचेरा मार्गावरील लोहारा येथे रस्ता ओलांडताना वाघाचे फोटो प्रवाशांनी कॅमेऱ्यात काढलेले आहे . दरम्यान, हा वाघ पाहून प्रवाशांची धाकधूक वाढली. वाघ जंगलात गेल्यानंतर प्रवाशांनी वाहन मार्गस्थ केले.
हा वाघ आष्टी, मार्कंडा या भागातही येऊ शकतो, असा वनविभागाच्या अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. या पार्श्वभूममीवर जंगलात काही ठिकाणी कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. दरम्यान, लोहारा व परिसरातील गावांत दवंडी देऊन, सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Politics
विदर्भ फायर न्यूज
International
विदर्भ फायर न्यूज
Food
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments