यशोदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल & क्रिटिकल केअर
यशोदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कारगिल चौक, गडचिरोली
15-03-2024
चिमूर:-
विशेष सहाय्य योजनेअंतर्गत राज्य शासन पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी.बी.टी. पोर्टलद्वारे करण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला असुन तसे निर्देश प्राप्त झाले आहेत. या योजनेत समाविष्ट सर्व लाभार्थ्यांचे बँक खाते आधार लिंक करणे आवश्यक झाले आहे. याकरिता लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड, बँक खाते, राशन कार्ड व मोबाईल नंबर 25 मार्च 2024 पर्यंत तहसिल कार्यालय, चिमुर येथील संजय गांधी निराधार शाखेत जमा करावे, असे आवाहन तहसिल कार्यालयाद्वारे करण्यात आले आहे.
ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड, बँक खाते, राशन कार्ड व मोबाईल नंबर तहसिल कार्यालयाच्या संजय गांधी निराधार विभागात प्राप्त होणार नाही, त्यांचे अनुदान त्यांच्या बँक खात्यावर जमा होणार नाही. त्यामुळे भविष्यातील गैरसोय टाळण्यासाठी वरील अत्यावश्यक माहीती संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या विभागात सादर करावी.
दिव्यांग, अशिक्षित, निराधार असलेल्या लाभार्थ्यांपर्यत ही माहिती पोहचु शकणार नसल्याने, जागरुक जनता, सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, उमेद कर्मचारी जे जनतेच्या सदैव संपर्कात असतात, त्यांनी आपल्या आसपासच्या लाभार्थ्यांना हि माहीती द्यावी असे आव्हान चिमूर तहसील कार्यालयाद्वारे करण्यात आले आहे
यशोदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कारगिल चौक, गडचिरोली
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Education
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
M S Official
National
Vaingangavarta19
Local News
MK CREATION
Agriculture
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
No Comments