अमित मेडिकल स्टोर & निर्मल जल, गडचिरोली
निर्मल जल शुद्धतात का वादा
F
05-07-2024
Agriculture: रासायनिक खतांचा जास्त आणि सातत्याने वापर केल्यामुळे जमिनीचा पोत बिघडतो. परिणामी जमिनीची उत्पादकता कमी होते. खतांचा वापर अधिक करावयाचा झाल्यास पिकांना पाणीही मोठ्या प्रमाणावर द्यावे लागते. साहजीकच त्यामुळे जमिनीतील क्षारांचे प्रमाण वाढते. त्यामुळे रासायनिक खतांचा अतिवापर करणे धोक्याचा असल्याचे बोलल्या जात आहे.
आज मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेला रासायनिक खतांचा वापर आणि घटत चाललेली अन्न धान्याची गुणवत्ता, माणसाच्या आरोग्यावर होणारे घातक परिणाम, निसर्गावर होणारे वाईट परिणाम या सर्व गोष्टींकडे लक्ष दिले, तर रासायनिक शेती ही किती धोकादायक आहे हे आपल्याला समजुन येते.
हे देखील वाचा : Types Of Organic Farming: शेतकऱ्यांनो, कीटकनाशक फवारणी या पिकांवर नको ?
रासायनिक खतांचा वाढता वापर घातक आहे. शेतीत पिकणारा भाजीपालाच आज न मोठ्या प्रमाणात 'बाजारात विक्रीसाठी येत असतो. परंतु रासायनिक खतांचा वापर केलेल्या या पिकांचा मानवी आरोग्यावर परिणाम होतांना आज दिसून येत आहे.
बाजारात विकण्यासाठी येणाऱ्या पालेभाज्यांवर रासायनिक खतांचा सर्रास वापर होतो. नागरिकही बाजारातून या भाजीपाल्याची खरेदी करतात. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असतो. या पिकांमुळे नागरिकांमध्ये पोलिओ कर्करोग आदी विविध आजारांना सामोरे जावे लागते असे तज्ज्ञ सांगतात, रासायनिक खतांप्रमाणे कीटकनाशकांच्या वापराचेदेखील अनिष्ट परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे.
कीटकांचा नाश करणारी कीटकनाशके अर्थातच विषारी असतात. त्यामुळे ज्याप्रमाणे उपद्रवकारक कीटक मरतात त्याचप्रमाणे काही उपयुक्त जीवजंतूही बळी पडतात. खर तर निसर्गाने स्वतःच खूप काही गोष्टीचा समतोल साधण्याची व्यवस्था केलेली आहे. निसर्गाने ज्याप्रमाणे पिलांना उपद्रवकारक कीटक असतात, त्याचप्रमाणे या कीटकांवर उपजीविका करणारेही काही कीटक पक्षी प्राणी असतात. रासायनिक खतांच्या वापरातून जमिनीवर दुष्परिणाम होता. या खतांच्या पिकांच्या दर्जावर व पर्यायाने आपल्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम होतांना दिसून येतात. त्यामुळे सावध राहण्याची गरज "व्यक्त होत आहे.
निर्मल जल शुद्धतात का वादा
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Education
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments