आयुर्वेदिक पंचकर्म मल्टीस्पेशलिटी क्लिनिक
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
F
12-01-2024
GADCHIROLI NEWS : जाती भिन्न; पण प्रेमप्रकरणातून विवाहाला दोन्ही कुटुंबांकडून होकार. 21 जानेवारीचा लग्नमुहूर्त ठरलेला; पण एका लग्नसमारंभासाठी नियोजित वधू- वराच्या घरी आली अन् तिची प्रसूती झाली. लग्नाआधी जन्मलेल्या बाळामुळे बदनामी होईल, या भीतीने जन्मदाती निष्ठुर झाली अन् तिने पोटच्या गोळ्याचा जीव घेऊन घरातच अडगळीला अर्भक ठेवून काढता पाय घेतला. चित्रपटातील थरारपट वाटावा, अशी ही अतिशय धक्कादायक घटना शहरातील गोकुलनगरात 11 जानेवारीला उघडकीस आली.
संशयित युवती मूळची चंद्रपूर जिल्ह्याच्या (Chandrapur District) सावली (Saoli Tahsil) तालुक्यातील असून तिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिचा नियोजित पतीही संशयाच्या घेऱ्यात आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, या युवतीसोबत गडचिरोलीच्या तरुणाचे प्रेमप्रकरण होते. जातीच्या भिंती ओलांडून त्यांनी या नात्याला लग्नबंधनात बांधण्याचा निर्णय घेतला. दोन्हीकडील कुटुंबांचा सुरुवातीला विरोध होता; पण होकार मिळविण्यात ते यशस्वी झाले.
21 जानेवारीला विवाह निश्चित झालेला होता. अशातच तीन दिवसांपूर्वी युवती गडचिरोलीत एका लग्नसमारंभासाठी आली व नियोजित पतीच्या घरी मुक्कामी थांबली.याच रात्री तिला प्रसववेदना सुरू झाल्या व तिने गोंडस मुलीला जन्म दिला.
मात्र,लग्नमुहूर्त जवळ आलेलाअसताना त्याआधीच आई झाल्याचे समोर आल्यावरबदनामी होईल, या भीतीने तिने अर्भकास निर्दयीपणे संपविले.त्यानंतर घरातच अडगळीत अर्भकाला कापडात गुंडाळून ठेवले.
दुसऱ्या दिवशी तिने लगबगीने घरातून काढता पाय घेतला. दोन दिवसांनी घरात दुर्गंधी सुटली. सुरुवातीला उंदीर मेला असेल म्हणून कुटुंबीयांनी दुर्लक्ष केले; पण उग्र वास घरभर पसरल्याने शोध घेतला तेव्हा 10 जानेवारीला रात्री साडेआठ वाजता हे अर्भक आढळले. त्यामुळे कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला.गडचिरोली पोलिसांनी धाव घेत अर्भक ताब्यात घेतले.
👉 अशीच माहिती जाणून घेण्यासाठी या Whatsapp ग्रुपला जॉईन करा जॉईन करण्यासाठी येथे क्लि करा 👈
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
National
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments