संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
06-10-2024
Gadchiroli News: घोट येथून जवळ असलेल्या हळदवाही येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, जिथे पतीने पत्नीवर चाकूने सपासप वार करून तिला गंभीर जखमी केले आहे. या घटनेने संपूर्ण गावात खळबळ माजली आहे. आरोपी महेश रूषी नैताम (वय २८, रा. दिभना, ता. गडचिरोली) याला घोट पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.
महेश नैताम हा नेहमीच दारूच्या नशेत पत्नीला मारझोड व शिवीगाळ करायचा. त्यामुळे पत्नी डिंपल महेश नैताम काही दिवसांपासून माहेरी, हळदवाही येथे राहत होती. मात्र, पतीचा राग शांत न होता, महेश आपल्या सासुरवाडीत पोहोचला. "तू सासरी का येत नाहीस?" असे विचारताच त्याने रागाच्या भरात चाकू काढला आणि डिंपलच्या पोटावर वार केले. डिंपल गंभीर जखमी झाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच घोट पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला आणि आरोपी पतीला अटक करण्यात आली. ३ ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर केले असता, आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा तपास घोट पोलिस मदत केंद्राचे सहायक पोलिस निरीक्षक नितेश गोहणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिलीप सिडाम करत आहेत.
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments