ProfileImage
75

Post

4

Followers

1

Following

PostImage

Ramdas Thuse

April 1, 2024

PostImage

डॉ.हरेश गजभिये आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानीत


चिमूर:-

             गांधी सेवा शिक्षण समिती चिमूर द्वारा संचालीत, राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय, चिमूर येथील वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. हरेश गजभिये यांना जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ नागपूर द्वारे 10 व्या वर्धापन दिना निमित्य पुरस्कार वितरण समारंभात डॉ.बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देवून सन्मानीत केले. याबद्दल गांधी सेवा शिक्षण समितीचे सन्माननीय अध्यक्ष डॉ. दिपक यावले,सचिव मा.विनायकरावजी कापसे,संचालक तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अश्विन चंदेल,उपप्राचार्य डॉ. प्रफुल्ल बन्सोड,मराठी विभाग प्रमुख, डॉ. कार्तीक पाटील व महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.


PostImage

Ramdas Thuse

March 31, 2024

PostImage

संगणक तंत्रज्ञान व सायबर गुन्हे तसेच पॉक्सो कायदा या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन


 

चिमूर:-

            इन्स्पायर कम्प्युटर एज्युकेशन ग्रुप व आयआयटीई चा संयुक्तपणे झालेला स्टुडन्ट मीट कार्यक्रम इंदिरा गांधी सभागृह, चंद्रपूर येथे पार पडला. यावेळी इन्स्पायर कम्प्युटर एज्युकेशन ग्रुपचे चंद्रपूर,वर्धा व यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाखा मधले सुमारे 800 विद्यार्थी तसेच पालक वर्ग उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना संगणक तंत्रज्ञानासोबतच सायबर विश्वातील गुन्हे आणि पॉक्सो कायदा या विषयांवर मार्गदर्शन तसेच विद्यार्थ्यांचा सत्कार व सांस्कृतिक कार्यक्रमांचे यावेळी आयोजन करण्यात आले होते.

             कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सुमित जोशी, पोलीस उपनिरीक्षक, कम्युनिटी सेल चे रोशन इरपाचे, सायबर चे मुजावर आली, संतोष पानघाटे तसेच आयआयटीई चे संस्थापक मोहसीन खान आदींनी विद्यार्थ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन केले.

यावेळी खोटी प्रोफाइल तयार करून अश्लीश संदेश-चित्रे पाठवणे, अकाउंट हॅक करणे, चॅटिंग करताना फसवणे, लग्नाच्या जाळ्यात अडकवणे,लैंगिक चाळे करणे तसेच फसवणूक करणे यांसारख्या गंभीर मुद्द्यांवर उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते अनुभव प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

यावेळी इन्स्पायर कम्प्युटर एज्युकेशन ग्रुपचे करुणाप्रिया वासनिक, अक्षय पानघाटे, कार्तिक टोंगे, राकेश पाल, मयूर गोठे, प्रीतम जांभुळे, राहुल रघाटाटे इत्यादी उपस्थित होते.


PostImage

Ramdas Thuse

March 22, 2024

PostImage

जिल्हाध्यक्ष प्रशांत डवले तथा राज्य प्रतिनिधी यांच्या प्रयत्नांना यश


संगणक परीचालकांच्या आंदोलनाचे फलित

ग्रामपंचायत संगणक परिचालकांच्या मानधनात ३००० रुपयांची वाढ_


 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषदेत घोषणा

आचार संहितेपूर्वी संगणक परीचालकांना दिलासा

चिमूर :-

          लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूक लागण्याच्या अगोदर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित कॅबिनेट मंत्रांच्या बैठकीत लोकाभिमुख निर्णय घेण्यात आले. यामध्ये मागील १२ वर्षापासून संगणक परीचालकांच्या विविध मागण्यांसाठीचे निर्णय प्रलंबित निर्णयाला दिलासा देत ग्रामपंचायत संगणक परीचालकांच्या मानधनात ३०००/- रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाची माहिती स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेट बैठक संपल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यामुळे संगणक परीचालकांना दिलासा मिळणार आहे.

गेल्या १२ वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये संगणक परिचालक  कार्यरत आहेत. ग्रामपंचायतची सर्व ऑनलाईन तथा ऑफलाईन कामकाज याच संगणक परिचालकांमार्फत केली जातात. गावातील नागरिकांचा व शासनाचा तसेच प्रशासनाचा दुवा म्हणून महत्वाची भूमिका संगणक परिचालक बजावत असतात.
शासनाचे सर्व उपक्रम व योजनांची सर्व कामे सुद्धा संगणक परिचालक यांच्याकडून बजावली जातात.
महाराष्ट्र शासनाला सतत ३ वर्ष पारितोषिक मिळवून देऊन डिजिटल महाराष्ट्र बनविण्यासाठी संगणक परीचालकांचा सिहांचा वाटा आहे.
मात्र एवढे कामे करून सुद्धा     आणि बऱ्याच कामाचा व्याप व भडीमार असतांना देखील महागाईच्या काळामध्ये फक्त ६९३०/- रुपयांच्या तुटपुंज्या मानधनात काम करावं लागते. तसेच जे मानधन मिळते त्यात अनेक प्रकारची कपात केली जाऊन चार-चार, सहा-सहा महिने मानधन थकीत असतो. यामुळे अनेकदा ग्रामपंचायत संगणक परिचालक यांचे कुटुंबावर उपासमारीची वेळ सुद्धा आलेली आहे.
महाराष्ट्र राज्यातील व देशातील बेरोजगारीमुळे आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्रिपक्षीय करारामध्ये संगणक परिचालक यांना गुंडाळून वेठबिगारी पद्धतीने काम करून घेऊन त्रास दिला जातो.
त्यामुळे या १३ वर्षात होत असलेल्या अमानुष अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व न्याय मिळवण्यासाठी ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटना यांचेकडून अनेक आंदोलने उपोषणे व मोर्चे करून प्रत्त्येक अधिवेशनात न्याय मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र न्याय काही मिळेना.
यावर्षीच्या नागपूर येथील अधिवेशनात ग्रामपंचायत संगणक परिचालक यांचा भव्य-दिव्य मोर्चा अधिवेशनावर धडकला होता. आपल्या मागण्या पूर्ण करण्याचे हेतूने सतत ८ दिवस कडाक्याच्या थंडीमध्ये रोडवर झोपून आंदोलन टिकवून ठेवले. यामध्ये प्रशांत डवले जिल्हाध्यक्ष चंद्रपूर तथा राज्य प्रतिनिधी यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली असून संघटनेचे सूत्र हातात घेऊन नेतृत्व केले.
नागपूर हिवाळी अधिवेशन काळात अनेक बैठका शासनासोबत लागल्या मात्र पुन्हा आश्वासन घेवूनच आंदोलनाची सांगता झाली.
महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी जीवाची पर्वा न करता पाण्याचा थेंब व अन्नाचा कनही न घेता दिनांक २४ जानेवारी ते २८ जानेवारी २०२४ पर्यंत मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे नागपूर नगरीत आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली होती.
त्या आमरण उपोषणाची दखल घेऊन मा. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ग्रामविकासमंत्री मा.गिरीशजी महाजन साहेब यांना सूचना केली कीं लवकरात-लवकर ग्रामपंचायत संगणक परीचालकांच्या मागणीची पूर्तता करून दिलासा मिळेल असा निर्णय घ्यावा. त्यासंबंधीचे लेखी पत्र मा.मुख्यमंत्री महोदय व ग्रामविकासमंत्री महोदय यांना सादर केले. 
आणि अखेर १६ मार्च २०२४ ला माननीय मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब यांच्याकडून मुंबई पत्रकार परिषदेत संगणक परीचालकांच्या मानधनात ३ हजार रुपयांनी वाढ झाली असून आता ग्रामपंचायत संगणक परीचालकांचे मानधन एकूण १० हजार प्रमाणे करण्याची घोषणा करण्यात आली.
कॅबिनेटने घेतलेल्या निर्णयाची घोषणा करतांना मा. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तसेच मा.अजित पवार उपमुख्यमंत्री यांची पण उपस्थिती होती.
महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या संगणक परीचालकांच्या मानधन वाढीच्या निर्णयाचे दिलासा मिळाला असून संगणक परीचालकांमध्ये सध्या खेळीमेळीचे व आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे.
मात्र संगणक परीचालकांना सुधारित आकृतिबंधनुसार ग्रामपंचायत कर्मचारी व किमान वेतन लागू व्हावं ही प्रमुख मागणी अजूनही शासनाकडे प्रलंबितच असून विधानसभा निवडणूकीच्या सदर प्रमुख मागणी पूर्ण होईल अशी आशा महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत संगणक परीचालकांच्या मनात निर्माण झालेली आहे. 
ग्रामपंचायत संगणक परीचालकांच्या विश्वासाला तळा जाणार नाही असा विश्वास शिंदे-फडणवीस-पवार सरकार यांच्यावर आहे असे मतं संगणक परीचालकांकडून ऐकावयास मिळत आहे.
ग्रामपंचायत संगणक परीचालकांच्या मानधनात ३ हजार रुपयांच्या वाढीच्या निर्णयात सर्व महाराष्ट्रातील संगणक परीचालकांचे समान योगदान असून सर्व जिल्ह्यातील संघटना प्रतिनिधी यांचे मोलाचे योगदान आहे.
नागपूर येथील २०२४ च्या हिवाळी अधिवेशनात प्रशांत डवले जिल्हाध्यक्ष चंद्रपूर तथा राज्य प्रतिनिधी यांची मोलाची भूमिका व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वेगवेगळ्या आंदोलनात कौतुकास्पद कामगिरी बघता संघटनेकडून त्यांचे भरभरून आभार व्यक्त केल्या जात आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेकडून मा. मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व सर्व आमदार तसेच मंत्री महोदयांचे मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त करण्यात येत आहेत.


PostImage

Ramdas Thuse

March 20, 2024

PostImage

मध्यरात्री वाघा ने बैलजोडी केली ठार,


शेतकऱ्यावर संकट.

चिचाळा कुणबी येथील घटना.

चिमूर:-

         दिनांक १९ मार्च च्या रात्री पाऊस सुरु असल्याने चिचाळा कुणबी येथील गजानन संपत चौधरी यांनी आपली बैल जोडी शेतातील कोठ्यात बांधून ठेवून घरी परत आले.

मात्र मध्य रात्री नंतर वाघा ने कोठ्यात प्रवेश करून बैल जोडी ठार केल्याची घटना सकाळी  निदर्शनास आली. शेतकऱ्यांनी सदर घटनेची माहिती भाजप तालुका महामंत्री वर्षां शेंडे यांना देऊन वन विभागाने आर्थिक मदत देण्याची मागणी केली वर्षा शेंडे यांनी केली आहे, तरी या घटनेमुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे तरी वन विभागाने वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकाकडून केली जात आहे


PostImage

Ramdas Thuse

March 19, 2024

PostImage

संविधान संवर्धनात महिलांची भुमीका यावर व्याख्यान संपन्न


चिमूर;-

         आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमुर अंतर्गत महिला तक्रार निवारण समिती च्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन संविधान संवर्धनात महिलाची भुमीका यावर व्याख्यान आयोजित केले. अध्यक्ष म्हणुन डॉ. शुभांगी लुंगे प्रमुख वक्ता महेंद्रकुमार मेश्राम प्रभारी प्रार्चाय ऑरेंज सिटी महाविद्यालय नागपुर, ए.पी.आय. दिप्ती मरकाम पोलीस स्टेशन चिमुर समिती प्रमुख डॉ. विना काकडे आदि. मान्यवरांच्या उपस्थितीत व्याख्यान घेण्यात आले.

 

डॉ. महेंद्रकुमार मेश्राम बोलतांना म्हणाले की, संविधानाच्या निमीत्याने जगण्याचे तत्वज्ञान बाबासाहेबांनी शोधले महिलांना विद्यार्थ्यांना सविधान काय आहे ते पाहिले पाहिजे सविधानाचे पुस्तक काढुन प्रथम पान उद्देशिका पहा एकदा वाचा संविधान विषय खुप मोठा आहे. सविधानामुळे अघोरी कायदे नष्ट करून जमिनीत गाळले सविधानापुर्वी स्त्रियांना माणुस म्हणुन स्विकारत नव्हते बोलण्याचा, घराबाहेर जाण्याचा, अधिकार नव्हता सामाजिक सौरचनेवर पुरूषांचा ताबा होता. घटनेच्या निर्मातीनंतर स्त्रियांचा नविन जन्म झाला. संविधान हे जिवंत कामाचे दस्ताऐवज आहे. त्याचा मृत्य कधीच होवु शकत नाही संविधानात महिलांविषयी अनेक कायदे दिले आहे. त्यामुळे स्त्रियांना उणेपना येईल असे वागु नये असे अनेक उदाहरणे देवुन संविधानाविषयी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. शुभांगी लुंगे यांनी संविधानाने हिंदु कोड बिलामुळे महिलांना कायद्याचे पाठबळ मिळवुन दिले संविधानाच्या ७५ व्या वर्षानिमीत्त सदर कार्यक्रम आयोजित केला असुन कार्यक्रमास प्राचार्य डॉ. शुभांगी लुंगे, डॉ. महेंद्रकुमार मेश्राम, ए.पी.आय. दिप्ती मरकाम, डॉ. विना काकडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले याप्रसंगी आभार डॉ. विना काकडे यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रा. शिल्पा गणविर सदर कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी बहुसंखेने उपस्थित होते.


PostImage

Ramdas Thuse

March 19, 2024

PostImage

विशेष सहाय्य योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांनी आपले कागदपत्रके ग्रामपंचायत कार्यालयात जमा करावे  


तहसील कार्यालयद्वारे आव्हान

चिमूर:-

          विशेष सहाय्य योजनेअंतर्गत राज्य शासन पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी.बी.टी. पोर्टलद्वारे करण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला असुन तसे निर्देश प्राप्त झाले आहेत. या योजनेत समाविष्ट सर्व लाभार्थ्यांचे बँक खाते आधार लिंक करणे आवश्यक झाले आहे. याकरिता लाभार्थ्यांनी आपले 1) आधार कार्ड २) बँक पासबुक ३) राशन कार्ड यांचे झेराक्स व त्यावर मोबाईल नंबर टाकून संबधित ग्रामपंचायत सरपंच /तलाठी/कोतवाल यांचे कार्यालयात जमा करावेअसे आवाहन तहसिल कार्यालयाद्वारे करण्यात आले आहे.


PostImage

Ramdas Thuse

March 15, 2024

PostImage

जागतिक ग्राहक हक्क दिन संपन्न


चिमूर:-

              गांधी सेवा शिक्षण समिती चिमूर व्दारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय, चिमूर येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अश्विन चंदेल सर यांच्या मार्गदर्शनात कॉमर्स असोसिएशनच्या वतीने जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रफुल बन्सोड हे होते. या कार्यक्रमात वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.हरेश गजभिये,मराठी विभाग प्रमुख डॉ.कार्तिक पाटील,डॉ.रहांगडाले यांनी मार्गदर्शन केले. मा. प्राचार्य यांनी ग्राहकांनी जागरूक राहून वस्तूंची खरेदी करावी व आपली फसवणुक होऊ नये याविषयी काळजी घ्यावी तसेच फसवणुक झाल्यास ग्राहकाने आपल्या हक्काकरीता सजग असावे असे आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना सांगीतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. लक्ष्मण कामडी तसेच संचालन प्रा.निखिल पिसे व आभार प्रदर्शन कु.गौरी कुळमेथे हीने केले. या कार्यक्रमात वाणिज्य शाखेच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.


PostImage

Ramdas Thuse

March 15, 2024

PostImage

योजनेच्या लाभासाठी आधार लिंक करा- चिमूर तहसिल कार्यालयद्वारे आव्हान .


चिमूर:-

          विशेष सहाय्य योजनेअंतर्गत राज्य शासन पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी.बी.टी. पोर्टलद्वारे करण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला असुन तसे निर्देश प्राप्त झाले आहेत. या योजनेत समाविष्ट सर्व लाभार्थ्यांचे बँक खाते आधार लिंक करणे आवश्यक झाले आहे. याकरिता लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड, बँक खाते, राशन कार्ड व मोबाईल नंबर 25 मार्च 2024 पर्यंत तहसिल कार्यालय, चिमुर येथील संजय गांधी निराधार शाखेत जमा करावे, असे आवाहन तहसिल कार्यालयाद्वारे करण्यात आले आहे.

ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड, बँक खाते, राशन कार्ड व मोबाईल नंबर तहसिल कार्यालयाच्या संजय गांधी निराधार विभागात प्राप्त होणार नाही, त्यांचे अनुदान त्यांच्या बँक खात्यावर जमा होणार नाही. त्यामुळे भविष्यातील गैरसोय टाळण्यासाठी वरील अत्यावश्यक माहीती संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या विभागात सादर करावी.
दिव्यांग, अशिक्षित, निराधार असलेल्या लाभार्थ्यांपर्यत ही माहिती पोहचु शकणार नसल्याने, जागरुक जनता, सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, उमेद कर्मचारी जे जनतेच्या सदैव संपर्कात असतात, त्यांनी आपल्या आसपासच्या लाभार्थ्यांना हि माहीती द्यावी असे आव्हान चिमूर तहसील कार्यालयाद्वारे  करण्यात आले आहे


PostImage

Ramdas Thuse

March 15, 2024

PostImage

जीवनात यशस्वी होण्यासाठी संघर्ष करावा लागेल - पोलीस निरीक्षक संतोष बाकल,       


         

चिमूर:-

         गांधी सेवा शिक्षण समिती द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय येथे राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या वतीने निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी चिमूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.संतोष बाकल हे उपस्थित होते त्यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्याना सांगितले की,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यानी आपल्या मनातील न्युनगंड,भिती काढून टाकली पाहीजे. आत्मविश्वास अंगी बाणविला पाहिजे. आत्माविश्वासाच्या बळावर स्पर्धा परिक्षेत यशस्वी होण्यासाठी जीवनात संघर्ष करावा लागेल. कार्यकमाच्या  अध्यक्षस्थानी गांधी सेवा शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. दीपक यावले होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, विद्यार्थ्यांनी चुकामधून शिकले पाहिजे. राष्ट्रीय छात्र सेना(NCC) च्या विद्यार्थ्यांनी देशाप्रती त्याग, समर्पण ची भावना अंगिकारली पाहिजे. त्यांनी1972 च्या भारत- पाकिस्थान युद्धातील सरसेनापती सॅम माणेकशॉ यांच्या कामगिरी वर प्रकाश टाकाला. प्राचार्य डॉ अश्विन चंदेल यांनी आपल्या मार्गदर्शनात राष्ट्रीय छात्र सेनेचा  गौरवपूर्ण इतिहास सांगितला. तसेच कार्यक्रमाचे प्रयोजन विशद केले. त्यांनी राष्ट्रीय छात्र सेना विद्यार्थ्यांना भावी यशासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी गांधी सेवा शिक्षण समिती चे सचिव विनायकराव कापसे, सदस्य कुसुमराव कडवे उपस्थित होते. प्रास्ताविक लेप्टनंट , प्रोफेसर डॉ. प्रफुल्ल बन्सोड यांनी केले. त्यांनी महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्याचा यशाचा चढता आलेख मांडला. महाविद्यालयातील एन. एन. सी चे छात्र लष्करात  विविध पदावर जाऊन देशाची सेवा करीत आहेत हा महाविद्यालयाचा गौरव आहे असे प्रतिपादन केले. या प्रसंगी राष्ट्रीय छात्र सेना विद्यार्थ्यानी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन कु नंदीनी पोपटे तर आभार कु सामिक्षा बावने हिने मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.


PostImage

Ramdas Thuse

March 15, 2024

PostImage

डॉ.बाबासाहेब आंबेडकराचे हिंदूकोडबिल भारतिय महिलांचा आत्मसन्मान होय -समतादूत प्रज्ञा राजुरवाडे..


चिमूर :-

      8 मार्च हा जागतिक महिला दिन महीलांचा सन्मान दिवस.जगातील महिलांनी आपल्या न्याय अधिकारासाठी मतदानाचा अधिकार,कामाचे तास कमी असावेत यासाठी आंदोलन केलीत.पण भारतात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी हिन्दु कोडबिल या कायद्याच्या माध्यमातुन समान मताधिकार दिला.

       भारतीय सविधानात असलेल्या हिन्दुकोडबिल कायद्याच्या उपयोग महिलानी आपल्या जीवनात करुन घेतला आहे व प्रत्येक क्षेत्रात आपली प्रगती केली.

       स्त्री आत्मनिर्भर,सक्षम आत्मविश्वासपूर्ण ,वैचरिक मुक्त आहे.हा जिवनजगण्याचा आत्मसन्मान डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या हिन्दु कोड बिलानी भारतिय महिलांना मिळाला असल्याचे प्रतीपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेच्या समतादूत प्रज्ञा राजुरवाडे यांनी चिमुर महिला कांग्रेस कमिटीच्या मेळाव्या प्रसंगी केले.

      जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा व नारी न्याय संमेलन,महिला राजकिय नेतृत्व सक्षमीकरण आयोजित कार्यक्रमात प्रज्ञा राजुरवाडे ह्या प्रमुख अतिथी होत्या.

      या कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्र प्रदेश कांग्रेश कमिटीचे महासचिव डॉ.अविनाशभाउऊ वारजुरकर होते.कर्यक्रमाच्या अध्यक्षा चंद्रपुर जिल्हा महिला कांग्रेस कमिटीच्या अध्यक्षा नम्रता ठेमस्कर,प्रमुख मार्गदर्शक प्रज्ञा राजुरवाडे,आधिवक्ता सिमा साखरकर,अनिताताई वारजुरकर,माजी जिल्हाध्यक्ष लताताई अगडे,माजी सभापती शोभाताई पिसे,सिमाताई बुटके,भावनाताई पिसे,लताताई पिसे,आदी उपस्थित होते.

       पुढे बोलताना समतादूत प्रज्ञा राजुरवाडे म्हणाल्या की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महीलाच्या न्यायासाठी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

       महिलांना विचार मांडण्याचे,बोलण्याचे,लिहण्याचे स्वंत्र्य दिले आहे.आज राजकीय क्षेत्रात आपण मोठ्या प्रमाणात आहात.राजकिय सक्षम नेतृत्व महिलानी कसे तयार करायला हवे.कुठल्याही पक्षातील महिला अशोत, राजकारणात आपन भारतीय संविधानाचे मुल्य अधिकार जनतेला न्याय मिळवून देन्यासाठी येतो की सत्ता उपभोगासाठी येतो हा चिंतनीय प्रश्न होत चालला आहे.

       त्यामुळे महिला सक्षम करण्यासाठी,समाज सुधारण्यासाठी राजकिय भूमिका महत्वाची आहे.तेव्हा राजकीय नेतृत्व करत असताना सर्व महिलानी आपले संघटन कौशल्य वाढवावे,पक्षाची बांधनी करत असताना पदाची अपेक्षा करु नये, तळागाळातिल महिला मजुर यांचे प्रश्न-समस्या माहिती करुन भारतीय सविधानाचा प्रचार करावा.

      महीला महिलाची विरोधक न होता महिलावर होणाऱ्या अत्याचारावर ,अन्यायावर बोलावे,राजकिय पक्षामुळे किवा आरक्षणामुळे आपन निवडुन येतो,पण फार कमी अशा रजिकय नेतृत्ववाण महिला समाजाच्या समस्यावर बोलताना आढळतात ही देशातील सक्षम महीलासाठी शोकांनतिका आहे. अश्यामुळे भारतिय सविधानाला आपण न्याय नाही देवू शकत, अपरिपक्व नेतृत्व ही देशाची व समाजाची भुल करणारे नसावे,महिला धोरणांमध्ये महिलावर होनारे अत्याचार, कुपोषण,शिक्षण,कौटुंबिक हिंसाचार यासाठी आधार देवून आपली भूमिकापार पाडायला हवी असे सविस्तर मार्गदर्शन समतादूत प्रज्ञा राजुरवाडे यानी यावेळी केले.

     या कार्यक्रमाचे संचालन भावनाताई बावंनकर,प्रास्ताविक माधुरी रेवतकर,आभार गितांजली थुटे यानी केले.यावेळी चिमुर तालुक्यातिल सर्व जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य,सरपंच,उपसरपच,ग्रामपंचायत सदस्य आदी सर्व महिला उपस्थित होत्या.


PostImage

Ramdas Thuse

March 14, 2024

PostImage

महाराष्ट्रातील दुसरे उच्च शिक्षणासाठीचे बांधिलकी शिबीर बंदर येथे पार पडले


चिमूर :-

            नेचर फाउंडेशन नागपूर च्या वतीने महाराष्ट्रातीलव दुसरे बांधिलकी ८मार्च ते १० मार्च २०२४ ला तीन दिवसीय शिबिर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंदर ता.चिमूर जि.चंद्रपूर येथे कोल्हापूर ते चिमूर पासूनच्या शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थित पार पडले.
बांधिलकी एक सामाजिक कर्तव्य या भूमिकेतून दरवर्षी शिबिराचे देशांतील  स्वातंत्रप्राप्तीनंतर सुद्धा उच्च शिक्षणातील ग्रामीण भागातील उच्च शिक्षण बद्दल मागासलेपण यावर प्रकाश व मार्गदर्शन करण्यासाठी विविध क्षेत्रातील मार्गदर्शक

एकलव्य इंडिया फाउंडेशन चे समन्वयक मा.कुमार सर (उपजिल्हाधिकारी),निखील मोटघरे (एकलव्य फाउंडेशन समन्वयक) युवराज जीवतोडे (पालक) श्रीकांत एकुडे(चेवनिंग शिष्यवृत्ती लंडन, मुलाखत)सुरज चौधरी(पंतप्रधान युवा संसद महाराष्ट्र सदस्य)शुभम पसारकर (आधार फाउंडेशन) निलेश नन्नावरे (नेचर फाउंडेशन) या सर्वानी लोकशाही, शैक्षणिक वास्तव स्थिति, मनोरुग्ण, आधुनिक कृषी पध्दती यावर मार्गदर्शन केले. सोबत लोकशाही युवा संसद यात आजचा तरुण झोपलेला आहे की नाही यावर वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली. दिवसाची सुरुवात आनापान करून करण्यात येत होती.
८ मार्च रोजी जि.प.प्राथ.शाळा व नेचर फाउंडेशन च्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना पायदळ जंगल सफारी करण्यात आली.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या गावात नक्कि बदल करू असे वचन घेतले.या शिबिराचे उद्घाटन गावच्या सरपंच सौ.मंजूषा नन्नावरे यांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख उपस्थिती  आदित्य वासनिक (उपसरपंच) मणी रॉय,आशिष जीवतोडे,अमोल कावरे(नेचर फाउंडेशन)उज्वला कामडी (मुख्याध्यापिका)हे सर्व  उपस्थित होते.या नुसार तीन दिवशीय शिबीर पार पडले.

"या बांधिलकी सारख्या शिबीरातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये लोकल टू ग्लोबल आणि ग्लोबल टू लोकल या विचारांची पेरणी निर्माण होऊन भविष्यात ग्रामीण भागातील विद्यार्थी शासकीय धोरण निर्मीती मध्ये अग्रेसर होईल असा विश्वास आहे."

-निलेश नन्नावरे (संस्थापक सचिव नेचर फाउंडेशन)


PostImage

Ramdas Thuse

March 13, 2024

PostImage

चिमूर तालुक्यातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान     


चिमूर:-

         गांधी सेवा शिक्षण समिती द्वारा संचालित स्थानिक राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय येथे महिला अध्ययन विस्तार सेवा केंद्रांद्वारे जागतिक महिला दिनानिमित्त चिमूर तालुक्यातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यातआला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष गांधी सेवा शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ दिपक यावले हे अध्यक्षस्थानी होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात विविध क्षेत्रातील महिलांचे सक्षमीकरण अधोरेखीत केले.सचिव प्रा विनायकराव कापसे कोषाध्यक्ष मारोतराव भोयर उपस्थित होते. या वेळी  प्राचार्य डॉ आश्विन चंदेल यांनी या कार्यक्रमाची संकल्पना मांडली. तसेच चिमूर तालुक्यातील महिलांचा गौरव केला. प्रसंगी दंतचिकित्सक डॉ. शोभा चाफले, डॉ. लता मेश्राम वैष्णवी सौ माधवी मधुसुदन नाईक, यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सामाजिक कार्यकर्त्या सौं.विद्याताई कापसे डॉ लीना झाडे मंचावर उपस्थित होत्या.  चिमूर  तालुक्यातील सामाजिक वैद्यकीय व अन्य क्षेत्रात कर्तृत्वाची भरारी घेणाऱ्या सौ सखुबाई खडसे, सौ लताबाई बेसरे, सौ माधुरी हेमके, सौ गीताबाई बनकर, सौ एकादशी मोहीनकर, सौ कला गेडाम सौ आशा जुमनाके ,सौ.अनिता टेंभूरकर यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक उप - प्राचार्य लेप्टनंट डॉ प्रफुल बनसोड यांनी केले.सूत्रसंचालन प्रा संतोषी दिघोरी तर आभार महिला अध्ययन विस्तार सेवा केंद्राचे डॉ. लक्ष्मण कामडी यांनी केले. या कार्यक्रमास  प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिला.


PostImage

Ramdas Thuse

Feb. 29, 2024

PostImage

सामाजिक कार्यकर्ते डॉ.लोकेश वासनिक यांचा भाजपात प्रवेश


आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश 

चिमूर:-

           दि.२८ फेब्रुवारी आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत चिमूर येथील निवासस्थानी तालुक्यातील सावरी (बि.) येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ज्ञानसागर बहुद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. लोकेशभाऊ वासनिक यांनी आमदार बंटीभाऊंच्या कार्यक्षम, कणखर, कार्यकुशल नेतृत्वावर व त्यांच्या विकासकार्यावर, कार्यकर्तृत्वावर तसेच विकसनशील ध्येयधोरणांवर प्रभावित होऊन भाजपात पक्षप्रवेश केला. यावेळी आमदार बंटीभाऊंनी त्यांच्या गळ्यात भाजपाचा दुपट्टा टाकून पक्षात सहर्ष स्वागत केले व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

या पक्षप्रवेशाप्रसंगी प्रामुख्याने भाजपा तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजपा ज्येष्ठ नेते भिमरावजी ठावरी, भाजपा ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ वाकडे, भाजपा ज्येष्ठ नेते घनश्यामभाऊ डुकरे, भाजपा ओबीसी आघाडी तालुकाध्यक्ष एकनाथभाऊ थुटे, भाजपा नेते जितेंद्रभाऊ मोटघरे, चिमूर कृ. उ. बा. समिती संचालक दिनकरराव सिनगारे, भाजपा नेते शैलेंद्र पाटील, योगेशभाऊ कराळे, सरपंच ग्रा. पं. कन्हाळगाव विजेंद्र घरत व अन्य भाजपा नेते, पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

Ramdas Thuse

Feb. 29, 2024

PostImage

राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूर येथे मराठी भाषा गौरव दीन संपन्न   


 

चिमूर:-

 स्थानिक राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय येथे वि वा शिरवाडकर कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून कला वाणिज्य महाविद्यालय भिसी येथील प्रा डाँ सुनंदा चरडे ह्या उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात कुसुमाग्रज वि वा शिरवाडकर यांचे मराठी साहित्य विश्वाला दिलेल्या योगदानाविषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठी विभागप्रमुख प्रा डॉ कार्तिक पाटील यांनी मराठी भाषेचे महत्त्व तथा मराठी भाषेला अभिजात दर्जा शासनाने दिला पाहीजे असे प्रतिपादन केले.प्रास्ताविक उपप्राचार्य लेप्टनंट डॉ. प्रफुल्ल बन्सोड यांनी सर्व मराठी साहित्य विश्वाचा आढावा घेतला. सर्व मराठी विषयाच्या धारा समजून सांगितल्या.

या कार्यक्रमास श्री.चरडे प्रा.ड्रॉ.हरेश गजभिये,प्रा.पीतांबर पिसे, ड्रॉ.प्रफुल राजूरवाडे, ड्रॉ.कत्रोजवर ड्रॉ.रहांगडाले ड्रॉ.कामडी, प्रा.आशुतोष पोपते तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे उप प्राचार्य प्रा राकेश कुमरे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. स्नेहा निवटे तर आभार कु.हिमानी बावनकर हिने केले.या कार्यक्रमाला विद्यार्थ्याचा उंदड प्रतिसाद होता.


PostImage

Ramdas Thuse

Feb. 19, 2024

PostImage

मालेवाडा येथील जेतवन बुद्ध विहारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन


 

चिमूर:-

        तालुक्यातील जेतवन बुद्ध विहार, मालेवाडा येथे आज दि.19 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी ठीक 9.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आले . छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला सत्यफुलाबाई चव्हाण व शारदाबाई गजभिये यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून अभिवादन केले.याप्रसंगी योगेश मेश्राम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.१६व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव ‘जाणते राजे’ होते की त्यांच्या राज्यातील प्रजा सुखी होती, आनंदी होती. शेती हे केवळ उपजीविकेचे साधन नसून, रयतेच्या उत्पन्नाचे स्रोत आहे. “शेती पिकली तर रयत सुखी, रयत सुखी तर राजा सुखी’ हे सूत्र महाराजांना समजले होते. त्यामुळे महाराजांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन रयतेला मजबुती देणारा होता. म्हणूनच शिवाजी महाराज ‘शेतकरी हितकर्ते राजे’ होते.छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये शौर्य, धैर्य, सकारात्मकता, मुत्सद्देगिरी, युद्धनीती, दूरदृष्टी, व्यावहारिकता आणि चातुर्य असे अनेक गुण होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात सर्व धर्माचे, पंथांचे, जातीचे मावळे होते. जातीधर्माच्या मर्यादा ओलांडून स्वराज्यात सर्वांना शिवाजी महाराजांनी सामावून घेतले. त्यांचे विचार प्रत्येकाने आत्मसात करावे अशा शब्दात मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचं स्मरण करून त्यांना अभिवादन केलं. याप्रसंगी पोलीस पाटील हेमंत गजभिये, आशिक रामटेके,विलास मेश्राम, नीलकंठ बांबोडे,प्रेमजीत चव्हाण, सूरज गजभिये,धम्मादीप गजभिये,शकुंतलाबाई मेश्राम, शोभाबाई चव्हाण,तृप्तीताई ठवरे,मिलनताई मेश्राम आदी मान्यवर व गावातील नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश मेश्राम यांनी केले.व आभार प्रदर्शन प्रदीप मेश्राम यांनी मानले.


PostImage

Ramdas Thuse

Feb. 19, 2024

PostImage

आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस नेते चरणदासभाऊ कुमरे यांचा भाजपात प्रवेश


चिमूर :-

         आज दिनांक १९ फेब्रुवारीला आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत चिमूर येथील निवासस्थानी चिमूर तालुक्यातील नवेगाव (पेठ) येथील काँग्रेस नेते चरणदासभाऊ कुमरे यांनी आमदार बंटीभाऊंच्या नेतृत्वात चिमूर विधानसभा क्षेत्राचा झालेला कायापालट व विकासकार्यावर तसेच कार्यकर्तृत्वावर प्रभावित होऊन भाजपात पक्षप्रवेश केला. याप्रसंगी आमदार बंटीभाऊंनी त्यांच्या गळ्यात भाजपाचा दुपट्टा टाकून पक्षात सहर्ष स्वागत केले व अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

 

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंतभाऊ वारजूकर, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजूभाऊ देवतळे, भाजयुमो प्रदेश सचिव मनिषभाऊ तुंम्पल्लीवार, भाजपा तालुका महामंत्री प्रशांतभाऊ चिडे, भाजपा ज्येष्ठ नेते भिमरावजी ठावरी, सं.गां.नि.अ.यो. समिती अध्यक्ष संजय नवघडे, भाजपा युवा नेते तथा सरपंच ग्रा.पं. मांगलगाव प्रफुल कोलते, भाजपा ज्येष्ठ नेते रमेशजी कंचर्लावार, भाजपा ज्येष्ठ नेते गुलाबरावजी फरकाडे, भाजपा अल्पसंख्याक मोर्चा तालुकाध्यक्ष कलीम शेख, भाजपा शहर उपाध्यक्ष फारुख शेख, सरपंच ग्रा.पं. कवडशी (डाक) शुभम ठाकरे, सुरेंद्र झाडे व अन्य भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

Ramdas Thuse

Feb. 18, 2024

PostImage

रमाई जगातील महिलांसाठी मानसीक बळाची प्रेरणाशक्ती– समतादूत प्रज्ञा राजुरवाडे.. 


मानसाला दुःख मोठे करतात,सुख मानसाला मोठे करीत नाही..

चिमूर :- रामदास ठुसे

                    उंदड मानवता सर्जनशिल युगनिर्मिती म्हणजे रमाई.डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना ध्येय गाठन्यासाठी दिपस्तंभा सारख्या प्रतिकुलकाळातही मोलाची साथ दिली.नऊ कोटी कुळे उधारन्यासाठी पोटची चार मुले औषधावीना तडफडून दगावली,यासारखे दु:ख जगात कुठल्या तरी स्त्रीच्या वाटेला आले आहे का?

       तरी आयुष्यातिल दु:खाचा सत्कार रमाई करतात,म्हणून जगातिल सर्व महिलासाठी माणसिक बळाची शक्ती रमाई होय,असे प्रतीपादन डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन सस्था बाट्री पूणे च्या समतादूत प्रज्ञा राजूरवाडे यांनी केले.

               सावरी (बिड.)येथे रमाई महिला मंडळच्या वतिने सवित्रीबाई फुले- राजमाता जिजाऊ,रमाई जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमा प्रसंगी मार्गदर्शन करताना समतादूत प्रज्ञा राजुरवाडे यांनी रमाई,राजमाता जिजाऊ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बाबत उपस्थितांना सखोल माहिती दिली.

         या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयाताई मेश्राम ह्या होत्या तर उद्घाटक म्हणून ई.जेड खोब्रागडे माजी IAS अधिकारी,रेखाताई खोब्रागडे सविधान फाउडेशंन नागपुर हे होते.

       प्रमुख मार्गदर्शक समतादूत प्रज्ञा राजुरवाडे,अधीवक्ता मनिषा पाथाडे,अधीवक्ता राजरत्न पाथाडे,ताराबाई निखाडे हे होते.

         पुढे बोलताना समतादूत प्रज्ञा राजुरवाडे म्हणाल्या की रमाई या मानसीक सक्षम होत्या म्हणूनच डॉ‌.बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्या दुखाची जानीव होवु दिली नाही.बाबासाहेब यांच्या शिक्षणासाठी त्याकाळात 14 रुपये ची मनिऑर्डर पाठविली होती.यावरुन रमाई ह्या आर्थिक बुधिमान होत्या.वस्तीगृहातील मुलाच्या जेवनासाठी सोन्याच्या बांगड्या विका,गहान ठेवा,आणि मुलाच्या जेवनाची व्यवस्था करा असे सांगत होती.अशी कारुण्यमुर्ति, मौल्यवान निस्वार्थी व्यक्तिमत्व रमाई होय.

                 घर परिवाराचा सांभाळ करित असताना एक आदर्श पत्नी,सुन,माता चळवळीतिल महिलाना मार्गदर्शक म्हणून भूमिका पार पाडल्या.घरातिल आर्थिक संकटाचा कोनासही थांगपत्ता लागू दिला नाही,की कधी ही आपल्या अथांग दुखाचे भाण्डवल करत रडत बसल्या नाही,इतक्या स्वाभीमानी त्या होत्या.

         डॉ‌.बाबासाहेब आंबेडकर म्हणत रामू मानसाला दुख मोठे करतात,सुख मानसाला मोठे करत नाही,ज्याना मोठे व्हायचे असते ना ते लोक दुखाचे आभर मानतात,या आपल्या आयुष्यातील दुखाचे आभार व्यक्त कर..

        बहिस्कृत भारतमध्ये बाबासाहेब लहितात रामू महान आहे,पन मला दिवसातुण 24 तासापैकी अर्धा तास सुधा मी रामू ला देवू शकत नाही ही खंत मनात ठेवतात.तेव्हा रमाई त्यागप्रिती होत्या,बाबासाहेब म्हणाले रामू खरी धनवान आहे, तिचि खुप उधारी माज्यावर आहे. रमाईने बाबासाहेब यांना एकदा सांगीतले की महिला माजी चेष्टा करतात.

       सोन्याचा दागिना नाही आहे माज्याकडे म्हणून बाबासाहेब म्हणाले कोट्यावधी समाजाचा मोलाचा दागीना रामू तुच आहेस.रमाईच्या हृदयाचा चांगूलपणा,चारीत्र्याची शूध्दता, त्याग,संगर्ष,मातृत्व,प्रेम प्रामाणिकपना,सतत काळजी करणारे हृदय बघुन बाबासाहेबाच्या निस्सीम प्रेमाने रमाईला समजदार बनवले.

        रमाईने आपल्या संसारात तक्रार केली नाही स्वाभीमानी जिवन जगत असताना बाबासाहेब यांना आत्मविश्वास,प्रेरणा देत मोलाची साथ दिली.

         म्हणूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे सविधान लिहु शकले.कोटीकोटी जनाचे क्रांतीसुर्य ठरले,जगाला आदर्श असे व्यक्तिमतव बाबासाहेबांच्या रुपात मिळाले.तेव्हा सर्व महिलानी आपल्या दुखाला येवढे मोठे करु नका ज्यात तुमची मानसिक प्रकृती बीघडेल.

       मुलाना उच्च शिक्षणाप्रती प्रोत्साहीत करा,कुठल्याही संकटात धर्यवाण बना,खचुन जावु नका,तुमच्या आदर्श विचारातुन दुसऱ्यांना जिवन जगण्यास प्रेरित करा असे स्विस्तर मार्गदर्शन समतादूत प्रज्ञा राजूरवाडे यांनी केले.

       यावेळी रमाई महिला मंडळ सावरी बिड तर्फे प्रज्ञा राजुरवाडे, अम्बिका बैले,अधीवक्ता मनिषा पाथोडे यांना रमाई मुर्ति व सविधान हे पुस्तक देवून सन्मानित करण्यात आले.

       या कार्यक्रमाचे सुत्रसंचालंन सिमाताई शेंडे यांनी केले तर प्रास्ताविक पौर्णिमाताई रामटेके यांनी केले व आभार अस्मिताताई बैले यांनी मानले.


PostImage

Ramdas Thuse

Feb. 16, 2024

PostImage

राष्ट्रासंत तुकडोजी महाविद्यालय,चिमूर येथे संशोधन पध्दतीवर कार्यशाळा संपन्न


 

चिमूर :-

            गांधी सेवा शिक्षण समिती चिमूर व्दारा संचालित राष्ट्रासंत तुकडोजी महाविद्यालयात कॉमर्स असोसिएशन तर्फे संशोधन पध्दती या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अश्विन चंदेल सर, मुख्य मार्गदर्शक डॉ. अनिता महावादीवार, वाणिज्य विभाग प्रमुख, भिवापूर महाविद्यालय, भिवापूर तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.प्रफुल्ल बन्सोड, मराठी विभाग प्रमुख प्रा.कार्तीक पाटील सर यांची उपस्थिती होती.

या दरम्यान प्राचार्य डॉ. अश्विन चंदेल सर यांनी संशोधन क्षेत्राच्या कार्यपध्दतीवर विस्तृत मार्गदर्शन केले. डॉ. अनिता महावादीवार यांनी संशोधन क्षेत्र व्यापक करण्याकरीता समस्येचे आकलन व निराकरण करण्याकरीता संशोधकाची भुमिका व विद्यार्थ्यांना संशोधन करीत असतांना त्यांचा आराखडा कसा तयार करावा तसेच शोध प्रबंध तयार करत असतांना महत्वाचे मुद्दे सांगितले. डॉ. प्रफुल बन्सोड सर व प्रा. कार्तीक पाटील यांनी सुध्दा विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ. हरेश गजभिये, वाणिज्य विभाग प्रमुख यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. निखील पिसे, तर आभार कु. गौरी कुळमेथे यांनी मानले. कार्यशाळा यशस्वी होण्याकरीता डॉ.लक्ष्मण कामडी, प्रा. चेतन चौधरी व प्रा.रूपाली बरडे यांनी सहकार्य केले.


PostImage

Ramdas Thuse

Feb. 15, 2024

PostImage

वाकर्ला येथील अपघात ग्रस्त कुटुंबाला डॉ.सतिश वारजूकर यांचे कडून आर्थिक मदत


 चिमूर :-

            तालुक्यातील वाकर्ला येथील दोन युवकांचा अपघात झाला होता. त्या अपघात ग्रस्त कुटुंबाला राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्वयक चिमूर विधानसभा क्षेत्र डॉ. सतिशभाऊ वारजुकर यांनी भेट घेऊन आर्थिक मदत केली

        सविस्तर वृत्त अशी की,चिमूर तालुक्यातील वाकर्ला येथील युवक राहुल राऊत, व लक्ष्मण ढेंगरे या दोन युवक शंकरपूर येथून भिवापूर येथे टाटा एस गाडीने मिरची घेऊन जात असतांना त्यांच्या गाडीला मागवून ट्रक ने धडक दिल्याने दोघांनचाही जागीच दुर्देवी मृत्यू झाले होता. घरातील करते धरते असणारे कमवते युवक असल्याने त्याचे कुटूंब उघड्यावर पडले. तरी राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्वयक चिमूर विधानसभा क्षेत्र डॉ. सतिश वारजूकर यांनी दखल घेत गुरवार दि.15 रोजी वाकर्ला येथे कुटुंबीयांची भेट घेऊन आधार देत आर्थिक मदत केली. या प्रसंगी चिमूर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष रोशन ढोक,प्रदीप सोनटक्के, बाळु माळवे, सूरज गायकवाड, मंगेश राऊत, सुधाकर राऊत, लक्ष्मण माळवे, स्वप्नील ढेंगरे, अमोल तुमराव, रोशन मोहड, प्रकाश माळवे उपस्थित होते.


PostImage

Ramdas Thuse

Feb. 15, 2024

PostImage

संत सेवालाल महाराज जयंती साजरी


चिमूर:-

          गांधी सेवा शिक्षण द्वारा संचालीत स्थानिक राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय येथे विद्यार्थी विकास विभाग व इतिहास मंडळाद्वारे संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ अश्विन चंदेल होते कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून इतिहास विभागप्रमुख डॉ प्रफुल राजुरवाडे होते त्यांनी आपल्या मार्गदर्शनात संत सेवालाल महाराज यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला उपप्राचार्य लेप्टनंट डॉ प्रफुल्ल बन्सोड होते. प्रा कार्तिक पाटील प्रा डॉ गजभिये प्रा.पिसे डॉ. कत्रोजवार डॉ. कामडी प्रा पोपटे प्रा शितल वानखेडे प्रा वर्षा सोनटक्के उपास्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास विभागाचे प्रा डॉ राहांगडाले यांनी केले तर आभार शारिरिक शिक्षण व क्रिडा संचालक डॉ उदय मेंढुलकर यांनी आभार मानले या कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद होता.


PostImage

Ramdas Thuse

Feb. 12, 2024

PostImage

न्यू राष्ट्रीय प्रेरणा कॉन्व्हेंट तथा राजीव गांधी प्राथमिक विद्यालय (इंग्रजी माध्यम)चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात


 चिमूर :-

        न्यू राष्ट्रीय प्रेरणा कॉन्व्हेंट तथा राजीव गांधी प्राथमिक विद्यालय (इंग्रजी माध्यम)चिमूर चे तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन व स्पोर्ट्स डे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी अध्यक्षस्थानी माजी मंत्री महाराष्ट्र राज्य तथा महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी डॉ.अविनाश वारजूकर तर उदघाटक म्हणून माजी आमदार तथा अध्यक्ष आदिवासी सेल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी डॉ. नामदेवराव उसेंडी हे होते. सह उदघाटक म्हणून राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्वयक चिमूर विधानसभा क्षेत्र डॉ. सतिश वारजूकर,तसेच विशेष अतिथी म्हणून चिमूर तालुका काँग्रेस ज्येष्ठ नेते धनराज जी मालके, अध्यक्ष चिमूर शहर काँग्रेस कमिटी अविनाश अगडे, पालक प्रमुख अमित लोथे,पप्पू शेख,प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष श्री प्रभू राजारामजी शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था नागपूर सुष्मिता वारजूकर, कोषाध्यक्ष श्री प्रभू राजारामजी शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था नागपूर पलाश वारजूकर,उपस्थित होते. प्रास्तविक प्राचार्या स्नेहसंमेलन प्रमुख सौ. यामिनी खारकर मॅडम यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अविनाश वारजूकर यांनी आपल्या मार्गदर्शनातून स्नेहसंमेलनाचे महत्व विध्यार्थ्यांच्या जीवनात अभ्यासाबरोबरच कितपत महत्वाचे असते यावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर डॉ.नामदेवराव उसेंडी यांनी सुद्धा विध्यार्थ्यांना अभ्यासाबरोबच खेळाचे व सांस्कृतिक कार्यक्रमाचे महत्व पटवून दिले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुष्मिता वारजूकर आपल्या शाळेत नर्सरी ते 7 पर्यंत इंग्लिश मीडियम शाळा सध्या सुरू असून ही शाळा शैक्षणिक दृष्ट्या चिमुर मध्ये पुढे जात असून या शाळेचे उत्तम स्नेहसंमेलन व्हावे हा नेहमीच आपला प्रयत्न राहील या शाळेला आपण 12 पर्यंत पुढे नेणार आहोत नंतर पुढे चांगली उपयोगी कोर्स सुरू करण्याचा मानस आहे आपण कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केले कार्यक्रमा प्रसंगी सहउदघाटक डॉ. सतिश वारजुकर यांनी सुद्धा मंचावरून विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विध्यार्थ्यांच्या शुप्त गुंणांना वाव मिळण्याच्या दृष्टीकोनातून व त्यांच्या जिवनात प्रत्येक भागात उंच भरारी घेयाकरिता वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते. स्पोर्ट डे च्या माध्यमातून विविध खेळाचे तसेच स्नेहसंमेलणाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम गोंडी नृत्य, देशभक्ती पार नृत्य, अनेक राज्यावर वर आधारित नृत्य, एकाकिका, यांचे आयोजन शाळेकडून कारण्यात आले.कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, विध्यार्थी, पालक यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन अस्विनी कुरेकार मॅडम, आभार शेख सर,यांनी केले.


PostImage

Ramdas Thuse

Feb. 10, 2024

PostImage

विद्यार्थी रमले ताडोबाच्या निसर्गात


चिमूर:-

         ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेला मौजा कोलारा तु येथील जिल्हा परिषद प्राथमिक उच्य शाळेची शैक्षणिक सहल प्रसिद्ध ताडोबा जंगलालगत कोलारा गेट वर निसर्ग रम्य वातावरणात शैक्षणिक सहल आयोजीत करीत शाळेकरी मुलांनी आनंद लुटला

 यावेळी शा.व्य समिती अध्यक्ष गजु सिडाम, मुख्याधापक किशोर गभने, याच्या मार्गदर्शनात जगल भ्रमती प्राण्याविषयक मार्गदर्शन करण्यात आला मुख्याधापक गभने बोकडे रामटेके, तंलाडे, कामडी सरपच शोभा कोयचाडे,गणेश येरमे विनोद उईके सदिप मेश्राम दिपक जाधव संगीता कारमेगे,इंद्रायनी रामटेके, रेखा गणविर प्रमोद भरडे आदी सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता स्नेह भोजनाने करण्यात आला


PostImage

Ramdas Thuse

Feb. 10, 2024

PostImage

ग्राम पंचायत च्या वतीने महिला मेळावा सपन्न


- एक कुटूब एक कचरा कुडी चा नाविन्यपूर्ण उपक्रम 

- गायत्री महिला ग्रामसंघाच्या फलकाचे अनावरण

चिमूर :-

       तालुक्यातील प्रसिद्ध असलेला विविध उपक्रमशिल अशी ओळख मौजा कोलारा तु येथील ग्राम पंचायत च्या वतीने रोज गुरवारला महिला मेळावा हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला  

कार्यक्रमाला तालुका समन्वयक बारसागडे सरपंच शोभा कोयचाडे सदस्य गणेश येरमे अविनाश गणविर प्रियंका भरडे ग्रामसेवक संजय ठाकरे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते

गणेश येरमे महीला सक्षमीकरण विषयक मार्गदर्शन केल तर बारसागडे बचत गटाविषयक मार्गदर्शन केल यासह सरपच कोयचाडे ग्रामसेवक ठाकरे यांनी घनकचरा व्यवस्थापन वर मार्गदर्शन केले

 महिला मेळाव्यात एक कुटूब एक कचरा कुडी चा व प्लास्टीक मुत्ती साठी सुद्धा थैल्याचा वाटप उपक्रम राबवित मौजा कोलारा तु येथे महिला बचत गटातील व एक कुटूबाना मान्यवराच्या हस्ते कचरा कुंडीचा वाटप करण्यात आले

        गाव विकासाला महिला बचत गटाच्या योगदान महत्वाचा ठरला जात असतो मॉजा कोलारा तु येथे तेहतिस महिला बचत गट आहे त्याच्या कार्याची दखल घेत गावात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पं समिती अंतर्गत ग्रायत्री महिला ग्रामसघ फलकाचे अनावरण शोभा कोयचाडे यांच्या हस्ते करण्यात आला

      महिला मेळावा कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता मडावी रामटेके माळवे आदी बचत गटातील महिलांनी परिश्रम घेतले तर सुत्रसंचालन रामटेके उपस्थिस्थाचे आभार येरमे यानी मानले

बहुसख्यने महिला बचत गट सदस्य उपस्थित होते व परिसरात कचरा कुंडी वाटप उपक्रमाचा सर्वत्र कौतुक होत आहे


PostImage

Ramdas Thuse

Feb. 10, 2024

PostImage

आदर्श शाळेत आदर्श विद्यार्थी घडावे.. डॉ.सतीश वारजुकर


चिमूर तालुक्यातील हिरापूर येथील शाळेला आदर्श शाळेचा दर्जा.

चिमूर :-

            भारत देशाचे तात्कालीन  पंतप्रधान माननीय मनमोहन सिंग यांनी 2007 साली स्वातंत्र्य दिनानिमित्त  केलेल्या भाषणात आदर्श शाळा योजनेचा उल्लेख केला त्यानंतर प्रतिगट एक शाळा या प्रमाणात बुद्धिमान व ग्रामीण भागातील बालकांना दर्जेदार शिक्षण देता यावे, यासाठी उत्कृष्ट तेचा मापदंड असणाऱ्या आदर्श शाळा उभारणे हा या योजनेचा उद्देश आहे या योजने अंतर्गत दुसऱ्याच शाळेला आदर्श शाळा म्हणून दर्जा मिळाला होता  परंतु गावकऱ्यांनी  डॉ. सतिश वारजूकर यांच्याकडे सतत पाठपुरवठा केला.
  त्यानुसार महाराष्ट्र सरकारने भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर  आदर्श शाळा योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांचा शारीरिक व भावनिक क्षमतेच्या सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ग्रामीण भागातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा ना काही निकषाच्या आधारे आदर्श शाळा अंतर्गत काही निधी प्रदान केली जाते, चंद्रपूर  जिल्हा परिषद चे मा.अध्यक्ष सतीश भाऊ वारजूकर  यांच्या प्रयत्नातून  चिमूर तालुक्यातील हिरापूर येथील शाळेला आदर्श शाळेच्या दर्जा मिळाला, या योजनेअंतर्गत हिरापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला एक कोटी आठ लाख दहा हजार रुपये मिळणार आहेत. मिळालेल्या निधीतून हिरापूर येथील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा शारीरिक, सर्वांगीक, क्षमतेच्या विकासाला प्राधान्य मिळणार आहे.
  चिमूर तालुक्यातील हिरापूर येथील आदर्श शाळेच्या दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे माननीय सतीश भाऊ वारजूरकर व चिमूर पंचायत समितीचे माजी उपसभापती रोशन ढोक  यांचा सत्कार हिरापूर वासियायांनी केला, त्यावेळी ग्रामपंचायत सरपंच मंदा उरकुडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वैभव दडमल, ग्रामपंचायत सदस्य दीपक नगराळे, गुणवंता ढोक, बंडू पोहनकर, उपस्थित होते.


PostImage

Ramdas Thuse

Feb. 10, 2024

PostImage

कन्हाळगाव येथील सरपंच डॉ. विजेंद्र घरत यांचा भाजपात प्रवेश


चिमूर :-

         आज दि.१० फेब्रुवारी ला आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत चिमूर येथील निवासस्थानी तालुक्यातील कन्हाळगाव येथील सरपंच डॉ. विजेंद्र घरत यांनी आमदार बंटीभाऊंच्या नेतृत्वात चिमूर विधानसभा क्षेत्राचा झालेला कायापालट व विकासकार्यावर तसेच कार्यकर्तृत्वावर प्रभावित होऊन भाजपात पक्षप्रवेश केला. याप्रसंगी आमदार बंटीभाऊंनी त्यांच्या गळ्यात भाजपाचा दुपट्टा टाकून पक्षात स्वागत केले व अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजूभाऊ देवतळे, भाजयुमो प्रदेश सचिव मनिषभाऊ तुंम्पल्लीवार, भाजपा तालुका महामंत्री प्रशांतभाऊ चिडे, भाजपा ज्येष्ठ नेते भिमरावजी ठावरी, सं.गां.नि.अ.यो. समिती अध्यक्ष संजय नवघडे, भाजयुमो तालुकाध्यक्ष श्रीरंग (बालू) पिसे, भाजयुमो शहराध्यक्ष बंटी वनकर, भाजपा ओबीसी आघाडी तालुकाध्यक्ष एकनाथभाऊ थुटे, भाजपा अनुसूचित जमाती आघाडी तालुकाध्यक्ष गजानन गुडधे, प्रतिष्ठित व्यापारी घनश्यामजी असावा, भाजपा मासळ-मदनापूर जि.प. सर्कल प्रमुख प्रविण गणोरकर, भाजपा नेते विलास कोराम, सरपंच ग्रा.पं. कवडशी (डाक) शुभम ठाकरे, बब्बूभाई खान, डॉ. दीपक दडमल, पराग अंबादे, प्रशांत अंदनसरे, बादल बडगे, संकेत सोनवाने, प्रमोद श्रीरामे व अन्य भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

Ramdas Thuse

Feb. 10, 2024

PostImage

सौ.पायल विवेक कापसे यांची विदर्भ कुर्मी समाज प्रदेशाध्यक्ष (महीला प्रकोष्ठ)पदी निवड..


 

चिमूर :-
         विदर्भ कुर्मि समाज केंद्रीय कार्यकारिणीची सभा दि.4 फेब्रुवारीला नागपूर येथे संपन्न झाली.या सभेतील चर्चा नुसार महीला विभाग प्रदेश अध्यक्ष पदी सौ.पायल विवेक कापसे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

 
         या पुर्वि पायल कापसे यांनी समाजाच्या चिमुर तालुकाध्यक्ष,चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वी रित्या सांभाळली असुन त्याच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन प्रदेशाध्यक्ष पदी निवडीचा निर्णय केंद्रीय समितीने घेतला.

 

        या सोबतच त्या मानवाधिकार संघटन दिल्लीच्या विदर्भ अध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळत असून सृश आसरा फाऊंडेशन व अ माॅडल्स ड्रिम्सच्या मुख्य संचालक ही आहेत.

    सौ.पायल कापसे यांची निवड झाल्याबद्दल कुर्मी समाजाच्या वतीने अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 
 


PostImage

Ramdas Thuse

Feb. 9, 2024

PostImage

सरपंच व सचिव यांच्यावर शिस्त भंगाची कारवाई करा…


चिमूर च्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले मुरपार वासियांनी निवेदन..

चिमूर:-

            घनदाट जंगलात वसलेल्या मुरपार गावात गट ग्रामपंचायत कार्यालय आहे.या ग्रामपंचायत अंतर्गत २६ जानेवारी निमित्ताने ग्रामसभा घेण्यात आली नाही आणि अजूनही ग्रामसभा घेण्यात आली नाही.

 

 

          सरपंच व सचिव यांनी ग्रामसभा न घेता नागरिकांच्या मुलभूत अधिकारांना डावलण्याच्या प्रकार केला आहे.यामुळे सरपंच व ग्रामसेवकांनी शासनाच्या लोकहितार्थ धोरणाला बघल दिली आहे.

               ग्रामसभा न घेण्यासंबंधाने समस्त मुरपार (तु.) वासियांनी गटविकास अधिकारी चिमूर यांच्याकडे सरपंच व ग्रामसेवकांची तक्रार केली आहे आणि त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

 

           गटविकास अधिकाऱ्यांच्या अनुपस्थित सरपंच व ग्रामसेवकांवर कारवाई करण्याचे निवेदन विस्तार अधिकारी ए.के.शामकुळे यांना दिले आहे.


PostImage

Ramdas Thuse

Feb. 7, 2024

PostImage

डॉ.बाबासाहेब आंबेडकराना अपेक्षीत असलेली समाज निर्मिती म्हणजे प्रबुध्द समाजनिर्मिती होय.- समतादूत प्रज्ञा राजुरवाडे.. 


शिवणपायली येथील दोन दिवसीय धम्म परिषदे अंतर्गत मनोगत..

चिमूर :-रामदास ठुसे 

      डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जगातिल सर्व मानवी कल्याणाकरिता मानवतेचा रचनात्म्क विचार बुधाधम्मात मिळाला व्य्कती व संपुर्ण समाज जिवनात नितीला महत्व आहे,निती हेच बुध्दधम्माचे केंद्र आहे.

       पंचशिल,अष्टशिल,निब्बान सिधान्त दशपारमिता हे आदर्श जिवन जगण्याचा मार्ग आहे.पंचशिल हे व्यक्तीला वैयक्तिक पातळीवर,अष्टशिल सामाजिक पातळीवर सूधारना घडवुन आणन्यासाठी आहे तर निब्बान सीधान्त हे अष्टशीलाचे पालन करताना आलेल्या अडचणींवर चर्चा करते‌.

           दस पारमिता मनुष्यत्वाला पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी आहे व अशी नितिमाणसमाजनिर्मिती मानव सेवा करण्यास सक्षम आहे.त्यात मानवीदुख,वर्गकलह शोषण दुर करुन समताधिस्टीत लोकशाही समाजाचे स्वप्न आहे म्हणून डॉ‌.बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षीत असलेली समाजनिर्मिती म्हणजे प्रबुध्द समाजनिर्मिती होय,असे प्रतीपादन डॉ.बाबासाहेब आंबेडकर सशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेच्या समतादूत प्रज्ञा राजुरवाडे यांनी मिलिंद बुध्दविहार नागसेन वनधम्मभुमी बहुउदेशस्मारक मंडळ शीवनपायली येथे रामजीबाबा आंबेडकर यांच्या स्मुर्तिदिनानिमित्ताने दोन दिवशीय बुध्द धम्मपरिषदचे आयोजन केले होते.

      त्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षीत असलेली समाजनिर्मिती व ध्म्मक्रांतीचे पाच सूत्रे याविषयावर आपल्या प्रमुख मार्गदर्शनात प्रज्ञा राजूरवाडे बोलत होत्या.

     या कार्यक्रमाचे अध्यक्ष पी.एम.डांगे होते तर उदघाटक म्हणून पोलिस निरीक्षक अविनाश मेश्राम होते.

       प्रमुख मार्गदर्शक प्रा.अनुपकुमार नालंदा ऐक्डमी वर्धा,प्रा.डाॅ.दिलिप पाटिल अलिबाग मुंबई समतादूत प्रज्ञा रजुरवाडे,चिमुर विधानसभा क्षेत्र काँग्रेसचे समन्वय माजी जिल्हापरिषद अध्यक्ष विद्यमान जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रीय ओबीसी महासंघ महारास्ट्र प्रदेशचे डॉ‌सतिशभाऊ वारजूरकर,पोलिस निरीक्षक चिमुर योगेश घारे,प्रा.संजय बोधे,माजी पंचायत समिती सदस्य नर्मदा रामटेके,किशोर आंबादे लोकमत पत्रकार विकास खोब्रागडे,समाजसेवक कनाथ गोंगले,पोलिस पाटिल महेंद्र डेकाटे आदी उपस्थित होते.

         धम्मपरीषदेच्या दुसऱ्यादिवशी बौद्धध्म्म संभारंभाचे अध्यक्ष महास्थविर पूज्य भदंत शीलान्दजी,महास्थिवर पूज्य भदंत ज्ञानज्योती,पूज्य भदंत यश (महामेवा महावीहार श्रीलंका,)पूज्य भदंत डॉ.ध्म्मचेती, पूज्य भदंत धम्मवंश (बंगाल ), पूज्य भदंत सोन,पूज्य भदंत इंदमुनी (उरवेला बुधगया) यांनी धम्मशीलाचे पालन व ध्म्मदेशना दिली.

         आंबेडकरी चळवळीचे केंद्र बिंदू मानव आहे,येथील मानुस टीकेल तर राष्ट्र,जग टीकेल हा धम्मपरीषदेचा मुख्य उदेश आहे.आंबेडकरी व बुध्द धम्माच्या आदर्शाची विचारधारा सविधानिक मुल्य मजबूत होन्यासाठी आहे.तेव्हा संपुर्ण मानव कल्यानाकरिता बुध्द धम्म प्रचारप्रसार करने ही जबाबदारी आंबेडकरी अनुयायांची जास्त आहे.

       प्रबुध्द समाजाशी जगातील सामाजिक, आर्थिक, राजकिय, शैक्षणिक,लोकशाहीचे भविष्य निगडीत आहे.असे जागतिक मानवी कल्यांन हे बुध्द तत्वज्ञानाशिवाय शक्य नाही आहे असे संपुर्ण मार्गदर्शनातंर्गत चर्चा धम्मपरिषदेमंध्ये करण्यात आली.

        यावेळी मनोज राजा गोसावी यांचा भिमबुध्दगितांचा कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनार्धन डेकाटे यांनी केले तर संचालन बालकदास पाटिल यांनी केले व आभार साहिल खोब्रागडे यांनी मानले.

Previous article


PostImage

Ramdas Thuse

Feb. 7, 2024

PostImage

दिव्यांगना कडे नगर परिषदेचे दुर्लक्ष.


चिमूर नगर परिषद ने दिव्यांगना त्वरित धनादेश वाटप करावे 

 

काँग्रेसचे मिडिया प्रमुख पप्पुभाई शेख यांची मागणी

 

चिमूर :-

        नगर परिषद अंतर्गत सामान्य फंडातुन काही निधी दिव्यांग साठी राखीव असताना नगर परिषद दिव्यांगांना मात्र ताळाटाळ करीत आहे. अजूनही दिव्यांगाना निधी दिली नसल्याने निधी त्वरित देण्याची मागणी कांग्रेसचे मीडिया प्रमुख पप्पुभाई शेख यांनी केली आहे.

   चिमूर नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या प्रत्येक प्रभागात दिव्यांग असून त्यांचे कडून अर्ज मागविले. परंतु त्यांच्या अर्जा कडे दुर्लक्ष केल्या जात आहे. नगर परिषद च्या सामान्य फंडातुन काही टक्के निधी राखीव ठेवून दिव्यांगच्या हितासाठी ठेवले जात असते. परंतु नगर परिषद ने डोळे झाक करीत निधी अजूनही वाटप केले नाही. दिव्यांग नगर परिषद कडे सतत जाऊन त्रास सहन करावा लागत आहे. 

  तरी नगर परिषद ने दिव्यांगाना त्वरित निधी वाटप करण्याची मागणी कांग्रेस शहर मीडिया प्रमुख पप्पूभाई शेख यांनी केली आहे.


PostImage

Ramdas Thuse

Feb. 7, 2024

PostImage

जेतवन बुद्ध विहारात त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन


चिमूर:-

          तालुक्यातील जेतवन बुद्ध विहार, मालेवाडा येथे दि.7 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी ठीक 9.30 वाजता त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेला सत्यफुलाबाई चव्हाण व शोभाबाई गजभिये यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून अभिवादन केले. डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनाला खऱ्या अर्थाने खंबीरपणे साथ देणाऱ्या, बाबासाहेबांना घडविणाऱ्या त्यांच्या पत्नी माता रमाई यांनी प्रचंड हाल अपेष्टा सहन करुन बाबासाहेबांच्या कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.या मातेने आपल्या इच्छा -आकांक्षाना मूठमाती देऊन बाबासाहेबांना समाजहीतासाठी लढण्यास प्रोस्ताहीत केले. माता रमाई बाबासाहेबांच्या आयुष्यात आल्या नसत्या तर एवढ्या प्रचंड विद्वतेचा निस्वार्थ नेता कधीच घडला नसता, अशा शब्दात मान्यवरांनी त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या कार्याचं स्मरण करून त्यांना अभिवादन केलं.या प्रसंगी भिमज्योती महिला मंडळ, बौध्द पंच कमेटी मालेवाडा तथा गावातील नागरिक उपस्थित होते.


PostImage

Ramdas Thuse

Feb. 6, 2024

PostImage

माजी नगरसेवक सतीश जाधव यांना अटक करा


काँग्रेसची पत्रकार परिषदेत माहिती

काँग्रेसचे माजी नगरसेवक विनोद ढाकुणकर अपघात प्रकरण

चिमूर:-

       ग्रामगीता महाविद्यालयासमोर काँग्रेसचे माजी नगरसेवक विनोद ढाकुणकर यांच्या दुचाकीला भाजपचे माजी नगरसेवक सतिश जाधव यांच्या चारचाकीने धडक दिली. हा अपघात नसून घातपात आहे. याप्रकरणी सतीश जाधव यांना अटक करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. यासंदर्भात त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

माजी नगरसेवक सतीश जाधव हे आमदार बंटी भांगडीया यांचे निकटवर्तीय आहेत. आमदार भांगडीया हे काँग्रेस कार्यकर्त्यांना विविध मागनि प्रलोभन दाखवून भाजपमध्ये येण्यासाठी दबाव टाकतात. त्यात यश आले नाही तर वेगळया पद्धतीने धमकवितात असा आरोप तालुका काँग्रेस पक्षाने केला आहे.

अपघाताच्या वेळी सतीश जाधव हे स्वतः वाहन चालवित होते,असा दावा काँग्रेसने केला आहे. अपघातानंतर जाधव यांनी आपले वाहन पोलिस ठाण्यात जमा करायला हवे होते. मात्र, तसे न करता वाहन लपवून मोकळे फिरत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

या अपघातप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने उपविभागीय अधिकारी,व ठाणेदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

शिष्टमंडळात प्रा. राम राऊत, विधानसभा काँग्रेस पक्ष समन्वयक डॉ. सतीश वारजूकर, तालुकाध्यक्ष डॉ. विजय गांवडे, गजानन बुटके, रोशन ढोक, प्रदीप तळवेकर, अविनाश अगडे, नितीन कटारे, सविता चौधरी, गीता रानडे यांचा समावेश होता.


PostImage

Ramdas Thuse

Feb. 5, 2024

PostImage

राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूरची औद्योगिक अभ्यास दौरा


चिमूर:- 
        राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूर ची औद्योगिक अभ्यास दौरा वाणिज्य विभाग प्रमुख डाॅ.हरेश गजभिये यांच्या नेतृत्वाखाली साखर कारखाना देवाळा,जिल्हा भंडारा येथे नेण्यात आली होती. ह्या अभ्यास दोऱ्यात महाविद्यालयातील वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी ऊसावर प्रक्रिया करून साखर कशाप्रकारे तयार केली जाते त्यामध्ये ऊसाचे गाळप, बॉयलर विभाग, पॅकिंग विभाग या सर्व भागातील प्रक्रिया समजून घेण्यात आली. या सहलीत डाॅ. लक्ष्मण कामडी, प्रा.निखिल पिसे, प्रा.चेतन चौधरी, प्रा.रूपाली बरडे व प्रा.वर्षा सोनटक्के आदींचा सहभाग होता


PostImage

Ramdas Thuse

Feb. 5, 2024

PostImage

शेतात बांधलेल्या बैलावर वाघाने हल्ला करून केले ठार


परिसरातील शेतकऱ्यात भीतीचे वातावरण

 चिमूर:-
           तालुक्यातील खापरी धर्मू येथील कृष्णा शिवराम मेश्राम हे आज दिनांक 5 फेब्रुवारीला सकाळी 7 वाजताच्या सुमारास गावा जवळील खुट्ट्याला बांधलेल्या तीन बैलांना चारापाणी व सेन गोळा करायला गेले असता खुंट्याला बांधून असलेल्या त्या तीन बैला पैकी एक बैल खुठ्यासह नसल्याने शोधा शोध करीत जागेपासून काही अंतरावर असलेल्या बोडी पर्यंत बैल फरकळत नेऊन बैल मृत अवस्थेत होते बैलाचे काही भाग वाघाने खाल्ल्याचे दिसून आल्याने या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाटून पंचनामा केला असून बैलाच्या मृत्यूने शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान झाले तरी शेतकऱ्याला नुकसान भरपाई वन विभागाने द्यावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे तरी या घटने मुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने वाघाचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


PostImage

Ramdas Thuse

Feb. 5, 2024

PostImage

गरडापार गावातील विविध समस्यांसंदर्भात आमदार महोदयाला महिलांचे निवेदन 


चिमूर:-

          विधानसभा क्षेत्राचे आमदार  कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांची चिमूर येथील निवासस्थानी तालुक्यातील गरडापार येथील महिला भगिनींनी चिमूर कृ.उ.बा. समिती संचालक कैलास धनोरे यांच्या नेतृत्वात संपूर्ण गावात दारूबंदीसाठी व गट ग्रामपंचायत महालगाव (काळू) येथील ग्रामसेवक रुपचंद धनविजय यांच्याकडून शासकीय कामात वारंवार होत असलेल्या कामचुकारपणाबाबत त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी या मागणीसंदर्भात तसेच गावातील विविध समस्यांसंदर्भात निवेदन सादर करून भेट घेतली.याप्रसंगी आमदार महोदयांनी वरील विषयांची तात्काळ दखल घेत सर्व महिला भगिनींशी सविस्तर चर्चा करून त्यांच्या समस्या तथा मागण्या जाणून घेतल्या आणि सर्वांना आश्वस्त करत यासंदर्भात लवकरच कारवाई करण्यात येईल असा विश्वास दिला.

 

यावेळी चिमूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक कैलासभाऊ धनोरे, चिरकूटा नन्नावरे, गणेश दडमल, बंडू दडमल, ग्रा.पं. सदस्या वनिता नन्नावरे, रज्जू दडमल, सुवर्णा दडमल, संगीता दडमल, गिता नन्नावरे, अर्चना केमये, नितेश नन्नावरे, प्रशांत दडमल, प्रफुल्ल दडमल व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.


PostImage

Ramdas Thuse

Feb. 5, 2024

PostImage

माजी नगरसेवकाच्या दुचाकीला कारची धडक विनोद ढाकुणकर गंभीर


ग्रामगीता महाविद्यालयासमोरील घटना

चिमूर:-
           येथील माजी
नगरसेवक तथा बिल्डिंग बांधकाम व्यावसायिक विनोद गंगाराम ढाकुणकर दुचाकीने येत असताना मागून आलेल्या चारचाकी वाहनाने जबर धडक दिली. या अपघातात माजी नगरसेवक गंभीर जखमी झाले असून, त्यांना नागपूरला रेफर करण्यात आले आहे. ही घटना रविवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास ग्रामगीता महाविद्यालया समोरील महामार्गावर घडली.

माजी नगरसेवक ढाकुणकर यांनी ग्रामगीता महाविद्यालयाच्या गेटचे काम घेतल्याने सदर
कामाची पाहणी करुन परत येत असताना त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात विनोद ढाकुणकर यांना काही अंतरावर फरफटत नेले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर लागला असून, शहरातील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर नागपूरला रेफर करण्यात आले. घटनेच्या तासाभरानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलीस उपनिरीक्षक भीष्मराज सोरते, पोलीस शिपाई रामेश्वर डोईफोडे, चंद्रशेखर श्रीरामे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पुढील तपास ठाणेदार योगेश घारे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश चवरे करीत आहे


PostImage

Ramdas Thuse

Feb. 5, 2024

PostImage

राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात रस्ते सुरक्षा सप्ताह अभियान


चिमूर:-रामदास ठुसे 

          गांधी सेवा शिक्षण समिती द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व उप- प्रादेशिक परिवहन कार्यालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ते सुरक्षा सप्ताह चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य लेप्टनंट डॉ प्रफुल बन्सोड होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात रस्ते सुरक्षा सप्ताह का महत्वाचा आहे. रस्त्यानी चालणारा प्रत्येक व्यक्ती सुरक्षीत असावा ही आपली जबाबदारी आहे. असे सांगितले.मार्गदर्शक म्हणून सहाय्यक मोटार निरीक्षक उपप्रादेशिक परिवहन कार्यालय शिवाजी विभूते ,नरेंद्र उमाळे, अंशुल मुर्डीव उपस्थित होते. शिवाजी विभूते यांनी आपल्या मार्गदर्शनात रस्ते अपघात रोखण्यासाठी  स्वच्छता अभियाना सारखे अभियान राबविण्यात यावे 15 ते 21 वयोगटातील विधार्थ्यांनी पुढाकार घ्यावा. हेल्मेट, सिटबेल्ट वापरणे गरजेचे आहे. नरेंद्र उमाळे यांनी लायसन्स परवाना चे नियम सांगितले नवीन वाहन कायदा समजून सांगितला. अंशुल मुर्डीव यांनी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकाना या वेळी रस्ता अपघात टाळण्यासाठी शपथ दिली तसेच एखादा अपघात झाल्यानंतर काय करायला हवे या विषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला मराठी विभाग प्रमुख प्रा कार्तिक पाटील शारिरिक शिक्षण संचालक डॉ उदय मेंढुलंकर अंतर्गत गुणवत्ता विकास विभागाचे प्रा. आशुतोष पोपटे उपस्थित होते. सुत्रसंचालन राष्ट्रिय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ प्रफुल राजुरवाडे प्रास्ताविक रासेयो विभागीय समन्वयक प्रा पितांबर पिसे तर आभार रासेयो कार्यक्रम अधिकारी  डॉ नितिन कत्रोजवार यांनी मानले. या कार्यक्रमात विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Ramdas Thuse

Feb. 3, 2024

PostImage

जि.प.शाळेत रंगले कविसंमेलन


 

शालेय वार्षिक स्नेहसंमेलनात कविसंमेलनाचे आयोजन

 

निमंत्रित कवींनी आपल्या कविता सादर करून स्नेहसंमेलनाची रंगत वाढवली.

 

चिमूर तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा,बरडघाट येथे शालेय वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले.या वार्षिक स्नेहसंमेलनात कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले.कविसंमेलनात विद्यार्थी,पालक आणि निमंत्रित कवींनी आपल्या कविता सादर करून स्नेहसंमेलनाची रंगत वाढवली.विविध विषयांवरील कविता याप्रसंगी कवींनी सादर केल्या.

 

कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवी प्रकाश कोडापे होते.प्रमुख अतिथी म्हणून कवडू बारेकर,रामभाऊ मेश्राम,सुरेश सहारे,रामचंद्र सहारे,स्वप्नील श्रीरामे,हरिभाऊ रिनके,पंढरी श्रीरामे,प्रभाकर दोडके, मुख्याध्यापक सुरेश डांगे आदी उपस्थित होते.कविसंमेलनात कवी तलाशकुमार खोब्रागडे,मनोज सरदार,डॉ.शिलवंत मेश्राम,मुरलीधर चुनारकर या निमंत्रित कवींव्यतिरिक्त बरडघाट येथील सोनाली मेश्राम,प्रतिभा भोयर,वैशाली दोडके, बेबी भोयर,सोनाली बारेकर,निरंजना मेश्राम,सागर सहारे यांनी आपल्या कविता सादर केल्या.शालेय विद्यार्थी तेजस्विनी भोयर,अवनी श्रीरामे, साक्षी पोईनकर,वैष्णवी मेश्राम,प्रांशूल बारेकर,अंकित मेश्राम,लोभांशू मेश्राम यांनी कविता सादर केल्या.कविसंमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन कवी प्रकाश मेश्राम यांनी केले.प्रास्ताविक मुख्याध्यापक सुरेश डांगे यांनी केले.आभार अर्चना डफ यांनी मानले.सहभागी कवींना वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानतर्फे सन्मानपत्र देण्यात आले.आयोजनासाठी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,गुरुदेव सेवा मंडळ सदस्य तथा ग्रामस्थांनी सहकार्य केले.


PostImage

Ramdas Thuse

Feb. 2, 2024

PostImage

मालेवाडा येथील जेतवन बुद्ध विहारास सुभेदार रामजी बाबा आंबेडकर  ह्यांची प्रतिमा भेट 


चिमूर:-

       तालुक्यातील जेतवन  बुद्ध विहार, मालेवाडा  येथे दि.2 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी ठीक 9.30 वाजता सुभेदार रामजी बाबा आंबेडकर  यांच्या  स्मृतिदिनानिमित्त आदरांजली कार्यक्रम संपन्न झाला.

           सुभेदार रामजी बाबा आंबेडकर  यांचे  प्रतिमेला मोरेश्वर पाटील व प्रदीप मेश्राम यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून अभिवादन केले. या प्रसंगी योगेश मेश्राम  यांनी सुभेदार रामजी बाबा आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. रामजी बाबा आंबेडकर हे ब्रिटिश भारतीय सैन्यामध्ये ‘सुभेदार’ पदावर कार्यरत होते. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असल्यामुळे त्यांनी भारतीय सैन्यांना शिकवण्याचे शिक्षक म्हणूनही काम केले आहे. रामजी आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील होते. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत रामजी मालोजी आंबेडकरांनी भीमरावांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी हालअपेष्टा सहन केल्या. भीमरावाने उच्च शिक्षण घेऊन समाजाला गुलामितुन बाहेर काढावे ही रामजी आंबेडकरांची इच्छा होती.अशा शब्दात मान्यवरांनी सुभेदार रामजी बाबा आंबेडकर यांच्या कार्याचं स्मरण करून त्यांना अभिवादन केलं. या प्रसंगी औचित्य साधून उपासिका वंदना कवडूजी मेश्राम यांच्या वतीने  योगेश कवडू मेश्राम यांनी सुभेदार रामजी बाबा आंबेडकर ह्यांची  प्रतिमा जेतवन बुद्ध विहार येथे सस्नेह भेट दिली.
या प्रसंगी भीमाबाई गजभिये, शकुंतला मेश्राम, लीलाबाई बोरकर,चिराग पाटील ,निशांत शेंडे, आदी. मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन  आशिक रामटेके यांनी केले.


PostImage

Ramdas Thuse

Feb. 2, 2024

PostImage

वनक्षेत्रातून जेसीबी मशीन वनकर्मचाऱ्यांनी केली जप्त.


चिमूर :-

          वनक्षेत्रात अवैध वाळू उत्खनन करण्यासाठी रॅम्प तयार करणारे जेसीबी मशीन गस्तीवर असलेल्या वनकर्मचाऱ्यांनी जप्त केले.

चिमूर उपक्षेत्रातील बिट क्रमांक ३६८ परिसरात वाळू चोरी करण्याकरिता रॅम तयार करण्याचे काम सुरू होते. चिमूर उपक्षेत्रातील मेश्राम यांच्यासह वनरक्षक, मजूर गस्तीवर होते. त्यांना जंगलात वाहनाचा आवाज आला. त्यांनी आवाजाच्या दिशेने जाऊन बघितले तेव्हा वनक्षेत्रातील नाल्यावर जेसीबीने रॅम्प तयार करताना आढळले. याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊरकर यांना देण्यात आली. ते घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाने जेसीबी मशीन जप्त केली आहे.


PostImage

Ramdas Thuse

Feb. 2, 2024

PostImage

भाजप ची गाव चलो अभियान ची बैठक संपन्न.चिमूर :-

        आगामी लोकसभा व विधानसभा जिंकण्यासाठी भाजप संघटना मजबूत करण्यासाठी गाव चलो अभियान ४ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी पर्यत असून संबंधित संयोजक, विस्तारक,प्रवासी कार्यकर्ता यांची नेमणूक करून दुसऱ्या गावात जाऊन व्हाटसप निर्माण करणे, गावातील प्रतिष्ठित नागरिकांशी सवांद करणे, समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे, सत्य माहिती देणे अश्या विविध विषयावर भाजप जिल्हा संघटन मंत्री संजय गजपुरे यांनी माहिती देत गाव चलो अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केले.

   पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी विकासाच्या वाटचाली, अनेक योजना त्या जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहिजे. प्रवासी कार्यकर्ता यांनी प्रामाणिक पणे कार्य केले पाहिजे. गाव चलो अभियान यशस्वी करण्याचे विधानसभा प्रमुख गणेश तर्वेकर यांनी सांगितले.

     आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या नवीन वाड्यात झालेल्या गाव चलो अभियान बैठकीत  भाजप संघटन जिल्हा महामंत्री संजय गजपुरे, विधानसभा प्रमुख गणेश तर्वेकर,डॉ श्यामजी हटवादे तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे, भाजयुमो प्रदेश सचिव मनीष तुंम्पलीवार,माजी सभापती प्रकाश वाकडे,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बालू पिसे  कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक कैलास धनोरे,राजू बानकर, तांदूळ गिरणी संचालक ओमप्रकाश गणोरकर, योगेश नाकाडे, किशोर मुंगले, भाजप तालुका महामंत्री प्रशांत चिडे,हेमराज दांडेकर, विलास कोराम,सरपंच प्रफुल कोलते, सरपंच गजानन गुळधे,रमेश कंचर्लावार,संदीप पिसे, पिंटू खाटीक नंदू जी रणदिवे, मजहर शेख, महादेव कोकोडे,मनोज सोगलकर,दिनकरराव सिनगारे, लीलाधर बनसोड, प्रवीण गणोरकर,अशोक  कामडी, नामदेव हिवरकर,मनी रॉय हरीश पिसे,मनोहर रंदये सावन गाडगे तसेच माजी जीप सदस्य सौ ममता डुकरे, सौ गीता लिंगायत व सौ आशा मेश्राम उपस्थित होते.

संचालन विलास कोराम तर आभार गीता लिंगायत यांनी केले.


PostImage

Ramdas Thuse

Feb. 2, 2024

PostImage

ग्रामसेवक च्या बदली साठी गरडापार च्या महिला धडकल्या पंचायत समितीवर 


सहा.बिडीओ यांना दिले निवेदन

चिमूर :-

       पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या महालगाव (काळू) येथील कार्यरत ग्रामसेवक यांच्या अनियमितत व दुर्लक्षित पणाने महिला त्रस्त झाल्याने  गरडापार च्या महिलांनी एकत्रित येऊन पस वर धडकल्या आणि सहाय्यक बिडीओ यांना निवेदन देऊन ग्रामसेवक च्या बदली साठी कारवाई करण्याची मागणी केली आहे.

  निवेदन देत असताना कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक कैलास धनोरे, चिरकूटा ननावरे, गणेश दडमल, बंडु दडमल, वनिता नन्नावरे, रज्जु दडमल, सुवर्ना दडमल, संगीता दडमल व आदी महिला उपस्थित होत्या.


PostImage

Ramdas Thuse

Feb. 2, 2024

PostImage

चिमूर येथे शिवराय ते भीमराव प्रबोधन कार्यक्रम आयोजित..


सुप्रसिद्ध गायक कडुबाई खरात,अनिरुद्ध वनकर,अभिजित कोसम्बी गाणार..

कार्यक्रमाचे उदघाटन स्थानी आमदार बंटीभाऊ भांगडिया.. 

नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन –जितेंद्र मोटघरे व एकनाथ थुटे..

चिमूर:-

     बहुजन विचार मंच चिमूरच्या वतीने भारतीय संविधानाचे निर्माते परम पुज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या समता, स्वातंत्र्य, बंधुत्व- न्याय या मूल्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी शिवराय ते भीमराव या बहुजन संगीत प्रबोधनाचा अतिशय सुंमधुर भव्य कार्यक्रम दिनांक ४ फेब्रुवारी २०२४ ला रोज रविवारला सायंकाळी ६ वाजता स्थळ:-बी पी एड कॉलेज ग्राउंड चिमूर जिल्हा चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले आहे.

     ह्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक कडुबाई खरात,अनिरुद्ध वनकर,अभिजित कोसम्बी,कोमल धांदे,सुरेंद्र डोंगरे असे नामवंत गायक प्रबोधन पर मनोरंजन करणार आहेत.

       या कार्यक्रमाचे उदघाटन आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ )भांगडीया करणार असून ह्यावेळी जेष्ट सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.

       तरी या प्रबोधपर संगीतमय कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन निमंत्रित कार्यक्रमाचे निमंत्रण जितेंद्र मोटघरे व संयोजक एकनाथ थुटे यांनी केले आहे.


PostImage

Ramdas Thuse

Feb. 2, 2024

PostImage

 प्रा.आ. केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यास मान्यता 


चिमूर:-

          तालुक्यातील अप्पर तहसील भिसी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ३० खाटांच्या ग्रामीण रूग्णालयात राज्य शासनाने विशेष बाब म्हणून ग्रामीण न रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यास व मान्यता दिली आहे.

चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी ही मागणी राज्य शासना कडे रेटून धरली होती.त्या मागणीला यश आले असून भिसी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात श्रेणीवर्धन होणार असून लवकरच पदनिर्मिती व नवीन इमारतीचे बांधकाम सुद्धा होणार आहे.

भिसी येथे आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करून ग्रामीण रुग्णालयात रूपांतर केल्याबद्दल आ.भांगडिया यांचे भिसी परिसरातील जनतेने आभार मानले आहे .


PostImage

Ramdas Thuse

Feb. 2, 2024

PostImage

साठगाव रस्त्यासाठी उपसरपंचाचा आमरण उपोषणाचा इशारा


चिमूर:-

          तालुक्यातील साठगाव येथील रस्त्याकडे विविध आंदोलन करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देत नसल्यामुळे या रस्त्यासाठी साठगावचे उपसरपंच प्रीती दीडमुठे यांनी आमरण उपोषणाचा इशारा लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. साठगाव रोहना फाटा ते भिवापूर हा रस्ता अतिशय खराब झाला होता. या रस्त्यासाठी मागील चार वर्षांपासून ग्रामपंचायत तथा जनतेमार्फत
सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले होते. परंतु निवेदनाची दखल न घेतल्यामुळे एक वर्षाआधी गावातील जनतेला घेऊन बेशरमच्या झाडाचे रोपण करण्यात आले होते. या आंदोलनाची दखल घेत त्यावेळी तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजविण्यात आले व लगेचच रस्ता मंजूर करण्यात येईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत देण्यात आले होते. परंतु एक वर्ष लोटूनही रस्त्याचे डांबरीकरण झाले नाही.


PostImage

Ramdas Thuse

Feb. 1, 2024

PostImage

कोलारा गाव ग्राम विकासासाठी तिन वर्ष दत्तक घेण्यास कटिबंध अध्यक्ष सो.केदारसिंग चंदनसिंग रोटेले


चिमूर :-

           आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमुर आणि ग्राम पंचायत कोलारा यांचे संयुक्त विद्यमाने ग्राम विकास मतदान जागृती युवा शक्ती या संकल्पनेवर राष्ट्रीय सेवा योजना ग्रामिण समाजकार्य श्रमसंस्कार विशेष शिबिर दि. २४ जाने . ते ३० जाने, कार्यक्रमाच्या समारोपीय प्रसंगी ग्राम विकासासाठी कोलारा हे गाव ३ वर्षासाठी शिबीर घेण्यास कटीबद्ध राहु असे प्रतिपादन डॉ. केदारसिंग रोटेले यांनी केले.ते पुढे म्हणाले की ग्रामाच्या विकासासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करू सुर्य हमेशा उगता रहे, सुर्य की रोशनी हमेशा बरकरार रहे, विद्यार्थी हमारा घडता रहे असे सांगुन महाविद्यालय नविन नविन कोर्सेस आणुन विद्यार्थ्यांचा विकास घडवेल विद्यार्थी हा लोकल टु ग्लोबल जाईल याकडे पुर्ण प्रयत्न करू आणि कोलारा गावचा विकास घडवु असे अध्यक्षीय भाषणातून मनोगत व्यक्त केले. डॉ. गजानन बन्सोड म्हणाले की समाजकार्य विद्यार्थी संपूर्ण भारतभर विविध क्षेत्रात आहेत. त्यांच्या माध्यमातुन गावचा विकास साधु असे ते बालले. कार्यकारी प्राचार्य डॉ. विठ्ठल ठावरी कला वाणिज्य महाविद्यालय भिसी यांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुनांच्या विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजना शिबीर घेतल्या जाते. डॉ. विजय घरत सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांनी ३ वर्ष शिबीर या गावात घेण्यासाठी मी विद्यापीठ स्थरावर पर्यंत करेल. डॉ.आनंद किन्नाके यांच्या वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय चिमूर यांच्या मार्गदर्शना नुसार ३२२ रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तर डॉ. राठोड पशुवैद्यकीय अधिकारी व त्यांची टीम यांनी २३० गुरांची तपासणी केली, ग्राम स्वच्छता, मतदार जागृती अभियान यावर पथनाट्य तसेच मा. निशिकांत मेहरकुरे यांनी मार्गदर्शन केले. सामुदायिक ध्यान योगा प्रार्थना दररोज डॉ. दिवाकर कुमरे यांनी प्रत्याशिकाद्वारे शिबीरापर्थ्यांना करून दाखविले, सामुदायिक प्रार्थना दररोज डॉ. चंद्रभान खंगार कार्यक्रम अधिकारी रा. से.यो.यांच्या मार्गदर्शनात ग्रामस्थ सज्जनराव गेडाम, योगेश गेडाम, संतोष गेडाम, अमित उईके, यांच्या साथीने घेतल्या जात होती. वनउपजापासुन उद्योगाची यावर डॉ. अजय पिसे यांनी मार्गदर्शन केले, राष्ट्रसंताचे साहित्य यावर मा. राजु देवतळे आजिवन प्रचारक तथा केंद्रीय कार्यकारणी सदस्य गुरूकुंज मोझरी यांनी मार्गदर्शन केले तर प्रा. अशोकरावजी चरडे यांनी सामुदायिक प्रार्थनेच्या महत्वावर मार्गदर्शन केले. श्री. संजय पवार यांनी विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी यावर मनोगत व्यक्त केले. शेतीसाठी जोडव्यवसाय मधुमख्खी पालन यावर मा. रमेश चौधी यांनी प्रात्याक्षिकाद्वारे याचे महत्व समजावुन सांगीतले, श्रमदान ग्रामस्वच्छता विद्यापिठ आपल्यादारी सर्वेक्षण तसेच दररोज सायंकाळी ८ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये श्री. उईके कु. धनश्री शेडामे, मेघा गेडाम, वैष्णवी गुडघे, ऋतुजा भजभुजे तसेच सर्व शिबीरातील यांनी सांस्कृतिक कार्यक्रमामधुन जनप्रबोधन करण्याचे कार्य ग्रामस्थांसाठी केले. प्राचार्य डॉ. शुभांगी लुंगे यांनी सात दिवसीय शिबीरात झालेली कामे. याबद्दल समाधान व्यक्त करून ग्रामस्थांकडुन असाच प्रतिसाद मिळाल्यास पुढील दोन वर्ष शिबीर घेण्यासाठी विचार करू असे मत मांडले. सदर कार्यक्रमास कार्यक्रम अधिकारी डॉ. चंद्रभान खंगारे, डॉ. दिवाकर कुमरे, डॉ. सुरेश मिममिले, डॉ. प्रिति दवे, डॉ. रागीनी मोटघरे, प्रा. हेमंत वरघने, डॉ. गजानन बन्सोड, डॉ. सुदर्शन खापर्डे, गजु सिडाम रतिराम वांढरे, गणेश येरमे, सरपंच सौ. शोभा कोयनाडे, अंगणवाडी सेवीका मा. इंद्रायनी रामटेके, संगीता काळयेंगे, रेखा गणविर, अविनाश गणतिर, किशोर गभणे बहुसंख्यने ग्रामस्थ व सर्व शिबीरार्थी यांच्या उपस्थितीत ग्रामिण समाजकार्य श्रम संस्कार विशेष शिबीराचा समारोपीय कार्यक्रम पार पडला.


PostImage

Ramdas Thuse

Feb. 1, 2024

PostImage

_महिलांना सामाजिक,आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील खा.नेते


हळदी कुंकू या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्त्रियांनी एकत्र येऊन एकजुटीने कार्य करावे....

 खासदार अशोक नेते

-----------------------------

भाजपा महिला आघाडी तालुका चिमूर च्या वतीने खास मकरसंक्रांतीनिमित्त बक्षीस वितरण व हळदीकुंकू कार्यक्रम सोहळा चिमूर येथे आयोजित..

------------------------------------

(चिमूर)

            31 जानेवारी २०२४ रोज बुधवारला मकरसंक्रांतीच्या निमित्ताने खास महिला-भगिनींसाठी भाजपा महिला आघाडी तालुका चिमूर च्या वतीने बक्षीस वितरण व हळदी कुंकू स्नेह मिलन कार्यक्रम सोहळा अभ्यंकर मैदान( किल्ला) चिमूर या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते.

 

हळदी कुंकू व बक्षीस वितरण या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलां भगिनींना मार्गदर्शन करतांना खासदार अशोक नेते म्हणाले की, शासन आपल्या स्तरावर महिला भगिनींसाठी अनेक लोकापयोगी कार्य करीत आहे.मग तो महिलांच्या सुरक्षेचा असो, महिलांच्या योजनेचा असो, महिला सक्षमीकरणाचा असो अशा विविध स्तरावर शासन कार्य करीत आहे.महिलांना सामाजिक, आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील आहे.केंद्र सरकारने महिलांसाठी राजकीय आरक्षण 33% करून महिलांचा सन्मान केलेला आहे. त्याचबरोबर राज्य सरकारच्या वतीने राज्यभरात महिला सक्षमीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. महिला सक्षमीकरण या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना व पुरुषांना समान अधिकार तसेच महिलांसाठी व पुरुषांसाठी एकाच छताखाली सर्व योजनांचा लाभ घेता येईल म्हणून राज्य सरकारने महिला सक्षमीकरण हा कार्यक्रम राबविलेला आहे.

 

याबरोबरचं देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी महिलांसाठी सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महिलांसाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. असे प्रतिपादन बक्षीस वितरण व हळदी कुंकू स्नेह मिलन या कार्यक्रमाच्या प्रसंगी खासदार अशोक नेते यांनी केले.

 

पुढे बोलतांना खासदार महोदयांनी या देशाचे पंतप्रधान मान. नरेंद्र मोदीजी यांनी सुरू केलेली शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान निधी महिला भगिनींसाठी सुद्धा लाभदायक असून या योजनेत वाढ निश्चितच होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करत सदर कार्यक्रमा बरोबरच हळदी कुंकू म्हणजे हिंदू संस्कृतीतील स्त्रियांसाठी एक सौभाग्याचालेन या माध्यमातून महिलांनी कसलाही भेदभाव न ठेवता स्वतःला प्रगत करावे स्त्रियांनी एकमेकांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्न करावे.

यासाठी हळदी-कुंकु कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांनी एकजुट व्हावे.असे व्यक्तव्य यावेळी खा.नेते यांनी केले.

-मार्गदर्शन-

यावेळी कीर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया व सिनेतारका प्राजक्ता माळी यांनी महिला भगिनींसाठी उत्कृष्ट उपदेशात्मक महिलांसाठी मार्गदर्शन केले.

-सत्कार समारंभ-

या कार्यक्रमाच्या निमित्ताने खासदार अशोक नेते यांना आदर्श संसद पुरस्कार मिळाल्याने या क्षेत्राचे लोकप्रिय आमदार कीर्ती कुमार (बंटीभाऊ) भांगडिया यांच्यासह सिनेतारका प्राजक्ता माळी व भाजपा पदाधिकाऱ्यांनी यावेळी खासदार' महोदयांचे शाल श्रीफळ,पुष्पहाराने मान सन्मान करून सत्कार करण्यात आले.

- भाजपात पक्षप्रवेश-

याप्रसंगी खासदार अशोक नेते व आमदार कीर्तीकुमार( बंटीभाऊ) भांगडीया यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष रमेशभाऊ ठाकरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपाचा दुपट्टा टाकून पक्षप्रवेश केला.

 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा मायाताई नन्न्नावरे,उत्कृष्ट सुत्रसंचालन नितूताई पोहनकर, आभारप्रदर्शन गिताताई लिंगायत यांनी केले.

 

 यावेळी प्रामुख्याने मंचावर खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोक नेते, आमदार कीर्तीकुमार ( बंटीभाऊ) भांगडीया, सिनेतारका प्राजक्ता माळी, भाजपा तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंतभाऊ वारजूकर, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. श्यामजी हटवादे, भाजपा ओबीसी आघाडी चे प्रदेश उपाध्यक्ष राजुभाऊ देवतळे, भाजयुमो प्रदेश सचिव मनिष तुंम्पल्लीवार,चिमूर विधानसभा प्रमुख गणेश तळवेकर,भांगडिया फाउंडेशनच्या संचालिका सौ. अर्पणाताई, मनीषाताई, भाजयुमो तालुकाध्यक्ष श्रीरंग (बालुभाऊ) पिसे,भाजपा ओबीसी आघाडी तालुकाध्यक्ष एकनाथ थुटे, भाजपा ज्येष्ठ नेते घनश्याम डुकरे,नागभीड भाजपा तालुकाध्यक्ष संतोष रडके, भाजपा शहराध्यक्ष बंटीभाऊ वनकर,महिला मोर्चा प्रदेश सचिव ममताताई डुकरे,माजी जि.प. उपाध्यक्षा रेखा कारेकर,

भाजपा महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा मायाताई नन्न्नावरे,माजी तालुकाध्यक्ष तथा जेष्ठ नेते किशोर मुंगले, सहकार आघाडी चे ओमप्रकाश गणोरकर, अल्पसंख्यांक आघाडीचे कलीम शेख,माजी जि.प.सदस्या गिता लिंगायत,आशाताई मेश्राम, छाया कंचरलावार,भारती गोडे,तसेच हजारोंच्या मोठ्या संख्येने महिला भगिनीं उपस्थित होते.


PostImage

Ramdas Thuse

Feb. 1, 2024

PostImage

राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचा समारोप..  


चिमूर :- 

            गांधी सेवा शिक्षण समिती चिमूर द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने महाविद्यालयात सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप यशस्वी पार पडला.

         या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून गांधी सेवा शिक्षण समिती चे अध्यक्ष डाॅ.दिपक यावले उपस्थित होते.त्यांनी विद्यार्थ्याना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

        कार्यक्रमास गांधी सेवा शिक्षण समितीचे सचिव प्रा.विनायक कापसे,सहसचिव श्री.नारायणराव डांगाले,कोषाध्यक्ष प्रा.मारोतराव भोयर,निवृत्त प्राध्यापक धर्मराज वरभे,समाजसेवक दिघोरे,माजी शिक्षकेतर कर्मचारी कानिरामजी कुमरे उपस्थित होते.

          प्राचार्य डॉ.अश्विन चंदेल यांनी मार्गदर्शन केले.उपप्राचार्य डॉ प्रफुल्ल बन्सोड,मराठी विभागप्रमुख प्रा.कार्तिक पाटील,विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी डॉ राहांगडाले उपस्थित होते. 

       या प्रसंगी विद्यार्थ्यांनी स्वागत गिताने पाहुण्यांचे स्वागत केले.तसेच विविध खेळात व सांस्कृतिक कार्यक्रमात प्राविण्य प्राप्त कलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. 

        या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आशुतोष पोपटे,सांस्कृतिक विभागाचे प्रा.पितांबर पिसे,शारिरिक क्रिडा विभागाचे डॉ.मेंदुलकर,प्रा.रोकडे यांनी केले तर प्रास्ताविक डॉ कामडी यांनी केले.आभार कानिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य राकेश कुमरे यांनी मानले. 

       कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर यांनी परिश्रम घेतले.महाविद्यालयीन क्रिडा स्पर्धा बौध्दीक स्पर्धा,संस्कृतिक कार्यक्रम प्राचार्य डॉ अश्विन चंदेल यांच्या मार्गदर्शनात यशस्वीरित्या संपन्न झाला. 

         महाविद्यालयातील विद्यार्थ्याचा वार्षीक स्नेहसंमेलन उत्सवास उदंड प्रतिसाद होता व त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.


PostImage

Ramdas Thuse

Jan. 8, 2024

PostImage

भोपालच्या निरजने मारली बाजी चिमूर क्रांती मॅरेथॉन स्पर्धा १९० धावपटूंचा सहभागश्रीहरी बालाजी क्रीडासंकुल,भाजप युवा मोर्चाच्या संयुक्त विद्यमाने नवीन वर्षाचे औचित्य साधून चिमूर क्रांती मॅरेथॉन २०२४ चे आयोजन करण्यात आले होते.रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घेण्यात आलेल्या दहा किलोमीटरच्या खुल्या दौड स्पर्धेत महाराष्ट्रासह अन्य राज्यातील सुमारे १९० स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत भोपालच्या निरज सोळंकीने बाजी मारली आहे.
श्रीहरी बालाजी मंदिरासमोरून सुरू झालेल्या चिमूर क्रांती मॅरॉथान स्पर्धेला आमदार कीर्तीकुमार भांगडीया यांनी हिरवी झेंडी दाखविली. बालाजी मंदिर ते पिंपळनेरी हे पाच किलोमीटर व पिंपळनेरी ते बालाजी मंदिर हे पाच किलोमीटर अशी दहा किलोमीटर खुली दौड स्पर्धा घेण्यात आली.
या खुल्या दौड स्पर्धेत भोपाळ येथील नीरज सोलंकी याने प्रथम क्रमांक पटकाविला. रेल्वे क्लब नागपूरचे नागराज बुरसूने यांनी द्वितीय, भोपाळ येथील उपेंद्र पाल, तिसरा नागपूर येथील राजन यादव,चवथा तर नाशिक येथील
अंकित कुमार याने पाचवा क्रमांक प्राप्त केला.
स्पर्धेनंतर सर्व विजेत्या स्पर्धकांना आमदार कीर्तीकुमार भांगडिया, पोलिस निरीक्षक मनोज गभने, नगर परिषद मुख्याधिकारी डॉ. सुप्रिया राठोड, भाजप तालुकाध्यक्ष राजू झाडे यांच्या हस्ते रोख पुरस्कार, चषक तथा प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी भाजप पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते. स्पर्धेच्या आयोजनासाठी श्रीहरी बालाजी क्रीडासंकुल व भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.


PostImage

Ramdas Thuse

Jan. 6, 2024

PostImage

तलवारीसारखी पत्रकारांची लेखणी दूधारी :- ठाणेदार मनोज गभने


व्हॉइस ऑफ मीडिया चिमूर च्या वतीने पत्रकार दिन साजरा.

पोलीस निरीक्षक मनोज गभणे यांची उपस्थिती.

 

     चिमूर तालुक्यातील व्हॉईस ऑफ मिडिया चिमूरच्या वतीने स्व. बाळशास्त्री जांभेकर पत्रकार दिन शहीद बालाजी रायपूरकर सभागृह येथे साजरा करण्यात आला. यावेळी शहीद बालाजी रायपूरकर सभागृहात झालेल्या कार्यक्रमामधील मंचावर ठाणेदार मनोज गभणे, व्हॉइस ऑफ मिडिया चिमूरचे तालुका अध्यक्ष रामदास हेमके, पत्रकार जितेंद्र सहारे, चिमुर प्रेस मिडीया फाऊंडेशन चिमुरचे अध्यक्ष पत्रकार पंकज मिश्रा उपस्थित होते. स्व. बाळशास्त्री जांभेकर यांचे प्रतिमेचे पूजन करून स्वागत समारंभाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक मनोज गभने व पत्रकार जितेंद्र सहारे यांनी विचार वक्त केले. 

        यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन ठाणेदार मनोज गभने म्हणाले की, तलवारीसारखी पत्रकारांची लेखणी हि सुद्धा दूधारी आहे. ते चांगल लिहत असतात तसेच वाईट सुद्धा लिहत असतात. यामुळे दुधारी आहे असं सांगतो आहे. प्रशासन आहे तर पत्रकारांची खूप गरज आहे. पत्रकार नसला तर प्रशासन बरोबर चालत नाही प्रशासन बरोबर चालल पाहिजे कामे व्यवस्थित केले पाहिजेत कामे चुकीचे होत असतील तर त्यांना जागवण्याच काम हे पत्रकार करीत असतात. पत्रकार समाजाचा आरसा आहे. हा आरसा पत्रकारांनी स्वच्छ ठेवायला पाहिजे. समाजाला जागविण्याच काम पत्रकार करीत असतात. पत्रकारांनी बातम्या लीहताणा प्रत्येक गोष्टीचे सहानिशा करावे लागत असतात. काय खोटं काय खर याची खात्री करून बातमी घेत असतात. त्यामुळं पत्रकारांच काम खूप मोठ असून एक समाजसेवा म्हणुन करीत असतात. पत्रकार हे अनेक गरीब गरजवंत शेतकरी शेतमजूर यांना योग्य न्याय देण्याचं काम आपल्या लेखणीमधुन करीत असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपल्या लेखणीमधुन समाजाला न्याय देण्याचं काम केल. असे यावेळी अध्यक्षीय भाषणात ठाणेदार मनोज गभने यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास कोराम यांनी केले. संचालन बालू सातपुते, तर आभार प्रदर्शन योगेश सहारे यांनी केले.

       यावेळी व्हॉइस ऑफ मिडियाचे जिल्हा सदस्य प्रमोद राऊत, योगेश सहारे, भरत बंडे, राजु रामटेके, रामदास ठुसे, उमेश शंभरकर, जावेद पठाण, फिरोज पठाण, संजय नागदेवते, पंकज मिश्रा, राजेंद्र जाधव, शुभम बारसागडे, नितीन पाटील, गुणवंत चटपकर, जितेंद्र गाडगे, सुनील कोसे, विलास मोहिनकर, सुनिल हिंगणकर आदी तालुक्यातील व्हॉईस ऑफ मिडियाचे पत्रकार बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.


PostImage

Ramdas Thuse

Jan. 5, 2024

PostImage

पोलीस कर्मचाऱ्यासह विद्यार्थ्यांची शहरातील मुख्य मार्गाने जनजागृती रॅली


                                         

 

पोलीस विभागाच्या स्थापना दिवसानिमित्त पोलीस विभाग व सामान्य जनतेत समन्वयका करिता जनजागृती सप्ताह राबविले जात आहे. या अंतर्गत शाळा महाविद्यालयात वाहतुकीचे नियम,अपघात, प्रतिबंधक उपाय, सायबर,गुन्हे, अंधश्रद्धा,जनजागृती पोलीस विभागामार्फत केल्या जात आहे,

 चिमूर पोलीस स्टेशन अंतर्गत आज दिनांक 5 जानेवारी शुक्रवारला संत श्री भय्यूजी महाराज विद्यालयाच्या सहकार्याने चिमूर शहरातील मुख्य मार्गाने पोलीस निरीक्षक मनोज गभने यांच्या मार्गदर्शनात जनजागृती रॅली काढण्यात आली. ही रॅली चिमूर पोलीस स्टेशन पासून हजारे पेट्रोल पंप हुतात्मा स्मारक येथे जाऊन याच मार्गाने परत आली या रॅली दरम्यान विद्यार्थ्यांनी जनजागृतीच्या घोषणा दिल्या रॅलीचे समारोप संत श्री भय्यूजी महाराज महाविद्यालयात करण्यात आले विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम अपघात प्रतिबंधक उपाय तसेच पोलीस प्रशासनाचे कार्यपद्धती विषयी पोलीस उपनिरीक्षक भीष्मराज सोरते यांनीसविस्तर माहिती दिली या उपक्रमात पोलीस कर्मचारी,श्री संत भय्यूजी महाराज विद्यालयाचे शिक्षक वृंद तथा संपूर्ण विद्यार्थी सहभागी झाले होते


PostImage

Ramdas Thuse

Jan. 4, 2024

PostImage

डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी भारतीय स्त्रीला कायदेशिररित्या सक्षम केले;समतादूत प्रज्ञा राजुरवाडे..               १९२७ साली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मनूस्मृर्ती ह्या ग्रंथाचे दहन करुन समस्त भारतीय स्त्रीच्या संरक्षणासाठी,”हिंदू कोड बिल,हा कायदा केला व स्त्रीनामुक्त केले.

     आजची स्त्री सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे,भारतिय सविधानाने स्त्री-पुरुष ही विषमता नष्ठ करुन कलम 12 ते कलम 19 पर्यंत स्त्रीयांना पुरुषाबरोबर सर्व अधिकार बहाल केले व कलम 13 नुसार मनूस्मृर्तीला अवैध ठरवले.

   अनेक प्रगत देशात मतदानाच्या अधीकाराबद्दल स्त्रीयांना आंदोलन करावे लागले.मात्र, डॉ.बाबासाहेब यांनी स्थानिक स्वराज्य संस्थात स्त्रीयांना पन्नास टक्के आरक्षण दिले.स्त्रीमुक्तीचे समर्थक डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे महिलाच्या बाबतीत वैचारिक व सामाजिक दृष्ट्या जगात अग्रेसर होते.

       म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतिय स्त्रीला कायदेशीर सक्षम केले असल्याचे प्रतीपादन डॉ.बाबासाहेब आंबेडकर सशोधंन व प्रशिक्षन संस्था बार्टी पुणेच्या समतादूत प्रज्ञा राजुरवाडे यांनी संबोधी बुधावीहार व तक्षशिला बुधाविहार यांच्या वर्धापन दिनाला अनुसरून व स्त्री मुक्ती दिनानिमित केले. 

 या कार्यक्रमाचे अध्यक्ष नागपूर हायकोर्टाचे अधीवक्ता आकाश बांबोडे हे होते तर या कार्यक्रमाचे उद्घाटन सतीश इंदुरकर यांनी केले.प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.चंद्रभान खंगार आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमुर,समतादूत प्रज्ञा राजुरवाडे,सुरेश डांगे,नरेश पिल्लेवान,एस.पटिल आदी मान्यवर उपस्थित होते.

        समतादूत प्रज्ञा राजुरवाडे पुढे बोलताना म्हणाल्या की,या देशाची प्रगती ही फक्त पुरषाची नसून ती स्त्रीचीपन तेवढीच आहे असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मत होते.

    म्हणून देशातील तमाम महिला वर्गानी,”हिन्दु कोड बिल,वाचले पहिजे व स्त्रिमुक्तीची प्रेरणा त्यातून घेतली पाहीजे.आजही स्त्रीयावरील शोषण थांबले नाहीत.मनूस्मृर्ती हा जो विचार आहे,हा ऐक विषारी व्हायर्स आहे.

      तेव्हा आजच्या आधुनिक सुशीक्षित स्त्री ने ठरवले पाहिजे की मनूविचारसरणी स्वीकारायची की भारतिय सविधानाला वाचायचे आहे व अंगीकारायचे आहे.संविधान संरक्षणाची जबाबदारी जास्त ही महिलाची आहे.

        डाॅ.चंद्रभान खंगार यांनी आपल्या प्रमुख मार्गदर्शनात म्हणाले की डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रीमुक्ती साठी जे,”हिंदू कोड बिल तयार केले होते ते मंजूर करुन घेतले नव्हते, म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.

        मनूस्मुर्ती मध्ये स्त्रियांबद्दल काय लिहले आहे ते स्त्रीयानी वाचावे.धार्मिक स्वंतत्र हे सर्वाना भारतीय सविधानाने दिले आहे.पण,स्त्रीचे अस्तित्व देव भोळेपणामुळे व मनूविचार सरणीमुळे दुर्बळ बनत आहे.तेव्हा सामर्थ्यवाण स्त्री जर बनायेचे असेल तर या मानसिक गुलामितुन स्वतला मुक्त करा व स्त्री मुक्ती दिन हा दिवस समस्त जातीधर्मातील महिलांनी समोर येऊन आंनदाने साजरा करा असे आवाहन डॉ.खंगार यांनी यावेळी केले.

        समतादूत प्रज्ञा राजुरवाडे यांच्या हस्ते भिमगित प्रोग्रामचे उद्घाटन करण्यात आले.तसेच कव्वाल सूरमा बारसागडे यांचे भारतिय सविधान देवून सत्कार करण्यात आलाय. 

           या कार्यक्रमाचे संचालन हर्षद रामटेके यांनी केले व आभार सुध्दा त्यांनीच मानले.


PostImage

Ramdas Thuse

Nov. 3, 2023

PostImage

गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांना तात्काळ पुरवठा करावे - शुभम मंडपे


 

 चिमूर उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन.. 
      

चिमूर:-
         रब्बी हंगामाची सुरुवात झाली असून शेतकऱ्यांनी चना, गहुची पेरणी केली आहे.अशातच पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे सदर मालाला पाणी द्यायचे कुठून असा शेतकऱ्यां समोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

        अशातच गोसिखुर्द प्रकल्पातंर्गत कालव्यांचे चिमुर तालुक्याच्या काही भागापर्यंत काम झाले आहे.म्हणून शेकऱ्यांची अडचणी लक्षात घेता वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष व आंबोली ग्रा.प. सदस्य शुभम मंडपे यांनी गोसिखुर्द प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांसाठी बारमाही चालु करावे अशी मागणी चिमुर उपजिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.


          शेतकऱ्यांना किमान 12 तास दिवसा विजपुरवठा करण्यात यावा.तसेच सोयाबीन उत्पादन सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ मदत जमा करावी याची मागणी केली आहे.

       यावेळी निवेदन देतांना वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष व आंबोली ग्रा.प. सदस्य शुभम मंडपे,एड.सोंडवले,जिल्हा सल्लागार कांबळे सर,एड.नागदेवते सर,शहर अध्यक्ष शालिक थुल,महिला उपाध्यक्षा शीतल सोरदे,वासुदेव गायकवाड,संदीप शंभरकर,निखिल रामटेके,आशिष बोरकर,अस्मित रामटेके,ऋषिकेश मोटघरे,तथागत रामटेके,विनोद येसाबरे,प्रवीण गजभिये,साहिल पठाण,किशोर जांभुळकर, भागवत बोरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.


PostImage

Ramdas Thuse

Sept. 7, 2023

PostImage

पक्षाच्या नावावर सामान्य माणसाची लुटमार करणाऱ्याची चौकशी करा – पत्रकार परिषदेत प्रशांत कोल्हे यांची मागणी


 

चिमूर तालुक्यात काही महिन्या आधी पोलीस पाटील भरती प्रक्रिया पार पडली, त्या पोलीस पाटील भरती प्रक्रियेत अनेक उमेदवारांकडून आर्थिक देवाण घेवाण करून उमेदवार निवडल्याचे आरोप करण्यात आले होते. त्याबाबत शिवसेने कडून सुद्धा पोलीस पाटील भरती प्रक्रियेची चौकशी करण्याबाबत निवेदन सुद्धा देण्यात आले आहे. तसेच माहिती अधिकाराच्या अंतर्गत माहिती मागविली आहे. सदर माहिती प्राप्त होईस्तव शिवसेने कडून करण्यात येणारे आंदोलन स्थगित केले होते.

 

अशातच भाजपाचे तालुका महामंत्री रोषण बन्सोड यांनी इंडिया आघाडीतील आम्हाचा मित्र पक्ष काँग्रेस यांचे कडून रक्षाबंधनाच्या निमित्य चिमूर तालुक्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या विषयावर पोष्ट केली. त्या पोष्टवर प्रशांत कोल्हे व भाजप चे रोषण बन्सोड यांच्यात वैचारिक मांडणी, पोष्ट सुरु होत्या, अशातच पोलीस पाटील भरती प्रक्रियाचा विषय निघाला आणि त्यांनी स्वताच आपल्या पोष्ट च्या माध्यमातून पोलीस पाटील भरती प्रक्रियेत पैशे घेतले आणि काम नाही झाले म्हणून परत पण केले. अशी कबुली त्यांनी ग्रुपवर दिली. त्यातच रोषण बन्सोड हे भाजपाचे पदाधिकारी असून, त्यांच्या फोरव्हीलर गाडीवर भाजपचे कमळाचे चिन्ह काढून अनेकांना गंडा घातल्याचे माहिती आहे. रोषण बन्सोड यांचे किराणा दुकान असून अवैध पणे कोरोना काळात मजा या नावाने असलेला तंबाखू मोठ्या प्रमाणात अव्वाच्या सव्वा किमतीत त्याने विक्री केली. आत्ताच्याही क्षणी हा अवैध व्यवसाय पक्षाच्या नावाने तो करीत आहे.

 

त्यामुळे पोलीस भरती प्रक्रियेत घोटाळा झाल्याची व पक्षाचेच कार्यकर्ते यांची निवड करण्यात आल्याचा आमचा असलेला आरोप यात त्यांच्या स्वकबुलीवरून सत्य वाटते. त्याकरिता शासन प्रशासनाने पक्षाचे नाव घेऊन गोर गरीब जनतेला लुटण्याचे काम करीत असलेला रोषण बन्सोड यांची कसून चौकशी करण्यात यावी. तसेच भाजपच्या पदाधिकार्यांनी सुद्धा रोषण बन्सोड विषयी जनतेसमोर खुलासा सादर करावा. त्यातच रोषण बन्सोड यांनी माझ्यावर सुद्धा sms/srk कंपनी कडून देणेघेणे झाल्याचा आरोप केला, सदर आरोप हा बिनबुडाचा असून कसल्याही प्रकारची आर्थिक देवाण घेवाण झाली नाही. सुरवाती पासून ते शेवट पर्यंत मी स्वताहा या रस्त्यावर लोकांच्या न्याय हक्कासाठी लढत होतो, लढत आहे, आणि लढत राहणार.असे आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रशांत कोल्हे यांनी म्हटले आहे.

यावेळी पत्रकार परिषदेला शिवसेना उपजिल्हाप्रमूख प्रशांत कोल्हे, शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते, शहर प्रमुख नितीन लोणारे, उपतालुका प्रमुख संजय वाकडे,प्रसिध्दी प्रमुख सुनिल हिंगणकर,पुंडलीक सायशे,आदी शिवसैनिक उपस्थित होते.


PostImage

Ramdas Thuse

Sept. 5, 2023

PostImage

Athavale samaj karya mahavidyalay Chimur 30 वा वर्धापन दिन उत्साह साजरा


आज दिनांक 4 सप्टेंबर 2023 सोमवारला सकाळी दहा वाजता महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये तिसावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला आठवले समाजकार्य महाविद्यालयाची स्थापना दिनांक 3 जून 1992 रोजी आदरणीय श्रद्धेय डॉ. चंदनसिंग रोटेले यांनी ग्रामीण भागात, तालुकास्तरावर समाजकार्य महाविद्यालयाची स्थापना केली आज तीस वर्ष पूर्ण होत आहे त्या प्रित्यर्थ महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी सकाळी १० वाजेपासून ते दुपारी ०१ वाजेपर्यंत विविध कार्यक्रम पार पाडले त्यात गीत गायन, डॉन्स वक्तृत्व इत्यादी स्पर्धा उत्साहात साजऱ्या करण्यात आल्या त्यानंतर या संस्थेची नवनियुक्त अध्यक्ष डॉ. केदार सिंग रोटेले यांच्या अध्यक्षतेत तर माननीय किरण ताई रोटेले माजी सिनेट सदस्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर  विद्यापीठ नागपूर तसेच डॉ शुभांगी लुंगे प्राचार्या आ स महा चिमुर, डॉ. सुनील झाडे डॉ. गजानन बनसोड यांची मंचावर उपस्थिती होती यात नवनियुक्त तरुण तडफदार अध्यक्ष  डॉ. केदार सिंग रोटेले यांचा शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यातर्फे शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला त्याचबरोबर किरणताई रोटेले यांचा सुद्धा शाल श्रीफळाद्वारे सत्कार करण्यात आला. मा प्राचार्य डॉ शुभांगी लुंगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक कले  त्यानंतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनातून महाविद्यालयाच्या विकासाकरिता आवश्यक बाबीवर प्रकाश टाकण्यात आला व शेवटी श्रध्देय डॉ. चंदनसिंग रोटेले यांना मौन  श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता केली या कार्यक्रमाचे संचालन प्रा. हेमंत वरघने यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर सुरेश मिलमिले यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले


PostImage

Ramdas Thuse

Sept. 5, 2023

PostImage

जिजाऊ नागरी पतसंस्थेत स्थापना दिवस संपन्न


 

चिमुर येथील जिजाऊ नागरी पतसंस्थेत ५ वा स्थापना दिवस संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष सुभाष शेषकर, सचिव रामभाऊ खडसिंगे, सुचिता भोयर, मंगला वेदी, वंदना शेषकर, व्यवस्थापक मिलिंद जांभुळे, नवाज पठाण, राधिका शेषकर, अमृता श्रीकुंडवार, डॉ. राजु कसारे, भट, सरपंच विजेंद्र घरत तसेच संस्थेचे सर्व कमचारी वृंद उपस्थित होते.

संस्थेचे अध्यक्ष सुभाष शेषकर यांनी मनोगतात सांगितले की, संस्थेत ५ वर्षात स्वतःची तिन मजली इमारत असुन ६ करोडचा ताळेबंद, ३० करोडचा जमाखर्च आहे. पतसंस्थेला ऑडीट वर्षात व दर्जा मिळालेला असुन संस्थेत ८ कर्मचारी, १३ संचालक व ३ तज्ञ संचालक आहेत. संस्था जिल्हा मध्यवर्ती बँक चंद्रपूर, महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे सभासद असुन संस्था विकास व उन्नतीच्या मार्गावर आहे. कार्यक्रमाचे संचालन मंगला वेदी यांनी केले. उपस्थितांचे आभार वर्षा भेटीया यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी जिजाऊ वंदना घेवून केक कापुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


PostImage

Ramdas Thuse

Aug. 31, 2023

PostImage

चंदनखेडा SNAKE FRIENDS FROM CHANDANKHEDA GAVE LIFE TO PYTHON


 

भद्रावती  तालुक्यातील बेलगाव येथे 29 आगस्ट 2023 ला. शेतकरी विरुटकर यांच्या शेतामधी अजगर सर्प दिसताच त्यांनी चंदनखेडा येथील सर्प मित्रांजातिचा 9 फुट 10 किलो वजन असलेला भला मोठा अजगर चंदनखेडा येथील सर्पमित्र विकास गायकवाड.

मयुर नन्नावरे,कुणाल ढोक,विजय खडसंग,अणुप येरणे,श्रीपात, यांच्या सहकार्याने अजगर सर्पला पकडून वनविभाग भद्रावती च्या परवानगीने डिफेन्स मदील सोडुन जीवनदान दिले


PostImage

Ramdas Thuse

Aug. 26, 2023

PostImage

कोव्हीड १९ महामारीवर ग्रामीण परिसरातील मानस शास्त्रीय आणि सामाजिक मध्यस्थी या विषयावर ऑनलाईन सेमीनार


चिमूर:-

आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमुर येथे राज्वररांरीय कोव्हीड १९ महामारीवर ग्रामीण परिसरातील मानस शास्त्रीय आणि सामाजिक मध्यस्थी या विषयावर ऑनलाईन सेमीनॉर घेण्यात आले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. चंदनसिंग रोटेले, प्राचार्य शुभांगी वडस्कर, डॉ. दिपा बालखंडे, डॉ. सुमेधा वानखेडे, डॉ. सुदर्शन खापर्डे, प्रा. शिल्पा गणवीर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी १२३ मान्यवर ऑनलाईन प्रणालीमध्ये उपस्थित झाले होते. मोठया उत्साहात सेमीनार संपन्न झाला.


PostImage

Ramdas Thuse

Aug. 26, 2023

PostImage

व्यवसाय मार्गदर्शन आणि कौशल्य विकास या विषयावर वर्क शॉप संपन्न


 

चिमूर:-

महाराष्ट्र शासन व आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमुरच्या विद्यमाने महाविद्यालयात व्यवसाय मार्गदर्शन व कौशल्य विकास या विषयावर एक दिवशीय मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली. त्यात ११ सहभागी विद्यार्थ्यांना उपस्थित डॉ. सुदर्शन खापर्डे यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेला महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.


PostImage

Ramdas Thuse

Aug. 25, 2023

PostImage

आ.कीर्तीकुमार भांगडीया यांचा तेलंगणा राज्यात दौरा


 

 दिनांक 25 ऑगस्ट ला चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्ती कुमार भांगडीया यांच्या तेलंगणातील शिरपूर कागज नगर येथील कवठाळा मंडळातील तुमडीहेटी येथे प्राणहिता नदीचे भक्तिभावाने पूजन करून श्री शिववशंकराचे दर्शन घेतले. त्यानंतर, भाजपा कवठाळा मंडळ स्तरीय बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मंडळातील विविध मुद्द्यांवर आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. तसेच, उपस्थितांना सरल/नमो ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले.त्यानंतर मंडळातील भाजपा शक्ती केंद्र प्रमुख व बूथ अध्यक्ष यांच्याशी संघटनात्मक बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण विषयांवर संवाद साधला.

यावेळी सर्वश्री भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. श्रीनिवास, विधानसभा संयोजक गोलापल्ली विरभद्रा चॅरी, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारी सदस्य गोलेम व्यंकटेशम, भाजपा नेते डॉ. हरीश बाबू, अरुण लोया, जक्कम तिरुपती, भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजूभाऊ देवतळे, भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश सचिव मनिष तुंम्पल्लीवार, टिमु बलदुवा, माजी सभापती/नगरसेवक न.प. चिमूर सतीश जाधव, भाजपा अनुसूचित जमाती आघाडी चिमूर तालुकाध्यक्ष गजानन गुडधे व सिरपूर, कागजनगर समस्त भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

Ramdas Thuse

Aug. 24, 2023

PostImage

मतदार जनजागृती तथा नव मतदान नोंदणी अभियान कार्यक्रम संपन्न


आठवले समाजकार्य महाविद्यालय शेडेगाव कॅम्पस येथे दिनांक २४ ऑगस्टला तहसील कार्यालय चिमूर चे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या सूचनेनुसार राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मतदार जनजागृती तथा नव मतदान नोंदणी अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. शुभांगी वडस्कर, अतिथी निशिकांत मेहरकुरे, पर्यवेक्षक सचिन कापसे (शिक्षक ) बी. एल. ओ. यांच्या उपस्थितीत कार्यक्रमांची सुरुवात झाली.निशिकांत मेहरकुरे ( शिक्षक ) यांनी मतदारांनी जागरूक राहावे व मतदानापासून वंचीत राहू नये यासाठी प्रयत्न करावे असे मत मांडले.सचिन कापसे (शिक्षक ) बी. एल.ओ.या नात्याने विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून घेतले.. महाविद्यालयच्या प्राचार्य डॉ.वडस्कर यांनी समाजकार्याच्या विद्यार्थ्यांनी क्षेत्र कार्याच्या माध्यमातून परिसरात जनजागृती करावी असे मौलिक मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. सी.जे.खंगार कार्यक्रम अधिकारी रा.से.यो.यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ.प्रीती दवे यांनी केले. कार्यक्रमांची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.


PostImage

Ramdas Thuse

Aug. 24, 2023

PostImage

विद्यार्थ्यासाठी काँग्रेस सरसावली


 

   चिमूर ताक्यातील अनेक गावात अनियमित बस फेऱ्या येत असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले असून याची दखल घेत काँग्रेस सरसावत चिमूर बस आगार प्रमुख यांना निवेदन देत बस फेऱ्या वाढविण्याची मागणी काँग्रेस तालुका अध्यक्ष डॉ .विजय गावंडे पाटील व राजू कापसे यांनी केली आहे. 

         चिमूर कांपा मार्गावरील सिरस्पुर,शिवरा, कवडशी (डाक), मेटेपार, मांगलगाव,पिंपळगाव , कोटगाव,जांभूळघाट, पारडपार, आंबेनेरी, मालेवाडा,सावरगाव, कारघाटा ,उमरी ,खरकाडा, गडपिपरी येथील जवळपास २०० विद्यार्थी विद्यार्जन साठी येत असून मात्र बस फेऱ्या वेळे वर येत नसल्याने विद्यार्थ्याना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर विद्यार्थ्याना ताटकळत उभे राहावे लागत आहे.मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. विद्यार्थ्याना शिक्षण मिळावे यासाठी चिमूर तालुका काँग्रेस ने दखल घेवून प्रत्यक्ष कार्यकर्त्यांसह बस आगार प्रमुख यांचेशी भेट घेवून निवेदन दिले. 

बस आगार प्रमुख यांना निवेदन देत असताना काँग्रेस तालुका अध्यक्ष डॉ .विजय गावंडे पाटील,माजी पस सदस्य राजू कापसे, माजी जीप सदस्य तथा काँग्रेस ओबीसी विभाग तालुका अध्यक्ष विलास डांगे,शहर काँग्रेस अध्यक्ष अविनाश अगडे ,मिडीया प्रमुख पप्पूभाई शेख,तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष नांगेद्र चट्टे , जेष्ठ काँग्रेस नेते केशवरावजी वरखेडे,धनराजजी मालके तालुका उपाध्यक्ष राजु चौधरी,देवानंद गावंडे,छतृगण पराते,बापूराव घोडमारे,घनश्याम रामटेके,भाऊजी टेकाम,जाबिर कुरेशी,मसूद इस्माईल शेख,शहनाज शेख आदी उपस्थित होते.


PostImage

Ramdas Thuse

Aug. 22, 2023

PostImage

बालाजी कोहचाडे यांची चिमूर तालुका आदिवासी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती


 

        अखिल भारतीय आदिवासी काँग्रेसच्या मान्यतेने महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष डॉ नामदेव उसेंडी यांनी चिमूर तालुका आदिवासी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदी बालाजी कोहचाडे यांची सोमवार ला प्रसिद्धी पत्रकाव्दारे नियुक्ती केली आहे.

        काँग्रेस विचारधारा व गांधी घराण्याचे नेतृत्व हेच आदिवासींना न्याय देवू शकतात म्हणून प्रत्येक आदिवासी बांधवांना जोडण्याचे काम करावे काँग्रेस पक्ष मजबूत झाल्यास आदिवासी सुरक्षीत राहतील करिता महाराष्ट्र राज्यातील काँग्रेस पक्षाच्या इतर संघटने सोबत समन्वय साधून आदिवासी काँग्रेसचे कार्य वाढवावे असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. त्यांच्या या नियुक्तीने राज्य विधान सभा चे विरोधी पक्ष नेता यांचे स्वीय सहायक सुधीर पंदीलवार व चिमूर तालुका काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ता यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा देवून अभिनंदन केले आहे.


PostImage

Ramdas Thuse

Aug. 20, 2023

PostImage

रेल्वे फाटक ते रेल्वे स्टेशन पर्यंतचा रस्तावर खड्डेच खड्डे


 

मूल शहरातील रेल्वे फाटक ते रेल्वे स्टेशन पर्यंतचा रस्ता कित्येक दिवसांपासून संपूर्ण उघडला असून रोडावर खड्डेच खड्डे पडले आहे, त्यामुळे नागरिकांना, ऑटो चालकांना, तसेच स्थानिक रेल्वे कॉटर मध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या परिवाराला ये-जा करायला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे रोडावरून जाताना खराब रस्त्यामुळे रेल्वेस मुकावे लागत आहे. रोज ये जा करणाऱ्या ऑटो चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. ऑटो लवकर खराब होत असून पेट्रोल सुद्धा जास्त प्रमाणात लागत आहे, त्यामुळे आर्थिक भुरदंड ऑटो चालकांना बसत आहे. त्यामुळे रेल्वे टेशन रोडाचे काम त्वरित करण्याची मागणी ऑटो चालक आणि नागरिकांनी केलेली आहे. 


PostImage

Ramdas Thuse

Aug. 18, 2023

PostImage

एक संघ लढ्यातून काँग्रेस "क्रांतीभूमीत ' तिरंगा फडकविणार - विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार चिमूर"क्रांतीभूमीतील शहिदांना' वाहिली श्रद्धांजली


 

 

16 ऑगस्ट हा देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाला कलाटणी देणारा दिवस आहे. महात्मा गांधींनी इंग्रजांना चले जावचा नारा दिल्यानंतर संपूर्ण देशात "करो या मरो' अशी परिस्थिती निर्माण होऊन स्वातंत्र्याच्या मोठया उठावास सुरुवात झाली. याच काळात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या क्रांतिकारक भजनाने प्रेरित होऊन 1942 साली चिमुरात क्रांतीची मशाल हाती घेऊन येथील वीरांनी प्राणाची आहुती देत चिमूरला सर्वप्रथम स्वातंत्र्य मिळवून दिले. हा इतिहास देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिल्या गेला. सलग दहा वर्षे या क्रांती भूमीची आमदार म्हणून सेवा करण्या करिता मिळालेल्या सेवा संधीमुळे या मातीशी माझी नाळ जुळली आहे. येथील वीर शहिदांना अभिवादन करण्यासाठी मला कोणीही रोखू शकत नाही. सोबतच संपूर्ण काँग्रेस एक संघ होऊन या क्रांती भूमी तिरंगा फडकविणार असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते आ.विजय वडेट्टीवार यांनी केले. ते चिमूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

याप्रसंगी प्रामुख्याने माजी आमदार, प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आदिवासी विभाग डॉ .नामदेव उसेंडी, चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्र निरीक्षक, डॉ.नामदेव किरसान, महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी डॉ. अविनाश वारजूकर, प्रदेश संघटक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग, धनराज मुंगले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ सतिष वारजूकर, जिल्हा काँग्रेस महासचिव गजानन बुटके, राम राऊत , संजय डोंगरे , काँग्रेस अनुसूचित जाती सेलचे प्रफुल खापर्डे,तालुका अध्यक्ष विजय गावंडे, प्रमोद चौधरी, संदीप कावरे , कृष्णा तपासे , राजू लोणारे माधव बाबू बिरजे, उमेश हिंगे,कल्पना इंदुरकर , रीता अंबाडे मंचावर उपस्थित होते.

 

यावेळी पुढे बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, आर एस एस सारख्या मनुस्मृति विचारांच्या शक्तीने देशाच्या राष्ट्रध्वजाचे महत्व कमी करण्याचा प्रकार सुरू आहे. एकीकडे देशाचे पंतप्रधान राष्ट्रध्वज फडकवीत असताना दुसरीकडे मात्र देशद्रोही मनोहर भिडे सारख्या कडून तिरंगा ऐवजी दुसरा ध्वज फडकवा असा समाजात तेढ निर्माण करणारा विषारी संदेश पसरविल्या जात आहे. देशाला जीवन समर्पित करून बलिदान देणाऱ्या महापुरुषांचा अवमान करणाऱ्या या देशद्रोही भिडेला तुरुंगात डांबण्या ऐवजी गुरुजी म्हणून सत्ताधारी विद्यार्थी सन्मान करीत आहेत. महात्मा गांधींच्या विचारांची महानता या मनुस्मृति वाद्यांना काय कळणार ? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. तर देशात पंतप्रधान मोदींनी हुकुमशाही धोरण लावण्यासाठी स्वायत संस्थांचा वापर करून पक्ष फोडाफोडींचे राजकारण सुरू केले आहे. राजकारणासाठी देवांच्या नावांचा वापर करून समाजाला जाती जातीत विभागले जात आहे यामुळे देशाची एकात्मता धोक्यात आली असून 2024 ची स्वातंत्र्याची दुसरी लढाई साठी सर्वांनी सज्ज राहून राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी करावी असेही विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार प्रतिपादन यांनी केले.

-------------------------------

 चिमूर क्रांतीचा इतिहास अजरामर - वडेट्टीवार

 16 आगस्ट चिमूर क्रांती दिनी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी चिमूर येथील हुतात्मा स्मारक येथे येऊन चिमूर क्रांतीतील शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी बोलतांना विरोधी पक्षनेते आ. सेवडेट्टीवार म्हणाले की सन 1942 साली देशातील चिमुरात क्रांतीची पहिली ठिणगी पेटली. यात शहीद वीर क्रांतिकारक बालाजी रायपूरकर व त्यांच्या साथीदारांनी हाती शस्त्र नसताना देखील शस्त्रधारी इंग्रज अधिकाऱ्यांशी लढा दिला. या लढ्यात अनेक तरुणांना वीरमरण आले. हा चिमुरचा क्रांतिकारी इतिहास स्वातंत्र्याच्या लढाईच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिल्या गेला असून तो सदैव अजरामर राहील. असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.


PostImage

Ramdas Thuse

Aug. 18, 2023

PostImage

चिमुरात विरोधी पक्षनेते नामदार विजय वडेट्टीवार व चिमूर तालुका काँग्रेस कमिटी यांच्या पुढाकाराने कॅन्सर तपासणी शिबीर संपन्न


 

 वाढत्या कॅन्सर आजाराला आळा घालण्यासाठी, वर्षभरात किमान ३०० रुग्णांचे प्राण वाचविण्याचे ध्येय पुढे ठेवून "जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा" हे ब्रीद घेवुन २० टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारण करीत रुग्णसेवेचा ध्यास घेतलेले माजी मंत्री तथा महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते नामदार विजय वडेट्टीवार यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात प्रथमच टेलिमेडिसीन तंत्रज्ञान युक्त फिरता दवाखाना व कॅन्सर निदान केंद्र सुमारे अडीच कोटी रुपये खर्च करून प्रगत तंत्रज्ञान युक्त राज्यातील पहीले अत्याधुनिक, कॅन्सरचे निदान करणारे फिरते हाॅस्पिटल जनतेच्या सेवेत राज्याचे माजी मंत्री तथा विरोधी पक्षनेते, नामदार विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने समर्पित करण्यात आले आहे.

या फिरत्या कॅन्सर तपासणी हाॅस्पिटलच्या माध्यमातून कॅन्सर तपासणी शिबिर गुरुवार दि. १७ आॅगस्ट रोजी चिमूर येथील हुतात्मा स्मारक येथे आयोजित करण्यात आले होते. सदर शिबीरात शेकडो रुग्णांनी आपली मोफत तपासणी करून घेतली.

सदर तपासणी शिबीराला ७४, चिमूर विधानसभा समन्वयक तथा माजी जि. प. अध्यक्ष डॉ. सतिश वारजूकर, ओबीसी प्रदेश संघटक धनराज मुंगले, कॉंग्रेस कमेटीचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी जि. प. सदस्य गजानन बुटके, चिमूर तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष डॉ. विजय गावंडे, शहर अध्यक्ष अविनाश अगडे, कृषी उत्पन्न बाजार समिती चिमुरचे संचालक भरत बंडे, देवानंद गावंडे, प्रदीप तळवेकर, नागेंद्र चट्टे, पप्पुभाई शेख, सुधीर जुमडे, रत्नाकर विटाळे, इंजि. शुभम बोबडे, इम्रानभाई शेख, बालाजी कोयचाडे, मधुकर मुंगले, शामराव अंबादे, गुरू जुनघरे, रामदास ठुसे आदी व काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. तपासणी शिबिराच्या यशस्वितेसाठी शिबीर समन्वयक तथा जनसंपर्क अधिकारी सुधिर पंदीलवार यांनी सहकार्य केले.


PostImage

Ramdas Thuse

Aug. 18, 2023

PostImage

शहीद स्मृतिदिनानिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन


 

खासदार अशोक नेते आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांच्या हस्ते १६ ऑगस्ट रोजी शहीद स्मृतिदिनानिमित्त चिमूर नगरपरिषद क्षेत्रातील कोट्यवधी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

केंद्र शासन पुरस्कृत योजना जलजीवन मिशनअंतर्गत 'हर घर नल, हर घर जल' या योजनेच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी खासदार अशोक नेते म्हणाले की, पाणी हे जीवन आहे. पाण्यासाठी अनेक गावांतील शहरातील नागरिकांना भटकंती करावी लागत होती. परंतु विहिरी, बोरवेलद्वारे शुद्ध पाणी मिळत नव्हते. यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर नल योजना आणली. नागरिकांचे जीवनमान सुधारणे हा या योजनेचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार भांगडिया म्हणाले, माझ्या प्रयत्नाने नगरातील विकास कामे झाली. त्यांचे भूमिपूजन होत आहे. या नगरातील वॉर्डामध्ये अनेक प्रश्न, समस्या होत्या. जनतेच्या समस्या, प्रश्न, अडीअडचणी सोडविण्याचा माझा प्रयत्न आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा समजून मी हे काम करीत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी विविध कामांचे भूमिपूजन करण्यात आले. या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी खासदार अशोक नेते आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांच्यासमवेत विविध मान्यवरांनी सर्वप्रथम थोर महात्म्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पूजन करून विनम्र अभिवादन केले. तसेच विविध भूमिपूजनस्थळी कुदळ मारत व विकासकामांच्या फलकाचे अनावरण करत बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी न.प मुख्याधिकारी डॉ. सुप्रिया राठोड व अन्य प्रशासकीय अधिकारी तसेच भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते..


PostImage

Ramdas Thuse

Aug. 14, 2023

PostImage

दरवाजे चोरी होने से 1200 हेक्टयर फसल संकट में


 

चिमुर तहसील के मासल (बु.) व नंदारा गाव के करीब 1200 हेक्टर मे धान की फसल को सिंचने वाले एकमात्र स्त्रोत से भी किसानो को इस वर्ष पानी से वंचीत रहने की नौबत आई है. मासल से सटकर बहनेवाले नाले पर बनाए गये बांध के लोहे के सभी दरवाजे चोरी हो गये है. जिससे धान की फसल पर गहरा संकट मंडरा रहा है. फसल को सिचने के लिये अब किसान बारीश का इंतजार कर रहे है. लेकीन उम्मीद का नक्षत्र कहे जाने वाले अश्लेषा नक्षत्र मे बारीश नदारद रहने से किसान हलाकान होकर फसल को तबाह होता देख बेबस नजर आ रहा है.

          वसंतराव गोडबोले कोल्हापुरी बांध नामक बांध का निर्मान इसी वर्ष ग्रिष्मकाल मे किया गया. इस बांध ने 1978 से परिसर के किसानो को सिंचाई का पानी दिया है. पुराना बांध जिर्ण हो जाने से उसे निर्लेखीत कर नये बांध का निर्माण विधायक भांगडीया के प्रयासो से किया गया.पहले के बांध मे लोहे के दरवाजे स्वयंचलीत थे जो जादा पानी जमा होने पर खुल जाते व पानी का स्तर कम होने पर बंद होते थे. इतना ही नही बांध की दिवाल मे स्थापीत किए गये थे. आधूनिक इंजीनिअरो ने मनुष्य बल से बाहर निकलने वाले दरवाजे लगाए लेकीन यह तकनिक चोरो के लिये आसान शिकार साबीत हुई. नतीजतन चोरो सभी दरवाजो पर हाथ साफ कर लिया. अब किसान विधायक की कृपा पर आस लगाए बैठा है. मामले की शिकायत पुलीस मे भी की गई है लेकीन पुलीस भी चोरो का पता लगाने मे नाकाम रही है. समय रहते बांध को रोका नही गया तो 1200 हेक्टर की धान फसल चौपट होना तय है. प्रशासन से शिघ्र कदम उठाने की मांग किसान कर रहे है.


PostImage

Ramdas Thuse

Aug. 12, 2023

PostImage

 १५ ऑगस्टला घोडाझरी पर्यटन स्थळ राहणार बंद! सुरक्षेच्या दृष्टीने वनविभागाने घेतला निर्णय


 

 प्रशासनाने सुरक्षा पुरविण्यास असमर्थता दर्शविल्याने तसेच किटाळी ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार १५ ऑगस्ट २०२३ रोजी घोडाझरीचे प्रवेशद्वार बंद ठेवण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. तसे परिपत्रक विभागाने जारी केले आहे.

 

पावसाळ्यात घोडाझरी तलावाचे अनेकांना आकर्षण असते. तलाव ओव्हरफ्लो झाला की या आकर्षणाला पारावार उरत नाही. मात्र, ओव्हरफ्लो असो की नसो, १५ ऑगस्टला पर्यटक घोडाझरीवर हमखास गर्दी करीत असतात. मात्र, या पर्यटकांच्या गर्दीने काही प्रश्नही निर्माण होत असतात. गर्दीतील पर्यटक राखीव जंगलात जाऊन प्लास्टिक आणि कचरा फेकण्याची शक्यता असून त्यामुळे वन्यप्राण्यांना इजा होऊ शकते. शिवाय या जंगलात वन्यप्राणी मोठ्या प्रमाणावर असल्याने पर्यटकांवर वन्यप्राणी हल्ला करू शकतात, असे वनविभागाला वाटत आहे. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होणार आहे.

 

 


PostImage

Ramdas Thuse

Aug. 12, 2023

PostImage

खासदार अशोक नेते यांची ख्रिस्तांनद हॉस्पिटल ब्रह्मपुरी येथे भेट


 

 चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोक नेते हे दिल्ली अधिवेशन आटपून गडचिरोली ला येत असतांना ब्रह्मपुरी येथील माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर यांनी भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते तथा ब्रह्मपुरी विधानसभेचे सोशल मीडिया संयोजक अविनाश मस्के हे काल दिनांक ११ ऑगस्ट २०२३ ला रात्री १०.०० वा.च्या दरम्यान घरी झोपेला आराम करायला खाटेवर जात असतांना घरच्या फरशीच्या खाली अचानक पणे विषारी सापाने सर्पदंश केल्याने त्यांना ख्रिस्तांनद हॉस्पिटल ब्रह्मपुरी येथे भरती करण्यात आले. यासंबंधीची संपुर्ण माहिती माजी आमदार प्रा.अतुलभाऊ‌ देशकर यांनी खासदार अशोक नेते यांना दिली असता लगेच याविषयी तात्काळ गांभीर्यपूर्वक लक्षवेधुन खासदार अशोक नेते यांनी ख्रिस्तांनद हॉस्पिटला जाऊन भेट घेतली व त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत हॉस्पिटलचे मेन इन्चार्ज फादर यांच्यासोबत सुद्धा चर्चा करून त्यांच्या तब्येतीची काळजी व आरोग्याची काळजी घेणेसंबंधी खासदार अशोक नेते यांनी सूचना केल्या.

त्यावेळी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोक नेते,माजी आमदार तथा लोकसभा संयोजक प्रा. अतुल भाऊ देशकर,शहर अध्यक्ष अरविंद नंदूरकर, साकेत भानारकर, युवा मोर्चा जिल्हा सचिव तनय देशकर, प्रा. अशोक सळवंतकर, मोरेश्वर मस्के, धीरज पाल,उपस्थिती होते.


PostImage

Ramdas Thuse

Aug. 12, 2023

PostImage

बुद्धविहाराच्या जीर्णोद्धारासाठी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा कडून आर्थिक मदत


अहेरी नगरपंचायत क्षेत्रातील बुद्ध विहाराच्या जीर्णोद्धारासाठी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी पुढाकार घेऊन ज्ञानप्रसारक नवयुवक मंडळाच्या सदस्यांना नवीन बुद्ध विहाराच्या बांधकामासाठी आर्थिक मदत सुपूर्द केली आहे.अहेरी नगरपंचायत परिक्षेत्रात अहेरी शहर हे खूप मोठे असून या शहरात बौद्ध समाज बांधवांची संख्या खूप जास्त असून या ठिकाणी बौद्ध समाज बांधवांतील उपासक व उपासिकांना एकत्र येऊन प्रार्थना करण्यासाठी जीर्ण झालेले खूप जुने बुद्ध विहार होते.अहेरी येथील ज्ञानप्रसारक नवयुवक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन जीर्ण झालेले बुद्ध विहार ला निर्लेखीत करून अहेरी शहरात भव्य बुद्ध विहार बांधकाम व सुशोभिकरण करण्याचे नियोजन करून काम सुरू केले आहे.या बांधकामाचा नियोजन मोठा असल्याने मंडळाचे सदस्यांनी आविसं अजयभाऊ मित्र परीवाराचे विदर्भ नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांची अहेरी येथील जनसंपर्क कार्यालय येथील भेट घेऊन सुरू असलेले बुद्ध विहार बद्दल माहिती देऊन सहकार्याची विनंती केले असता माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी तात्काळ आर्थिक मदत करून पूढे पण बौद्ध समाज मंदिरासाठी यापूडे ही आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी ज्ञानप्रसारक नवयुवक मंडळाचे अध्यक्ष तथा मंडळ अधिकारी एकनाथ चांदेकर,परशुराम दाहागावकर,शामभाऊ ओंडरे,मिलिंद अलोने,रोहित ओंडरे,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी,दिलीप मडावी सरपंच,राजेश पोरेड्डीवार,नितीन पुल्लूरवार वांगेपल्ली उपस्थित होते.


PostImage

Ramdas Thuse

Aug. 12, 2023

PostImage

बुद्धविहाराच्या जीर्णोद्धारासाठी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा कडून आर्थिक मदत


अहेरी नगरपंचायत क्षेत्रातील बुद्ध विहाराच्या जीर्णोद्धारासाठी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी पुढाकार घेऊन ज्ञानप्रसारक नवयुवक मंडळाच्या सदस्यांना नवीन बुद्ध विहाराच्या बांधकामासाठी आर्थिक मदत सुपूर्द केली आहे.अहेरी नगरपंचायत परिक्षेत्रात अहेरी शहर हे खूप मोठे असून या शहरात बौद्ध समाज बांधवांची संख्या खूप जास्त असून या ठिकाणी बौद्ध समाज बांधवांतील उपासक व उपासिकांना एकत्र येऊन प्रार्थना करण्यासाठी जीर्ण झालेले खूप जुने बुद्ध विहार होते.अहेरी येथील ज्ञानप्रसारक नवयुवक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन जीर्ण झालेले बुद्ध विहार ला निर्लेखीत करून अहेरी शहरात भव्य बुद्ध विहार बांधकाम व सुशोभिकरण करण्याचे नियोजन करून काम सुरू केले आहे.या बांधकामाचा नियोजन मोठा असल्याने मंडळाचे सदस्यांनी आविसं अजयभाऊ मित्र परीवाराचे विदर्भ नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांची अहेरी येथील जनसंपर्क कार्यालय येथील भेट घेऊन सुरू असलेले बुद्ध विहार बद्दल माहिती देऊन सहकार्याची विनंती केले असता माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी तात्काळ आर्थिक मदत करून पूढे पण बौद्ध समाज मंदिरासाठी यापूडे ही आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी ज्ञानप्रसारक नवयुवक मंडळाचे अध्यक्ष तथा मंडळ अधिकारी एकनाथ चांदेकर,परशुराम दाहागावकर,शामभाऊ ओंडरे,मिलिंद अलोने,रोहित ओंडरे,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी,दिलीप मडावी सरपंच,राजेश पोरेड्डीवार,नितीन पुल्लूरवार वांगेपल्ली उपस्थित होते.


PostImage

Ramdas Thuse

Aug. 12, 2023

PostImage

कॅन्सर ग्रस्त महिलेला माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची कॅन्सरग्रस्त महिलेला आर्थिक मदत


 

अहेरी  तालुक्यातील छल्लेवाडा येथील श्रीमती.सुभद्रा बानेश सोदारी काही दिवसांपासून कॅन्सर झालेल आहेत.रुग्णालयातील सर्व खर्च निशुल्क करण्यात येईल परंतु लागणारे मेडिकल मधून औषधी घेणे हे त्यांना शक्य होत नसल्याची माहिती गावातील नागरिक तसेच कार्यकर्त्यांन कडून आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प अध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती होतच आज त्यांच्या गावातील त्यांना भेट घेऊन.कॅन्सरग्रस्त रुग्ण श्रीमती.सुबध्रा बाणेश सोदरी यांना औषधोपचार करण्याकरिता आर्थिक मदत करण्यात आली.त्यावेळी अजयभाऊंनी सांगितली की पुढील कोणत्याही समस्या असो मला सांगा मदत करण्यासाठी मी तयार अहो असे गावातील नागरिकांना व रुग्णना सांगितले 

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम,माजी पंचायत समिती सभापती भास्कर भाऊ तलांडे,माजी पंचायत समिती सभापती सुरेखा आलाम,अहेरी नगरपंचायत नगरसेवक प्रशांत गोडशेलवार,सरपंच लक्ष्मी मडावी,सरपंच श्रीनिवास पेंदाम,नरेंद्र गर्गम,राकेश सडमेक, ग्रामपंचायत सदस्य पूजा देवगडे,ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण कोडापे,गुलाब देवगडे,रामचंद्र रामटेके,तेजराज दुर्गे,दासू कांबळे,विलास बोरकर,लक्ष्मण रत्नंम,मोंडी कोटरंगे,राकेश सडमेक,प्रमोद गोडशेलवारसह गावातील नागरिक व आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधीकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

Ramdas Thuse

Aug. 12, 2023

PostImage

ग्रामगीता महाविद्यालयात डॉ.एस.आर.रंगनाथन जयंती साजरी


भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या कार्याचा गुणगौरव करण्यासाठी ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे त्यांच्या जयंती दिनाचा कार्यक्रम, ग्रंथालय विभागामार्फत आयोजित करण्यात आला होता डॉ. एस. आर. रंगनाथन यांचे कार्य ग्रंथालय शास्त्राच्या प्रगतीसाठी बहुमूल्य असून त्यांच्या योगदानासाठी भारत सरकारने सुद्धा त्यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित केले आहे. असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अमीर धमानी यांनी व्यक्त करत, महाविद्यालय ग्रंथसंपदा वाढविण्यासाठी अविरत प्रयत्न करत आहे आणि विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील ज्ञानसंपदेचा भरपूर वापर करावा व असे आव्हान केले. 

या कार्यक्रमानिमित्त मंचावर उपस्थित वक्ते प्रा. रोहित चांदेकर यांनी भारतीय प्राचीन ग्रंथसंपदा व भारतीय बौद्धिक संपदा या विषयावर विस्तृत असे मार्गदर्शन करून भारताला प्राचीन काळापासूनच ग्रंथालयाची परंपरा आहे असे मत व्यक्त केले. तर डॉ. बिजनकुमार शील यांनी सुद्धा मार्गदर्शन करत असतांना विद्यार्थ्यांनी कोणताही न्यूनगंड न ठेवता आपल्या ज्ञानात भर घालण्याकरिता ग्रंथांची साथसोबत केली पाहिजे व भविष्यातील येणाऱ्या कोणत्याही बौद्धिक आव्हानाला पेलण्यासाठी समर्थ झाले पाहिजे. आजच्या स्पर्धात्मक युगात ग्रंथ वाचनाचे अनेक फायदे असून त्यावर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे असे मत व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आयोजन ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा. संदिप मेश्राम यांनी केले तर मार्गदर्शन व आभार प्रदर्शन डॉ. निलेश ठवकर यांनी केले. या कार्यक्रमाला प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.


PostImage

Ramdas Thuse

Aug. 11, 2023

PostImage

पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना मारहाण करणाऱ्या आमदारावर कार्यवाही करा.. - व्हॉईस ऑफ मीडिया चिमूरची मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे मागणी..


 

     जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना झालेल्या मारहानी बाबत आमदार किशोर पाटील यांचेवर कार्यवाही करण्याबाबत व्हॉईस ऑफ मीडिया चिमूरच्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी चिमूर यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले

       लोकप्रतिनिधींनी संयम बाळगून आपले कर्तव्य बजावणे अपेक्षित आहे. मात्र लोक्रप्रतिनिधींकडून पत्रकारावर हमला होणे ही हुकूमशाही आहे.जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना आमदार किशोर पाटील यांनी दूरध्वनी द्वारे अवाच्या शिवागाळी करून लोकप्रतिनिधी व त्यांच्या समर्थकांनी भर चौकात मारहाण केली.पत्रकार संदीप महाजन यांचेवर झालेला भ्याड हल्ला हा निंदनीय आहे.पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा व्हॉईस ऑफ मीडिया चिमूरच्या वतीने निषेध करण्यात आला. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आमदार किशोर पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी कार्यवाही न झाल्यास व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल. अशी मागणी चिमूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर घाडगे यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

      यावेळी व्हॉईस ऑफ मीडिया चिमूर तालुका अध्यक्ष रामदास हेमके तालुका सचिव भरत बंडे जिल्हा कार्याध्यक्ष संपादक सुरेश डांगे व्हॉइस ऑफ मीडिया चिमूर तालुका प्रसिद्ध प्रमुख रामदास ठुसे,संपादक राम चीचपाले जितेंद्र सहारे जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रमोद राऊत,विलास कोराम,जिल्हा सहसरचिटणीस श्रीहरी सातपुते,योगेश सहारे, फिरोज पठाण,कलीम शेख. उमेश शंभरकर,योगेश अगडे व व्हॉईस ऑफ मीडियाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते


PostImage

Ramdas Thuse

Aug. 10, 2023

PostImage

महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीच्या चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष पदावर प्रकाश मेश्राम यांची निवड


 

       नागपूर येथील डॉ बाबा साहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह विदर्भ विभागीय कलावंत दिशादर्शक मेळावा आयोजीत करन्यात आला होता कार्यक्रमाचे अध्यक्ष माणिक खोब्रागडे, उद्घाटक अभिनेते रमेश जाधव तर प्रमुख अतिथी संस्थापक अध्यक्ष गायक सोमनाथ गायकवाड महासचिव अड श्याम खंदारे, विदर्भ प्रमुख मनोहर शहरे सारिका उराडे , नागपूर शहर जयंत साठे यांच्या उपस्थित प्रकाश मेश्राम यांची महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीच्या चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष पदावर निवड करण्यात आली. 

          कवी प्रबोधनकार लेखक साहीत्यीक प्रकाश मेश्राम हे ग्रामीण भागात राहत असून भजन, गायन, प्रबोधन, साहित्य कला, ईत्यादी सांस्कृतिक कला माध्यमातून महापुरुषांचे प्रबोधनात्मक विचार गावोंगावी जावून मांडत असतात जुन्या रूढी परंपरांना मूठमाती देत शासनाच्या कल्याणकारी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व कलावंतांना न्यायहक्क मिळवून देण्यासाठी संघर्षरत कार्य करित असल्यामूळे (वादळ निळ्या क्रांतीचे) ही निवड करण्यात आली आहे त्यांच्या या निवडी ने परिसरातील नागरीकांनी अभिनंदण केले आहे.