STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
13-03-2024
चिमूर:-
गांधी सेवा शिक्षण समिती द्वारा संचालित स्थानिक राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय येथे महिला अध्ययन विस्तार सेवा केंद्रांद्वारे जागतिक महिला दिनानिमित्त चिमूर तालुक्यातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यातआला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष गांधी सेवा शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ दिपक यावले हे अध्यक्षस्थानी होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात विविध क्षेत्रातील महिलांचे सक्षमीकरण अधोरेखीत केले.सचिव प्रा विनायकराव कापसे कोषाध्यक्ष मारोतराव भोयर उपस्थित होते. या वेळी प्राचार्य डॉ आश्विन चंदेल यांनी या कार्यक्रमाची संकल्पना मांडली. तसेच चिमूर तालुक्यातील महिलांचा गौरव केला. प्रसंगी दंतचिकित्सक डॉ. शोभा चाफले, डॉ. लता मेश्राम वैष्णवी सौ माधवी मधुसुदन नाईक, यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सामाजिक कार्यकर्त्या सौं.विद्याताई कापसे डॉ लीना झाडे मंचावर उपस्थित होत्या. चिमूर तालुक्यातील सामाजिक वैद्यकीय व अन्य क्षेत्रात कर्तृत्वाची भरारी घेणाऱ्या सौ सखुबाई खडसे, सौ लताबाई बेसरे, सौ माधुरी हेमके, सौ गीताबाई बनकर, सौ एकादशी मोहीनकर, सौ कला गेडाम सौ आशा जुमनाके ,सौ.अनिता टेंभूरकर यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक उप - प्राचार्य लेप्टनंट डॉ प्रफुल बनसोड यांनी केले.सूत्रसंचालन प्रा संतोषी दिघोरी तर आभार महिला अध्ययन विस्तार सेवा केंद्राचे डॉ. लक्ष्मण कामडी यांनी केले. या कार्यक्रमास प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिला.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments