ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
F
11-12-2024
बेपत्ता अरुणा काकडेचा सापडला मृत्यूदेह.. गळा दाबून केले ठार
चिमूर : मागील 15 दिवसापासून चिमूर तालुक्यातील बेपत्ता असलेल्या व्यापारी महिलेचा मृतदेह आज नागपुरातील बेसा येथील निर्जन स्थळी आढळला, या प्रकरणी चंद्रपूर पोलिसांनी बडतर्फ पोलीस कर्मचारी नरेश डाहुले यांना अटक केली.
देवांश जनरल स्टोर्सच्या संचालिका 37 वर्षीय अरुणा अभय काकडे या 26 नोव्हेंबर रोजी नागपुरातील इतवारी मार्केट मध्ये दुकानातील सामान खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. इतवारी भंडारा मार्गावरील बाटा शोरूम समोरून त्या हरवल्या, अरुणा काकडे घरी न परतल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र विचारपूस केली मात्र त्यांचा काही थांगपत्ता लागला नाही. चिमूर पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली. पोलिस निरीक्षक संतोष बाकल यांचे मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक फुलेकर. पोलिस उपनिरीक्षक तथा तपास अधिकारी अजय चौधरी व पोलिसांनी शोध मोहीम राबवली मात्र अरुणा काकडे यांचा पत्ता काही लागला नव्हता. अखेर चिमूर पोलिसांना सिम रिचार्ज वरून आरोपींना शोधण्यात सफलता मिळाली काकडे या चिमूर व्यापारी संघटनेच्या सदस्या असल्याने जिल्हा व्यापारी मंडळाने पोलीस अधीक्षकांना याबाबत निवेदन दिले.
पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाचा तपास चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार प्रभावती एकुरके यांच्याकडे सोपविला. शहर पोलिसांनी पथके तयार करीत तपासाच्या विविध बाजू तपासल्या, चौकशी दरम्यान पोलिसांना अखेर आरोपी गवसला आरोपी हा बडतर्फ पोलीस कर्मचारी नरेश डाहूले होता. पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली, त्याने सांगितले की 26 नोव्हेंबर रोजी अरुणा काकडे मला भेटली होती, अरुणा ही माझी वर्गमैत्रिण होती, त्यामुळे आमची चांगली ओळख होती. आम्ही दिवसभर सोबत होतो, त्यानंतर रेशीमबाग मैदानावर आमच्या दोघात वाद झाला, मी यावेळी रागाच्या भरात अरुणा चा गळा आवळून खून केला व त्यानंतर आपल्या चारचाकी वाहनात अरुणा चा मृतदेह टाकत बेसा येथील निर्जन स्थळी असलेल्या घरातील शौचालयाच्या टाक्यात तिचा मृतदेह टाकला व तिथून निघून गेलो.
वर्ष 2023 मध्ये नरेश डाहूले हा स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत होता, त्यावेळी शहरात अनेक घरफोडीच्या घटना घडल्या, त्या प्रकरणात मुख्य आरोपी नरेश डाहूले ला अटक करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस विभागाने नरेश डाहूले ला बडतर्फ केले. चिमूर पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Politics
विदर्भ फायर न्यूज
International
विदर्भ फायर न्यूज
Food
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments